S M L

सोनियांचे आश्वासन ; अण्णा उपोषणावर ठाम

02 जुलै लोकपाल विधेयकाला पाठिंबा मिळवण्यासाठी अण्णा हजारेंनी देशातल्या सर्व महत्त्वाच्या राजकीय नेत्यांच्या भेटी घेणं सुरु केलं. आज अण्णा हजारे 10 जनपथवर पोहचले. त्यांनी सोनिया गांधींसह काही वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. यावेळी अण्णांसोबत अरविंद केजरीवाल होते. या बैठकीत प्रणव मुखर्जी, जनार्दन व्दिवेदी आणि मोहसिना किडवाई उपस्थित होत्या. सोनियांशी लोकपाल विधेयकाच्या मसुद्याच्या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे अण्णांनी सांगितले. संसदेत कठोर लोकपाल विधेयक मांडल गेलं नाही तर 16 तारखेपासून आपण पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचा पुनरुच्चारही यावेळी अण्णांनी केला. तर आपण सर्व मुद्द्यांवर विचार करु असं आश्वासन सोनियांनी अण्णांना दिलं. दरम्यान, अण्णांनी सोनियांशी बोलताना उपोषणाचा विषय काढला नाही असं काँग्रेस प्रवक्त्यांनी सांगितले आहे. दोन्ही पक्षांमधील चर्चा सकारात्मक झाल्याचंही जर्नादन द्विवेदी यांनी सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 2, 2011 01:07 PM IST

सोनियांचे आश्वासन ; अण्णा उपोषणावर ठाम

02 जुलै

लोकपाल विधेयकाला पाठिंबा मिळवण्यासाठी अण्णा हजारेंनी देशातल्या सर्व महत्त्वाच्या राजकीय नेत्यांच्या भेटी घेणं सुरु केलं. आज अण्णा हजारे 10 जनपथवर पोहचले. त्यांनी सोनिया गांधींसह काही वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. यावेळी अण्णांसोबत अरविंद केजरीवाल होते.

या बैठकीत प्रणव मुखर्जी, जनार्दन व्दिवेदी आणि मोहसिना किडवाई उपस्थित होत्या. सोनियांशी लोकपाल विधेयकाच्या मसुद्याच्या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे अण्णांनी सांगितले. संसदेत कठोर लोकपाल विधेयक मांडल गेलं नाही तर 16 तारखेपासून आपण पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचा पुनरुच्चारही यावेळी अण्णांनी केला. तर आपण सर्व मुद्द्यांवर विचार करु असं आश्वासन सोनियांनी अण्णांना दिलं.

दरम्यान, अण्णांनी सोनियांशी बोलताना उपोषणाचा विषय काढला नाही असं काँग्रेस प्रवक्त्यांनी सांगितले आहे. दोन्ही पक्षांमधील चर्चा सकारात्मक झाल्याचंही जर्नादन द्विवेदी यांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 2, 2011 01:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close