S M L

बाळासाहेब ठाकरेंची संपत्ती जप्त करण्याचे आदेश

28 जूनशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची संपत्ती जप्त करण्याचे आदेश बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातल्या आरा न्यायालयाने दिले आहेत. 2008 मध्ये सामनामधून ''एक बिहार सौ बिमार'' हा अग्रलेख प्रसिद्ध झाला होता. त्याविरोधात ऍड. राजेशकुमार सिंह यांनी एक जनहित याचिका दाखल केली होती. बाळासाहेब ठाकरेंना न्यायालयाने 2008 मध्ये पहिल्यांदा समन्स बजावलं होतं. यानंतर 2009 मध्ये आणि 2010 मध्ये अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. पण बाळासाहेबांनी प्रतिसाद न दिल्याने न्यायालयाने बाळासाहेबांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 28, 2011 09:27 AM IST

बाळासाहेब ठाकरेंची संपत्ती जप्त करण्याचे आदेश

28 जून

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची संपत्ती जप्त करण्याचे आदेश बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातल्या आरा न्यायालयाने दिले आहेत. 2008 मध्ये सामनामधून ''एक बिहार सौ बिमार'' हा अग्रलेख प्रसिद्ध झाला होता. त्याविरोधात ऍड. राजेशकुमार सिंह यांनी एक जनहित याचिका दाखल केली होती. बाळासाहेब ठाकरेंना न्यायालयाने 2008 मध्ये पहिल्यांदा समन्स बजावलं होतं. यानंतर 2009 मध्ये आणि 2010 मध्ये अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. पण बाळासाहेबांनी प्रतिसाद न दिल्याने न्यायालयाने बाळासाहेबांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 28, 2011 09:27 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close