S M L

दुबार पेरणी करणार्‍या शेतकर्‍यांना मोफत बियाणे द्यावीत - एकनाथ खडसे

05 जुलैराज्यात पाऊस कमी पडल्याने शेतकर्‍यांपुढे दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलं आहे. त्यामुळे तो अडचणीत सापडला आहेत. अशा परिस्थितीत सरकार मात्र सुस्त आहे असा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला. अडचणीत सापडलेल्या शेतक र्‍यांना खतं आणि बी बियाणे मोफत द्यावीत अशी मागणीही एकनाथ खडसे यांनी केली.पावसाने दडी मारल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी दुबार पेरणीचं संकट ओढावले आहेत. वर्धा जिल्ह्यात 75 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पण पंधरा दिवसांपासून पाऊस गायब झाल्यामुळे कपाशी आणि सोयाबीनची पिकं वाळत आहेत. पिकाना मजूर लावून हाताने पाणी देण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली. पाणी टाकणार्‍या मजुरांना दिवसाला दीडशे रुपये मजूरी द्यावी लागतेय त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटकाही बसत आहे.दोन-तीन दिवसात पाऊस पडले !पावसाने सध्या ओढ दिली असली तरी चिंता करण्याचे कारण नाही असं पुणे वेधशाळेच्या अधिकार्‍यांचे म्हणणं आहे. येत्या दोन-तीन दिवसात पाऊस पडले असा वेधशाळेचा अंदाज आहे. जून महिन्याची पावसाची जी सरासरी आहे. त्यापेक्षा 10 टक्के जास्त पाऊस पडला. गेल्या वर्षी जून महिन्यात सरासरीच्या 16 टक्के कमी पाऊस पडला होता. अर्थात गुजरात, सौराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झालीय अशी माहिती पुणे वेधशाळेचे वरिष्ठ संचालक ए.बी. मजुमदार यांनी व्यक्त केली. हवामान विभागाने सुरवातीच्या टप्प्यात देशात सरासरीच्या 98 टके पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात सुधारीत अंदाज वर्तवताना 95 टक्के पाऊस पडेल असं सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 5, 2011 03:47 PM IST

दुबार पेरणी करणार्‍या शेतकर्‍यांना मोफत बियाणे द्यावीत - एकनाथ खडसे

05 जुलै

राज्यात पाऊस कमी पडल्याने शेतकर्‍यांपुढे दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलं आहे. त्यामुळे तो अडचणीत सापडला आहेत. अशा परिस्थितीत सरकार मात्र सुस्त आहे असा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला. अडचणीत सापडलेल्या शेतक र्‍यांना खतं आणि बी बियाणे मोफत द्यावीत अशी मागणीही एकनाथ खडसे यांनी केली.

पावसाने दडी मारल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी दुबार पेरणीचं संकट ओढावले आहेत. वर्धा जिल्ह्यात 75 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पण पंधरा दिवसांपासून पाऊस गायब झाल्यामुळे कपाशी आणि सोयाबीनची पिकं वाळत आहेत. पिकाना मजूर लावून हाताने पाणी देण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली. पाणी टाकणार्‍या मजुरांना दिवसाला दीडशे रुपये मजूरी द्यावी लागतेय त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटकाही बसत आहे.

दोन-तीन दिवसात पाऊस पडले !

पावसाने सध्या ओढ दिली असली तरी चिंता करण्याचे कारण नाही असं पुणे वेधशाळेच्या अधिकार्‍यांचे म्हणणं आहे. येत्या दोन-तीन दिवसात पाऊस पडले असा वेधशाळेचा अंदाज आहे. जून महिन्याची पावसाची जी सरासरी आहे. त्यापेक्षा 10 टक्के जास्त पाऊस पडला.

गेल्या वर्षी जून महिन्यात सरासरीच्या 16 टक्के कमी पाऊस पडला होता. अर्थात गुजरात, सौराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झालीय अशी माहिती पुणे वेधशाळेचे वरिष्ठ संचालक ए.बी. मजुमदार यांनी व्यक्त केली.

हवामान विभागाने सुरवातीच्या टप्प्यात देशात सरासरीच्या 98 टके पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात सुधारीत अंदाज वर्तवताना 95 टक्के पाऊस पडेल असं सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 5, 2011 03:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close