S M L

डोंबिवलीमध्ये मराठी-उत्तरभारतीयांचा अनोखा संगम

13 नोव्हेंबर, मुंबईअलका धुपकरपरप्रांतीय विरोधी महाराष्ट्रीयन असा वाद राजकारण्यांकडून पेटवला जात आहे. प्रत्यक्षात मात्र भाषा, प्रांत हे सगळे वाद विसरुन मुंबईत लोक अनेक वर्ष काम करत आहेत. डोंबिवलीमध्ये शिक्षण, क्रीडा आणि विविध सामाजिक संस्थांमध्ये सुरेंद्र बाजपेयी यांनीही असंच काम केलं आहे.डोंबिवलीतली लोकमान्य टिळकनगरची शाळा म्हटली की सुरेंद्र बाजपेयींच नाव हमखास घेतलं जातं. मध्यप्रदेशहून मुंबईत आलेले बाजपेयी पक्के डोंबिवलीकर बनले आहेत. बाजपेयी दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांसोबत ते महाराष्ट्रात आले. सध्या ते 67 वर्षांचे आहेत. आणि डोंबिवलीतल्या 80 हून अधिक सामाजिक संस्थांसोबत त्यांचं काम जोडलेलं आहे. अस्तित्व ही त्यापैकीच एक संस्था. मतीमंद मुलांसाठी ही संस्था काम करते. या संस्थेविषयी बोलताना बाजपेयी म्हणाले, ' या शाळेत घाटकोपरपासून ते कर्जत पर्यंतची मुलं येतात. याशिवाय मी होमगार्डचं काम करतो. खेळासाठी आम्ही काम केलं आणि आमच्या याच मतीमंद शाळेतली मुलगी ऑल्मपिकमध्ये कांस्यपदक घेउन आली. '' मराठी-अमराठी वादाविषयी बोलताना बाजपेयी म्हणाले, ' मुळात हे सगळे वाद राजकारण्यांनीच केलेले आहेत. सामान्य माणसाला प्रांत, भाषा, धर्म, वर्ण या कशावरुनच वाद नको असतात. माणसाने सगळ्यांशी माणूस म्हणून वागलं की असले अस्मिता वगैरे कसलेच वाद उरणार नाहीत, असा माझा विश्वास आहे. इर्षा, द्वेष, मत्सर ही एक प्रकारची हिंसा आहे. त्यापासून लांब रहायला पाहिजे. 'दुधात साखर मिसळावी इतक्या सहजपणे बाजेपायी मराठी संस्कृती आणि महाराष्ट्राशी एकरूप झाले झाले आहेत. एवढंच नाही तर सामाजिक कार्यात एवढं मोठं योगदान देऊन त्यांनी इतरांसाठीही आदर्श निर्माण केला आहे. सच्चया तळमळीने काम करणार्‍या माणसापुढे प्रांतवादाच्या अडचणी कधीच येत नाहीत, हेच यानिमित्तानं स्पष्ट झालं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 13, 2008 07:34 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 13, 2008 07:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close