S M L

आयबीएन-7 च्या पत्रकारांवर लखनौ पोलिसांचा हल्ला

27 जूनजे डेंच्या हत्येची घटना ताजी असतानाच.. काल उत्तर प्रदेशात पत्रकारांवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली. आयबीएन-7 या आमच्या हिंदी न्यूज चॅनलच्या दोन पत्रकारांना लखनऊ पोलिसांनी ताब्यात घेऊन मारहाण केली. रात्री एक वाजता शेकडो पत्रकारांनी मोर्चा काढल्यानंतर मायावती सरकारने संबंधित पोलीस अधिकार्‍यांना निलंबित केलं. पण बलात्काराच्या अनेक घटना, घोटाळे, शेतकर्‍यांची निदर्शनं, डॉ सचन यांची हत्या आणि आता पत्रकारांवरील पोलिसांचे अत्याचार या प्रकरणांमुळे निवडणुकीचं वर्ष मायावतींना जड जाऊ शकतं.शलभमणि त्रिपाठी आणि मनोज रंजन त्रिपाठी. आयबीएन-7 च्या दोन पत्रकारांना शिक्षा मिळाली. लोकांसमोर सत्य आणल्याची. डॉ सचन या चीफ मेडिकल ऑफिसरच्या हत्येचे रिपोर्टिंग करताना पोलिसांवर टीका केली. म्हणून त्यांना ताब्यात घेऊन मारहाण करण्यात आली. हे कृत्य करणार्‍या बी. पी अशोक आणि अनुप कुमार या दोन अधिकार्‍यांना आता मुख्यमंत्री मायावतींनी निलंबित केलं. लखनऊमधील शेकडो पत्रकारांनी रात्री मायावतींच्या घरावर मोर्चा काढल्यानंतर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली. रविवारी पत्रकारांना मारहाण केल्यानंतर सोमवारी उत्तर प्रदेश पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. राज्यातल्या वाढत्या गुन्हेगारीविरुद्ध काँग्रेसने मोर्चा आयोजित केला होता. उत्तर प्रदेशातल्या विधानसभेच्या निवडणुकीला फक्त एक वर्ष शिल्लक राहिलं असताना मुख्यमंत्री मायावती चहूबाजूंनी घेरल्या गेल्या आहेत. अनेक घोटाळे, महिलांवरचे अत्याचार, डॉ सचन यांच्या हत्येचे बसपाशी संबंध या सगळ्या घटनांमुळे विरोधकांना ऐते मुद्दे मिळालेत. त्यामुळे मायावतींनी तातडीने एक बैठक घेतली. वाढत्या बलात्काराच्या आणि हत्येच्या घटना थांबवण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे संकेत दिले. पण त्याने विरोधकांचs समाधान झालं नाही. कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकलेल्या मायावती आता काय पाऊल उचलतात. याकडे सगळ्या विरोधकांचे लक्ष आहे. दरम्यान, उत्तरप्रदेशात पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत एडिटर्स गिल्डने तीव्र चिंता व्यक्त केली. उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतींना त्यांनी पत्र लिहिलं. आणि उत्तर प्रदेशात पत्रकारांवर हल्ले करणार्‍यांवर कारवाईची मागणी केली. मायावती यांनी दोषी पोलीस अधिकार्‍यांना निलंबित करण्याचे आदेश दिल्याबद्दल एडिटर गिल्डने मायावती यांचे अभिनंदनही केले. पत्रकारांवर होणारे वाढते हल्ले थांबवण्यासाठी सरकारनं ठोस उपाययोजना करण्याची मागणी पत्राद्वारे एडिटर गिल्डनं केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 27, 2011 04:48 PM IST

आयबीएन-7 च्या पत्रकारांवर लखनौ पोलिसांचा हल्ला

27 जून

जे डेंच्या हत्येची घटना ताजी असतानाच.. काल उत्तर प्रदेशात पत्रकारांवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली. आयबीएन-7 या आमच्या हिंदी न्यूज चॅनलच्या दोन पत्रकारांना लखनऊ पोलिसांनी ताब्यात घेऊन मारहाण केली.

रात्री एक वाजता शेकडो पत्रकारांनी मोर्चा काढल्यानंतर मायावती सरकारने संबंधित पोलीस अधिकार्‍यांना निलंबित केलं. पण बलात्काराच्या अनेक घटना, घोटाळे, शेतकर्‍यांची निदर्शनं, डॉ सचन यांची हत्या आणि आता पत्रकारांवरील पोलिसांचे अत्याचार या प्रकरणांमुळे निवडणुकीचं वर्ष मायावतींना जड जाऊ शकतं.

शलभमणि त्रिपाठी आणि मनोज रंजन त्रिपाठी. आयबीएन-7 च्या दोन पत्रकारांना शिक्षा मिळाली. लोकांसमोर सत्य आणल्याची. डॉ सचन या चीफ मेडिकल ऑफिसरच्या हत्येचे रिपोर्टिंग करताना पोलिसांवर टीका केली. म्हणून त्यांना ताब्यात घेऊन मारहाण करण्यात आली. हे कृत्य करणार्‍या बी. पी अशोक आणि अनुप कुमार या दोन अधिकार्‍यांना आता मुख्यमंत्री मायावतींनी निलंबित केलं. लखनऊमधील शेकडो पत्रकारांनी रात्री मायावतींच्या घरावर मोर्चा काढल्यानंतर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली.

रविवारी पत्रकारांना मारहाण केल्यानंतर सोमवारी उत्तर प्रदेश पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. राज्यातल्या वाढत्या गुन्हेगारीविरुद्ध काँग्रेसने मोर्चा आयोजित केला होता. उत्तर प्रदेशातल्या विधानसभेच्या निवडणुकीला फक्त एक वर्ष शिल्लक राहिलं असताना मुख्यमंत्री मायावती चहूबाजूंनी घेरल्या गेल्या आहेत.

अनेक घोटाळे, महिलांवरचे अत्याचार, डॉ सचन यांच्या हत्येचे बसपाशी संबंध या सगळ्या घटनांमुळे विरोधकांना ऐते मुद्दे मिळालेत. त्यामुळे मायावतींनी तातडीने एक बैठक घेतली. वाढत्या बलात्काराच्या आणि हत्येच्या घटना थांबवण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे संकेत दिले. पण त्याने विरोधकांचs समाधान झालं नाही.

कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकलेल्या मायावती आता काय पाऊल उचलतात. याकडे सगळ्या विरोधकांचे लक्ष आहे.

दरम्यान, उत्तरप्रदेशात पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत एडिटर्स गिल्डने तीव्र चिंता व्यक्त केली. उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतींना त्यांनी पत्र लिहिलं. आणि उत्तर प्रदेशात पत्रकारांवर हल्ले करणार्‍यांवर कारवाईची मागणी केली.

मायावती यांनी दोषी पोलीस अधिकार्‍यांना निलंबित करण्याचे आदेश दिल्याबद्दल एडिटर गिल्डने मायावती यांचे अभिनंदनही केले. पत्रकारांवर होणारे वाढते हल्ले थांबवण्यासाठी सरकारनं ठोस उपाययोजना करण्याची मागणी पत्राद्वारे एडिटर गिल्डनं केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2011 04:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close