S M L

मायावती सरकार शेतकर्‍यांची लूट करते - राहुल गांधी

06 जुलै उत्तर प्रदेशात राहुल गांधी यांनी पदयात्रा सुरू केली. त्याचा आज दुसरा दिवस आहे. या यात्रेदरम्यान त्यांनी मुख्यमंत्री मायावती यांना लक्ष्य केलंय. सरकारने जबरदस्तीने शेतकर्‍यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या आणि गरीब शेतकर्‍यांना निराधार केलं. सरकार शेतकर्‍यांची लूट करतं आहे असा आरोप राहुल यांनी केला. भट्टा पारसौलपासून सुरू झालेली राहुल यांची ही यात्रा 9 जुलै रोजी अलिगडला संपणार आहे. तिथं काँग्रेसची महाकिसान रॅली होणार आहे. आज त्यांनी अलिगड जिल्ह्यात प्रवेश केला. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने अलिगडमध्ये कलम 144 लावलंय. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध मायावती असा संघर्ष रंगण्याची चिन्हं आहेत.राहुल गांधी यांच्या पदयात्रेत काँग्रेसमधला एकही मोठा नेता नाही. राहुल यांचा हा वन मॅन शो आहे. 165 किलोमीटरच्या या यात्रेत राहुल खेड्यापाड्यातल्या लोकांमध्ये मिसळत आहे. लोकांशी गप्पा मारतायत. राहुल यांची ही पदयात्रा यशस्वी होते की नाही हे मात्र 2012 च्या विधानसभा निवडणुकीतच ठरणार आहे.राहुल गांधी यांच्या किसान संदेश यात्रेमुळे उत्तर प्रदेशचे राजकारण ढवळून निघालंय. वाटेतल्या लोकांशी अचानक संवाद साधत. फोटोसाठी पोज देत आणि मीडियाला आपल्या मागे धावायला लावत राहुल गांधींची पदयात्रा सुरू आहे.आतापर्यंत त्यांच्या यात्रेनं 65 किलोमीटरचे अंतर तुडवलंय. आणि अजून 100 किलोमीटरचे अंतर पूर्ण करायचं आहे. यादरम्यान रस्त्यात राहुल यांचे चौपालही सुरू आहेत.165 किलोमीटरवरच्या यमुना एक्सप्रेसवेवरच्या गावांना भेटीगाठी देत ही यात्रा पुढे सरकतंय. हाच तो पट्टा आहे जिथं जमीन संपादनाविरोधात गेल्या वर्षभरात हिंसक आंदोलन झाली आहेत.पण राहुल यांच्या या यात्रेमुळे सर्वच जण प्रभावित झालेत असं मात्र नाही.दिग्विजय सिंग किंवा इतर ज्येष्ठ नेते या पदयात्रेत नाहीत. राहुल यांचा हा वन मॅन शो आहे. हसून लोकांना अभिवादन करत त्यांचं म्हणणं ऐकून घेत आणि त्यांचे आभार मानत राहुल रस्ता तुडवत आहे. पण या यात्रेतल्या गर्दीचे रुपांतर 2012 च्या निवडणुकीच्या मतदानात झालं नाही तर ही यात्रा अपयशी ठरेल, याची जाणीवही राहुल गांधी यांना आहे. एक राजकारणी म्हणून उत्तर प्रदेशातल्या निवडणुका म्हणजे राहुल यांची परिक्षा आहे. तिथं होणारा काँग्रेसचा विजय किंवा पराभव हा राहुल यांचा विजय किंवा पराभव असेल. त्यामुळे राहुल यांना अजून बराच पल्ला गाठायचा आहे.दरम्यान, राहुल गांधी यांनी काल रात्री अहलावलपूरमधील एका गावकर्‍याच्या घरी मुक्काम केला. एका साध्या पलंगावर ते झोपले. आणि रोटी, भाजी, आणि ताक असं साधं जेवण घेतलं. त्यांचा पाहुणचार करण्यासाठी गावकर्‍यांनी मोठी गर्दी केली होती. राहुल यांच्या सुरक्षा रक्षकांसाठीही गावकर्‍यांनी वेगळं नियोजन केलं होतं.दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांना धक्का दिला. ग्रेटर नोएडा प्राधिकरणाने केलेलं जमीन संपादन सुप्रीम कोर्टाने रद्द केलं. आणि त्या जमिनी शेतकर्‍यांना परत करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे या जमिनींवरच्या प्रकल्पांमध्ये ज्यांनी गुंतवणूक केलीय, त्यांना धक्का बसला. ग्रेटर नोएडा प्राधिकरणाने साहबेरीमध्ये 156 एकर जमीन ताब्यात घेतली होती आणि हाऊसिंग प्रकल्पांसाठी ही जमीन देण्यात आली होती. पण, कोर्टाच्या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना ही जमीन सोडावी लागणार आहे

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 6, 2011 06:01 PM IST

मायावती सरकार शेतकर्‍यांची लूट करते - राहुल गांधी

06 जुलै

उत्तर प्रदेशात राहुल गांधी यांनी पदयात्रा सुरू केली. त्याचा आज दुसरा दिवस आहे. या यात्रेदरम्यान त्यांनी मुख्यमंत्री मायावती यांना लक्ष्य केलंय. सरकारने जबरदस्तीने शेतकर्‍यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या आणि गरीब शेतकर्‍यांना निराधार केलं. सरकार शेतकर्‍यांची लूट करतं आहे असा आरोप राहुल यांनी केला.

भट्टा पारसौलपासून सुरू झालेली राहुल यांची ही यात्रा 9 जुलै रोजी अलिगडला संपणार आहे. तिथं काँग्रेसची महाकिसान रॅली होणार आहे. आज त्यांनी अलिगड जिल्ह्यात प्रवेश केला. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने अलिगडमध्ये कलम 144 लावलंय. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध मायावती असा संघर्ष रंगण्याची चिन्हं आहेत.

राहुल गांधी यांच्या पदयात्रेत काँग्रेसमधला एकही मोठा नेता नाही. राहुल यांचा हा वन मॅन शो आहे. 165 किलोमीटरच्या या यात्रेत राहुल खेड्यापाड्यातल्या लोकांमध्ये मिसळत आहे. लोकांशी गप्पा मारतायत. राहुल यांची ही पदयात्रा यशस्वी होते की नाही हे मात्र 2012 च्या विधानसभा निवडणुकीतच ठरणार आहे.

राहुल गांधी यांच्या किसान संदेश यात्रेमुळे उत्तर प्रदेशचे राजकारण ढवळून निघालंय. वाटेतल्या लोकांशी अचानक संवाद साधत. फोटोसाठी पोज देत आणि मीडियाला आपल्या मागे धावायला लावत राहुल गांधींची पदयात्रा सुरू आहे.आतापर्यंत त्यांच्या यात्रेनं 65 किलोमीटरचे अंतर तुडवलंय. आणि अजून 100 किलोमीटरचे अंतर पूर्ण करायचं आहे. यादरम्यान रस्त्यात राहुल यांचे चौपालही सुरू आहेत.

165 किलोमीटरवरच्या यमुना एक्सप्रेसवेवरच्या गावांना भेटीगाठी देत ही यात्रा पुढे सरकतंय. हाच तो पट्टा आहे जिथं जमीन संपादनाविरोधात गेल्या वर्षभरात हिंसक आंदोलन झाली आहेत.पण राहुल यांच्या या यात्रेमुळे सर्वच जण प्रभावित झालेत असं मात्र नाही.

दिग्विजय सिंग किंवा इतर ज्येष्ठ नेते या पदयात्रेत नाहीत. राहुल यांचा हा वन मॅन शो आहे. हसून लोकांना अभिवादन करत त्यांचं म्हणणं ऐकून घेत आणि त्यांचे आभार मानत राहुल रस्ता तुडवत आहे.

पण या यात्रेतल्या गर्दीचे रुपांतर 2012 च्या निवडणुकीच्या मतदानात झालं नाही तर ही यात्रा अपयशी ठरेल, याची जाणीवही राहुल गांधी यांना आहे. एक राजकारणी म्हणून उत्तर प्रदेशातल्या निवडणुका म्हणजे राहुल यांची परिक्षा आहे. तिथं होणारा काँग्रेसचा विजय किंवा पराभव हा राहुल यांचा विजय किंवा पराभव असेल. त्यामुळे राहुल यांना अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी काल रात्री अहलावलपूरमधील एका गावकर्‍याच्या घरी मुक्काम केला. एका साध्या पलंगावर ते झोपले. आणि रोटी, भाजी, आणि ताक असं साधं जेवण घेतलं. त्यांचा पाहुणचार करण्यासाठी गावकर्‍यांनी मोठी गर्दी केली होती. राहुल यांच्या सुरक्षा रक्षकांसाठीही गावकर्‍यांनी वेगळं नियोजन केलं होतं.

दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांना धक्का दिला. ग्रेटर नोएडा प्राधिकरणाने केलेलं जमीन संपादन सुप्रीम कोर्टाने रद्द केलं. आणि त्या जमिनी शेतकर्‍यांना परत करण्याचे आदेश दिलेत.

त्यामुळे या जमिनींवरच्या प्रकल्पांमध्ये ज्यांनी गुंतवणूक केलीय, त्यांना धक्का बसला. ग्रेटर नोएडा प्राधिकरणाने साहबेरीमध्ये 156 एकर जमीन ताब्यात घेतली होती आणि हाऊसिंग प्रकल्पांसाठी ही जमीन देण्यात आली होती. पण, कोर्टाच्या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना ही जमीन सोडावी लागणार आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 6, 2011 06:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close