S M L

पुण्यात अवैध चंदन तेल कारखान्याचा पर्दाफाश ; 10 जणांना अटक

05 जुलैपुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात एका छाप्यात तब्बल 50 लाखांचे चंदन आणि चंदन तेल पकडण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली. या कारखान्यात चंदनाच्या लाकडापासून बेकादेशिररित्या तेल तयार करण्यात येत होतं. शिरूर बायपासजवळच्या कारखान्यात चंदन तेल करण्याचे काम बेकादेशिररित्या सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानूसार काल रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली. या छाप्यात या कारखान्याचा मालक हनुमंत मोरेसह 10 जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. तर 150 किलो चंदनाचे बारीक तुकडे, 300 किलो चंदन लाकडं, 400 किलो चंदन भुसा, 22 किलो तयार तेल असा एकूण 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा कारखाना 2007 साली पोलिसांनी बंद केला होता. पण सील असताना मागच्या बाजूने हा सगळा बेकादेशीर व्यवहार सुरू होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 5, 2011 10:45 AM IST

पुण्यात अवैध चंदन तेल कारखान्याचा पर्दाफाश ; 10 जणांना अटक

05 जुलै

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात एका छाप्यात तब्बल 50 लाखांचे चंदन आणि चंदन तेल पकडण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली. या कारखान्यात चंदनाच्या लाकडापासून बेकादेशिररित्या तेल तयार करण्यात येत होतं.

शिरूर बायपासजवळच्या कारखान्यात चंदन तेल करण्याचे काम बेकादेशिररित्या सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानूसार काल रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली. या छाप्यात या कारखान्याचा मालक हनुमंत मोरेसह 10 जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं.

तर 150 किलो चंदनाचे बारीक तुकडे, 300 किलो चंदन लाकडं, 400 किलो चंदन भुसा, 22 किलो तयार तेल असा एकूण 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा कारखाना 2007 साली पोलिसांनी बंद केला होता. पण सील असताना मागच्या बाजूने हा सगळा बेकादेशीर व्यवहार सुरू होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 5, 2011 10:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close