S M L

होमोसेक्स 'रोग' वक्तव्यावर तो मी नव्हेची आझाद यांची भूमिका

05 जुलैकेंद्रीय आरोग्य मंत्री गुलाम नबी आझाद यांनी एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे. होमोसेक्श्युलिटी म्हणजेच समलैंगिक संबंध अनैसर्गिक आहेत तसेच तो एक आजार आहे असं मत आझाद यांनी व्यक्त केलं होतं. आरोग्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर गे ऍक्टिव्हिस्टमध्ये तीव्र नाराजी पसरली. त्यामुळेच आझाद यांनी आपल्या वक्तव्यावर आज स्पष्टीकरण दिलं. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेल्याचे त्यांनी म्हटलं आहे. दिल्लीत एड्सबद्दलच्या झालेल्या एका परिषदेत असं खळबळजनक वक्तव्य केलं होतं. समलैंगिक संबंधांची पद्धत परदेशातून भारतात आली. आणि त्यामुळे पसरणार्‍या रोगांना आळा घालणे अवघड आहे. असं ही आझाद यांनी म्हटलं. शरीरविक्रय करणार्‍या महिलांचा शोध घेणं आणि त्यांना औषधं पुरवणं सोपं असतं. आरोग्य मंत्रालय आणि एनजीओ च्या प्रयत्नांमुळे अशा महिलांमध्ये संसर्गजन्य रोगांना 50 टक्के आळा बसला आहे. पण गे लोकांना शोधणं कठीण असतं असंही वक्तव्य त्यांनी केलं. विशेष म्हणजे दिल्ली हायकोर्टाने जुलै 2009 मध्ये समलैंगिक संबंध कायदेशीर असल्याचा निर्णय दिला होता. तसेच असे संबंध ठेवणार्‍यांना गुन्हेगार ठरवण्याचे घटनेतीलं कलम रद्द करायला हवं असं मत व्यक्त केलं होतं. पण, खुद्द आरोग्य मंत्र्यांनीच असे संबंध अनैसर्गिक असल्याचे म्हटलं आहे. आणि त्यावर तीव्र चिंताही व्यक्त केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 5, 2011 05:22 PM IST

होमोसेक्स 'रोग' वक्तव्यावर तो मी नव्हेची आझाद यांची भूमिका

05 जुलै

केंद्रीय आरोग्य मंत्री गुलाम नबी आझाद यांनी एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे. होमोसेक्श्युलिटी म्हणजेच समलैंगिक संबंध अनैसर्गिक आहेत तसेच तो एक आजार आहे असं मत आझाद यांनी व्यक्त केलं होतं. आरोग्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर गे ऍक्टिव्हिस्टमध्ये तीव्र नाराजी पसरली. त्यामुळेच आझाद यांनी आपल्या वक्तव्यावर आज स्पष्टीकरण दिलं. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

दिल्लीत एड्सबद्दलच्या झालेल्या एका परिषदेत असं खळबळजनक वक्तव्य केलं होतं. समलैंगिक संबंधांची पद्धत परदेशातून भारतात आली. आणि त्यामुळे पसरणार्‍या रोगांना आळा घालणे अवघड आहे. असं ही आझाद यांनी म्हटलं. शरीरविक्रय करणार्‍या महिलांचा शोध घेणं आणि त्यांना औषधं पुरवणं सोपं असतं.

आरोग्य मंत्रालय आणि एनजीओ च्या प्रयत्नांमुळे अशा महिलांमध्ये संसर्गजन्य रोगांना 50 टक्के आळा बसला आहे. पण गे लोकांना शोधणं कठीण असतं असंही वक्तव्य त्यांनी केलं. विशेष म्हणजे दिल्ली हायकोर्टाने जुलै 2009 मध्ये समलैंगिक संबंध कायदेशीर असल्याचा निर्णय दिला होता. तसेच असे संबंध ठेवणार्‍यांना गुन्हेगार ठरवण्याचे घटनेतीलं कलम रद्द करायला हवं असं मत व्यक्त केलं होतं. पण, खुद्द आरोग्य मंत्र्यांनीच असे संबंध अनैसर्गिक असल्याचे म्हटलं आहे. आणि त्यावर तीव्र चिंताही व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 5, 2011 05:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close