S M L

गृहमंत्र्यांच्या आदेशाला पोलिसांनी दाखवली केराची टोपली

प्रशांत कोरटकर, नागपूर 02 जुलैबदली झाल्यावर पोलिसांनी तत्काळ कामावर रुजू व्हावे असे सक्तीचे आदेश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले आहेत. पण पोलिसांनी या आदेशाला केराची टोपलीच दाखवली. नागपूरसह विदर्भात बदली झालेले कित्येक अधिकारी वर्ष वर्ष कामावर रुजू होत नाही. त्यामुळे आहे त्या पोलिसांवर अतिरिक्त ताण येतोय. परिणामी गुन्हेगारीत वाढ होतेय. सदरक्षणाय खलनिग्रणाय.. पोलिसांचे हे घोषवाक्य पण पोलीस अधिकारीच नसतील तर सदरक्षण कसे करायचा असा प्रश्न नागपूर पोलिसांसमोर आहे. कारण आहे बदली झालेले कितीतरी अधिकारी अजून कामावर रुजूच झालेले नाहीत. मार्च महिन्याच्या शेवटी पोलीस विभागात मोठ्या प्रमाणावर अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या. जवळपास तीन महिने लोटले पण नागपुरात बदली झालेले अनेक अधिकारी अजून कामावर रुजू झालेले नाही. त्यामुळे साहाजिकच येथील पोलिसांवर जास्तीचा ताण पडतोय. शहर पोलिसांमध्ये बदली झालेले वर्धेचे सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस तर नागपूरचे ज्वाईंट कमिशनर म्हणून बदली झालेले संजय सक्सेना यांनी अजून काम सांभाळलेलं नाही. नागपूर शहर पोलिसांमध्ये अडीचशेच्या जवळपास एपीआय आणि पीएसआय यांची पदं रिकामी आहेत. मुंबई, पुणे, नाशिक असे पश्चिम महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी विदर्भात यायला तयार नसतात. विरोधकांना हे गृहमंत्र्यांचे अपयश वाटतं. नागपूर शहर झपाट्याने वाढतं आहे. काही नवीन पोलीस ठाणेही सुरू करण्यात आले आहेत. पण स्टाफ कमी असल्याने गुन्हेगारांवर जरब बसवण्यात पोलीस अपयशी ठरत आहे. त्यामुळे आता गृहमंत्री अशा अधिकार्‍यांविरोधात कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 2, 2011 05:42 PM IST

गृहमंत्र्यांच्या आदेशाला पोलिसांनी दाखवली केराची टोपली

प्रशांत कोरटकर, नागपूर

02 जुलै

बदली झाल्यावर पोलिसांनी तत्काळ कामावर रुजू व्हावे असे सक्तीचे आदेश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले आहेत. पण पोलिसांनी या आदेशाला केराची टोपलीच दाखवली. नागपूरसह विदर्भात बदली झालेले कित्येक अधिकारी वर्ष वर्ष कामावर रुजू होत नाही. त्यामुळे आहे त्या पोलिसांवर अतिरिक्त ताण येतोय. परिणामी गुन्हेगारीत वाढ होतेय.

सदरक्षणाय खलनिग्रणाय.. पोलिसांचे हे घोषवाक्य पण पोलीस अधिकारीच नसतील तर सदरक्षण कसे करायचा असा प्रश्न नागपूर पोलिसांसमोर आहे. कारण आहे बदली झालेले कितीतरी अधिकारी अजून कामावर रुजूच झालेले नाहीत.

मार्च महिन्याच्या शेवटी पोलीस विभागात मोठ्या प्रमाणावर अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या. जवळपास तीन महिने लोटले पण नागपुरात बदली झालेले अनेक अधिकारी अजून कामावर रुजू झालेले नाही. त्यामुळे साहाजिकच येथील पोलिसांवर जास्तीचा ताण पडतोय.

शहर पोलिसांमध्ये बदली झालेले वर्धेचे सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस तर नागपूरचे ज्वाईंट कमिशनर म्हणून बदली झालेले संजय सक्सेना यांनी अजून काम सांभाळलेलं नाही. नागपूर शहर पोलिसांमध्ये अडीचशेच्या जवळपास एपीआय आणि पीएसआय यांची पदं रिकामी आहेत.

मुंबई, पुणे, नाशिक असे पश्चिम महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी विदर्भात यायला तयार नसतात. विरोधकांना हे गृहमंत्र्यांचे अपयश वाटतं. नागपूर शहर झपाट्याने वाढतं आहे. काही नवीन पोलीस ठाणेही सुरू करण्यात आले आहेत. पण स्टाफ कमी असल्याने गुन्हेगारांवर जरब बसवण्यात पोलीस अपयशी ठरत आहे. त्यामुळे आता गृहमंत्री अशा अधिकार्‍यांविरोधात कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 2, 2011 05:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close