S M L

'आदर्श'च्या 3 आरोपींना जामीन

05 जुलैआदर्श सोसायटी फाईल गहाळ प्रकरणातील तीनही आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. किल्ला कोर्टाने हा निर्णय दिला. हे तीनही अधिकारी नगरविकास खात्याचे आहेत. क्लर्क वामन राऊळ, डेस्क ऑफिसर गुरूदत्त वाजपे आणि टाऊन प्लानर एन. एन. नार्वेकर या तीघांना आदर्श प्रकरणातील मुख्य कागदपत्रं गहाळ झाल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. यावर पुरावे गोळा करून 60 दिवसांच्या आत सीबीआयला या तिघांविरोधात चार्जशीट फाईल करण्याचे आदेश देण्यात आले होते. पण ही चार्जशीट दाखल करण्यात सीबीआय असमर्थ ठरल्याने या तीनही आरोपींची एक लाखाच्या जामीनावर सुटका झाली. याबद्दल सीबीआयशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी 'आदर्श प्रकरणाचा आवाका मोठा असल्याने चार्जशीट दाखल करण्यास वेळ लागत असल्याचं म्हटलं. पण याचा आदर्श भ्रष्टाचार प्रकरणावर मात्र मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 5, 2011 11:34 AM IST

'आदर्श'च्या 3 आरोपींना जामीन

05 जुलै

आदर्श सोसायटी फाईल गहाळ प्रकरणातील तीनही आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. किल्ला कोर्टाने हा निर्णय दिला. हे तीनही अधिकारी नगरविकास खात्याचे आहेत. क्लर्क वामन राऊळ, डेस्क ऑफिसर गुरूदत्त वाजपे आणि टाऊन प्लानर एन. एन. नार्वेकर या तीघांना आदर्श प्रकरणातील मुख्य कागदपत्रं गहाळ झाल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

यावर पुरावे गोळा करून 60 दिवसांच्या आत सीबीआयला या तिघांविरोधात चार्जशीट फाईल करण्याचे आदेश देण्यात आले होते. पण ही चार्जशीट दाखल करण्यात सीबीआय असमर्थ ठरल्याने या तीनही आरोपींची एक लाखाच्या जामीनावर सुटका झाली.

याबद्दल सीबीआयशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी 'आदर्श प्रकरणाचा आवाका मोठा असल्याने चार्जशीट दाखल करण्यास वेळ लागत असल्याचं म्हटलं. पण याचा आदर्श भ्रष्टाचार प्रकरणावर मात्र मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 5, 2011 11:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close