S M L

पद्मनाभस्वामी मंदिराचा दुसरा दरवाजा उघडला

05 जुलैकेरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील शेवटचे दोन गुप्त तळघर काल उघडण्यात आले. त्यातली संपत्ती मोजण्याचे काम सुरू आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेत हे तळघर उघडण्यात आले. गेल्या आठवड्यात उघडलेल्या पहिल्या तळघरात तब्बल 1 लाख कोटींची संपत्ती सापडली होती. त्यात सोने आणि चांदीच्या दागिन्यांचा महाखजिना सापडला. गेल्या 130 वर्षांपासून हे तळघर बंद होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार गेल्या आठवड्यात ते खुले करण्यात आले. दरम्यान मंदिरात सापडलेली संपत्ती मंदिराच्याच मालकीची असल्याचे केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी स्पष्ट केले. मंदिराला सरकार कडक सुरक्षा पुरवेल असंही त्यांनी सांगितले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 5, 2011 01:11 PM IST

पद्मनाभस्वामी मंदिराचा दुसरा दरवाजा उघडला

05 जुलै

केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील शेवटचे दोन गुप्त तळघर काल उघडण्यात आले. त्यातली संपत्ती मोजण्याचे काम सुरू आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेत हे तळघर उघडण्यात आले. गेल्या आठवड्यात उघडलेल्या पहिल्या तळघरात तब्बल 1 लाख कोटींची संपत्ती सापडली होती. त्यात सोने आणि चांदीच्या दागिन्यांचा महाखजिना सापडला. गेल्या 130 वर्षांपासून हे तळघर बंद होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार गेल्या आठवड्यात ते खुले करण्यात आले. दरम्यान मंदिरात सापडलेली संपत्ती मंदिराच्याच मालकीची असल्याचे केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी स्पष्ट केले. मंदिराला सरकार कडक सुरक्षा पुरवेल असंही त्यांनी सांगितले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 5, 2011 01:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close