S M L

चाफेकर बंधूच्या ऐतिहासिक वाड्याकडे शासनाचे दुर्लक्ष

गोविंद वाकडे, पिंपरी-चिंचवड03 जुलैदेशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणारे शेकडो क्रांतीकारक आज स्मारकांच्या रुपाने आपल्यात आहेत. पण दुर्देवाची बाब म्हणजे या स्मारकांकडे लक्ष द्यायला शासनाला वेळ नाही. पिंपरी-चिचंवडमधील वीर चाफेकर बंधूच्या बलिदानाचा ऐतिहासिक वारसा सांगणारा त्यांचा वाडा अडगळीत पडला आहेत.जुलमी ब्रिटीश कमीश्नर रॅन्डचा खून करणारे दामोदर हरी चाफेकर . चिंचवडमध्ये असलेल्या वाड्यात दामोदर आणि त्यांच्या भावंडांचा जन्म झाला. रॅन्डचा खून केला म्हणून या तिन्ही चाफेकर बंधूना फाशी देण्यात आली. स्वांतत्र्य लढ्यात एकाच घरातील तीन भावंड फासावर चढल्याची ही पहिलीच घटना होती. हा वाडा चाफेकर बंधूंच्या त्या बलिदानाचा साक्षिदार म्हणून आजही उभा आहे. परंतु त्याला मात्र कुणाचाही आधार नाही.रॅन्ड चा खून केल्यानंतर वाड्याच्या विहिरीत दामोदर चाफेकरांनी त्यांची शस्त्रे लपवली होती. ती शस्त्रे, त्यांच्या वापरातील अनेक वस्तू हे सगळं अडगळीतल्या खोलीत धुळखात पडलं आहे. पण हा ऐतिहासिक वारसा मुख्य प्रवाहात यावा अस इथल्या नागरीकांना वाटते.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी येथील विकास कामाचे उद्घाटन केलं होतं. पण ते अजुनही अर्धवट स्थितीत आहे. महापालिका मात्र ही वास्तू जतन करत असल्याचा दावा करत आहे.चाफेकर बंधूंसारख्या अनेक क्रांतीकारकांच्या बलिदानातून आजचं हे स्वातंत्र्य प्राप्त झालंय. पण या स्वातंत्र्यात त्यांचा ऐतिहासिक वारसा असा अडगळीत पडणं ही मोठी शोकांतिका आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 3, 2011 02:01 PM IST

चाफेकर बंधूच्या ऐतिहासिक वाड्याकडे शासनाचे दुर्लक्ष

गोविंद वाकडे, पिंपरी-चिंचवड

03 जुलै

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणारे शेकडो क्रांतीकारक आज स्मारकांच्या रुपाने आपल्यात आहेत. पण दुर्देवाची बाब म्हणजे या स्मारकांकडे लक्ष द्यायला शासनाला वेळ नाही. पिंपरी-चिचंवडमधील वीर चाफेकर बंधूच्या बलिदानाचा ऐतिहासिक वारसा सांगणारा त्यांचा वाडा अडगळीत पडला आहेत.

जुलमी ब्रिटीश कमीश्नर रॅन्डचा खून करणारे दामोदर हरी चाफेकर . चिंचवडमध्ये असलेल्या वाड्यात दामोदर आणि त्यांच्या भावंडांचा जन्म झाला. रॅन्डचा खून केला म्हणून या तिन्ही चाफेकर बंधूना फाशी देण्यात आली. स्वांतत्र्य लढ्यात एकाच घरातील तीन भावंड फासावर चढल्याची ही पहिलीच घटना होती. हा वाडा चाफेकर बंधूंच्या त्या बलिदानाचा साक्षिदार म्हणून आजही उभा आहे. परंतु त्याला मात्र कुणाचाही आधार नाही.

रॅन्ड चा खून केल्यानंतर वाड्याच्या विहिरीत दामोदर चाफेकरांनी त्यांची शस्त्रे लपवली होती. ती शस्त्रे, त्यांच्या वापरातील अनेक वस्तू हे सगळं अडगळीतल्या खोलीत धुळखात पडलं आहे. पण हा ऐतिहासिक वारसा मुख्य प्रवाहात यावा अस इथल्या नागरीकांना वाटते.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी येथील विकास कामाचे उद्घाटन केलं होतं. पण ते अजुनही अर्धवट स्थितीत आहे. महापालिका मात्र ही वास्तू जतन करत असल्याचा दावा करत आहे.

चाफेकर बंधूंसारख्या अनेक क्रांतीकारकांच्या बलिदानातून आजचं हे स्वातंत्र्य प्राप्त झालंय. पण या स्वातंत्र्यात त्यांचा ऐतिहासिक वारसा असा अडगळीत पडणं ही मोठी शोकांतिका आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 3, 2011 02:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close