S M L

आंध्रमध्ये तेलंगणाचा मुद्दा पेटला ;खासदार, आमदारांचे राजीनामासत्र

04 जुलैस्वतंत्र तेलंगणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीवर केंद्रावर दबाव आणण्यासाठी तिथल्या आमदारांनी राजीनाम्याचे हत्यार उपसले आहे. तेलंगणातल्या काँग्रेसच्या 35 आमदारांनी राजीनामे दिले आहे. त्यात 11 मंत्र्यांचा समावेश आहे. त्यामुळे किरण रेड्डी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर तेलुगु देसमच्याही 37 आमदारांमी राजीनामे दिले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष एन. मनोहर देशाबाहेर असल्याने या आमदारांनी उपाध्यक्षांकडे राजीनामापत्र सादर केले. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष परतल्यानंतरच या राजीनाम्यांबाबत निर्णय होणार आहे. विधानसभेतल्या 294 पैकी 119 आमदार तेलंगणातील आहेत. दुसरीकडे नवी दिल्लीतही काँग्रेसच्या लोकसभेच्या 12 पैकी 9 तर राज्यसभेच्या एका खासदारांने राजीनामा पत्र अध्यक्षा मीरा कुमार यांच्याकडे सादर केला. पण, केंद्राने ठोस आश्वासन दिले तर राजीनामे मागे घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान या परस्थितीवर तोडगा काढण्यासाठी राजकीय मुद्द्यांवरच्या केंद्रीय मंत्रिगटाची आज तातडीची बैठक झाली. त्यात सरकारी नोकर्‍यांमध्ये तेलंगणातल्या नागरिकांना प्राधान्य देण्यासाठी घटनेत दुरुस्ती करण्याची शिफारस करण्यात आली. तशा संदर्भाचे पत्रही केंद्र सरकारने राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना लिहिलंय. आंध्र प्रदेश विधानसभाएकूण जागा : 294बहुमतासाठी गरज : 148काँग्रेस आमदार : 155काँग्रेस ( 155) + प्रजाराज्यम ( 18) : 173काँग्रेसचे तेलंगणातले आमदार : 53तेलंगणातल्या आमदारांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचं संख्याबळ : 120

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 4, 2011 01:09 PM IST

आंध्रमध्ये तेलंगणाचा मुद्दा पेटला ;खासदार, आमदारांचे राजीनामासत्र

04 जुलै

स्वतंत्र तेलंगणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीवर केंद्रावर दबाव आणण्यासाठी तिथल्या आमदारांनी राजीनाम्याचे हत्यार उपसले आहे. तेलंगणातल्या काँग्रेसच्या 35 आमदारांनी राजीनामे दिले आहे. त्यात 11 मंत्र्यांचा समावेश आहे. त्यामुळे किरण रेड्डी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्याचबरोबर तेलुगु देसमच्याही 37 आमदारांमी राजीनामे दिले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष एन. मनोहर देशाबाहेर असल्याने या आमदारांनी उपाध्यक्षांकडे राजीनामापत्र सादर केले. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष परतल्यानंतरच या राजीनाम्यांबाबत निर्णय होणार आहे. विधानसभेतल्या 294 पैकी 119 आमदार तेलंगणातील आहेत.

दुसरीकडे नवी दिल्लीतही काँग्रेसच्या लोकसभेच्या 12 पैकी 9 तर राज्यसभेच्या एका खासदारांने राजीनामा पत्र अध्यक्षा मीरा कुमार यांच्याकडे सादर केला. पण, केंद्राने ठोस आश्वासन दिले तर राजीनामे मागे घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान या परस्थितीवर तोडगा काढण्यासाठी राजकीय मुद्द्यांवरच्या केंद्रीय मंत्रिगटाची आज तातडीची बैठक झाली. त्यात सरकारी नोकर्‍यांमध्ये तेलंगणातल्या नागरिकांना प्राधान्य देण्यासाठी घटनेत दुरुस्ती करण्याची शिफारस करण्यात आली. तशा संदर्भाचे पत्रही केंद्र सरकारने राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना लिहिलंय.

आंध्र प्रदेश विधानसभा

एकूण जागा : 294बहुमतासाठी गरज : 148

काँग्रेस आमदार : 155काँग्रेस ( 155) प्रजाराज्यम ( 18) : 173

काँग्रेसचे तेलंगणातले आमदार : 53तेलंगणातल्या आमदारांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचं संख्याबळ : 120

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 4, 2011 01:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close