S M L

कारागृहात कलमाडींना फाईव्ह स्टार सेवा ; अधीक्षक पदमुक्त

02 जुलैसध्या सर्व हाय प्रोफाईल नेत्यांचा भरणा असलेल्या दिल्लीच्या तिहार जेल पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. यावेळी कारागृह प्रशासन काही हाय प्रोफाईल नेत्यांना नियम तोडून चांगली वागणूक देण्यावरुन संकटात सापडलं आहे. राष्ट्रकूल घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुगांत असलेले सुरेश कलमाडी यांना नियम तोडून चांगली ट्रिटमेंट देण्याप्रकरणी कारागृह अधिक्षकांना तडकाफडकी पदमुक्त करण्यात आलं आहे. जेलमध्ये तपासणीदरम्यान सुरेश कलमाडी हे कारागृह अधिक्षकांसोबत चहापान करतांना आढळले. कलमाडी यांना ठेवण्यात आलेल्या सेलला लॉक करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे कलमाडी यांना कधीही त्यांच्या कोठडीतून बाहेर येण्या जाण्याची मूभा दिल्‌्या गेल्याचं स्पष्ट झालं होतं. कलमाडी यांच्याशिवाय नितीश कटारा हत्येप्रकरणातील आरोपी विशाल आणि विकास यादव हे निर्धारीत वेळेपेक्षा जास्त वेळ जेल बगिच्यात फिरतांना आढळले. या प्रकरणी 48 तासाच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश तिहारचे सादर करण्याचे आदेश तिहारच्या मुख्य अधीक्षकांनी दिले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 2, 2011 05:47 PM IST

कारागृहात कलमाडींना फाईव्ह स्टार सेवा ; अधीक्षक पदमुक्त

02 जुलै

सध्या सर्व हाय प्रोफाईल नेत्यांचा भरणा असलेल्या दिल्लीच्या तिहार जेल पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. यावेळी कारागृह प्रशासन काही हाय प्रोफाईल नेत्यांना नियम तोडून चांगली वागणूक देण्यावरुन संकटात सापडलं आहे.

राष्ट्रकूल घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुगांत असलेले सुरेश कलमाडी यांना नियम तोडून चांगली ट्रिटमेंट देण्याप्रकरणी कारागृह अधिक्षकांना तडकाफडकी पदमुक्त करण्यात आलं आहे. जेलमध्ये तपासणीदरम्यान सुरेश कलमाडी हे कारागृह अधिक्षकांसोबत चहापान करतांना आढळले.

कलमाडी यांना ठेवण्यात आलेल्या सेलला लॉक करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे कलमाडी यांना कधीही त्यांच्या कोठडीतून बाहेर येण्या जाण्याची मूभा दिल्‌्या गेल्याचं स्पष्ट झालं होतं.

कलमाडी यांच्याशिवाय नितीश कटारा हत्येप्रकरणातील आरोपी विशाल आणि विकास यादव हे निर्धारीत वेळेपेक्षा जास्त वेळ जेल बगिच्यात फिरतांना आढळले. या प्रकरणी 48 तासाच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश तिहारचे सादर करण्याचे आदेश तिहारच्या मुख्य अधीक्षकांनी दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 2, 2011 05:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close