S M L

सलवा जुडूम घटनाबाह्य ; आदिवासींना शस्त्र पुरवणे थांबवा !

05 जुलैसलवा जुडूमच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने आज छत्तीसगड सरकारवर कडक ताशेरे ओढले. सलवा जुडूम घटनाबाह्य असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. नक्षलवाद्यांविरोधात लढण्यासाठी छत्तीसगड सरकारने तिथल्या स्थानिकांच्या हातात शस्त्रं दिली आहेत. आणि त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. अशा पद्धतीनं तरुणांना भर्ती करणं आणि त्यांच्या हातात शस्त्रं देणं हा घटनेच्या 21 व्या कलमाचा भंग आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. तसेच सलवा जुडूमच्या अंतर्गतच छत्तीसगड सरकारने विशेष पोलीस अधिकार्‍यांची नेमणूक केली. ही नेमणूकही बेकायदेशीर आहे असं ही कोर्टाने म्हटले आहे. विशेष पोलीस अधिकार्‍यांना देण्यात आलेली शस्त्रं ताबडतोब काढून घ्यावीत असे आदेशही कोर्टाने दिले आहे. सामाजिक कार्यकर्ते नंदिनी सुंदर आणि मनिष कूंजाम यांनी छत्तीसगड सरकारविरुध्द याचिका दाखल केली होती. . सामाजिक कार्यकर्ते नंदिनी सुंदर आणि मनिष कूंजाम यांनी छत्तीसगड सरकारविरुध्द याचिका दाखल केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 5, 2011 09:49 AM IST

सलवा जुडूम घटनाबाह्य ; आदिवासींना शस्त्र पुरवणे थांबवा !

05 जुलै

सलवा जुडूमच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने आज छत्तीसगड सरकारवर कडक ताशेरे ओढले. सलवा जुडूम घटनाबाह्य असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. नक्षलवाद्यांविरोधात लढण्यासाठी छत्तीसगड सरकारने तिथल्या स्थानिकांच्या हातात शस्त्रं दिली आहेत. आणि त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं.

अशा पद्धतीनं तरुणांना भर्ती करणं आणि त्यांच्या हातात शस्त्रं देणं हा घटनेच्या 21 व्या कलमाचा भंग आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. तसेच सलवा जुडूमच्या अंतर्गतच छत्तीसगड सरकारने विशेष पोलीस अधिकार्‍यांची नेमणूक केली. ही नेमणूकही बेकायदेशीर आहे असं ही कोर्टाने म्हटले आहे.

विशेष पोलीस अधिकार्‍यांना देण्यात आलेली शस्त्रं ताबडतोब काढून घ्यावीत असे आदेशही कोर्टाने दिले आहे. सामाजिक कार्यकर्ते नंदिनी सुंदर आणि मनिष कूंजाम यांनी छत्तीसगड सरकारविरुध्द याचिका दाखल केली होती. . सामाजिक कार्यकर्ते नंदिनी सुंदर आणि मनिष कूंजाम यांनी छत्तीसगड सरकारविरुध्द याचिका दाखल केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 5, 2011 09:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close