S M L

'कॅप्टन' विना महाडदळकर 'टीम' जाहीर ; विलासरावांना पवारांचा पाठिंबा

06 जुलैएमसीएच्या अध्यक्षपदासाठी विलासराव देशमुख यांना शरद पवार यांचा पाठिंबा मिळणार आहे. आज पवार-महाडदळकर पॅनेल जाहीर करण्यात आलं. त्यात विलासराव देशमुख यांना पाठिंबा देण्याचा निर्णय या गटाने घेतला आहे. शरद पवार यांनी एमसीए अध्यक्षपदासाठीच्या शर्यतीतून माघार घेतली होती. मुंबईत कायमस्वरुपी वास्तव्य नसल्याने पवार यांनी हा निर्णय घेतला. विलासराव यांच्या पासपोर्टवर मात्र मुंबईचाच पत्ता असल्याने त्यांना ही अडचण येणार नसल्याचे त्यांच्या समर्थकांच म्हणणं आहे. त्यामुळे एमसीए अध्यक्षपदासाठी आता विलासराव देशमुख विरुध्द दिलीप वेंगसरकर अशी लढत पाहयला मिळणार आहे. मुंबई क्रिकेट संघटनेच्या उपाध्यक्षपदासाठी महाडदळकर गटाने प्रा. रत्नाकर शेट्टी आणि भाजपाचे आशिष शेलार यांना उमेदवारी दिली. संयुक्त सचिवपदासाठी डॉ. पी. व्ही. शेट्टी आणि नितीन दलाल उभे राहणार आहेत. तर खजिनदारपदासाठी रवी सावंत निवडणूक लढवतील. रवी सावंत बिनविरोध निवडुन येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय महाडदळकर गटाने कार्यकारणीच्या सर्व 11 जांगासाठी उमेदवार उभे केले आहेत. मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत सध्या खेळाडू विरुध्द राजकारणी असं स्वरुप आलंय. दिलिप वेंगसरकर यांनी अध्यक्षपदासाठी उभं राहतानाच खेळाडू जिंदाबादचा नारा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. पवार पारसी पायोनियर क्लबचे प्रतिनिधीत्व करतात. पण यंदा ते निवडणूक लढवणार नाहीत. काँग्रेसचे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यंदा अध्यक्षपदाची निवडणुक लढवणार आहेत. विलासराव माझगाव क्रिकेट क्लबचे सदस्य आहेत पवार महाडदळकर गटातून भाजपचे आशिष शेलारही उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. शेलार राजस्थान क्रिकेट क्लबचे प्रतिनिधीत्व करतात. नारायण राणे निवडणुकीच्या रिंगणात अद्याप उतरलेले नाहीत. पण ते मतदार मात्र आहेत. इलेव्हन सेव्हंटी सेव्हन स्पोर्ट्स क्लबतर्फे ते मतदान करणार आहेत. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड मांडवी मुस्लिम क्लबचे मेंबर आहेत. शिवसेनेचे उध्दव ठाकरे यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकरही यामध्ये मागे नाहीत. मुंबई क्रिकेट संघटनेत ते डॅशिंग स्पोर्ट्स क्लबचे प्रतिनिधीत्व करतात.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 6, 2011 01:23 PM IST

'कॅप्टन' विना महाडदळकर 'टीम' जाहीर ; विलासरावांना पवारांचा पाठिंबा

06 जुलै

एमसीएच्या अध्यक्षपदासाठी विलासराव देशमुख यांना शरद पवार यांचा पाठिंबा मिळणार आहे. आज पवार-महाडदळकर पॅनेल जाहीर करण्यात आलं. त्यात विलासराव देशमुख यांना पाठिंबा देण्याचा निर्णय या गटाने घेतला आहे. शरद पवार यांनी एमसीए अध्यक्षपदासाठीच्या शर्यतीतून माघार घेतली होती.

मुंबईत कायमस्वरुपी वास्तव्य नसल्याने पवार यांनी हा निर्णय घेतला. विलासराव यांच्या पासपोर्टवर मात्र मुंबईचाच पत्ता असल्याने त्यांना ही अडचण येणार नसल्याचे त्यांच्या समर्थकांच म्हणणं आहे. त्यामुळे एमसीए अध्यक्षपदासाठी आता विलासराव देशमुख विरुध्द दिलीप वेंगसरकर अशी लढत पाहयला मिळणार आहे.

मुंबई क्रिकेट संघटनेच्या उपाध्यक्षपदासाठी महाडदळकर गटाने प्रा. रत्नाकर शेट्टी आणि भाजपाचे आशिष शेलार यांना उमेदवारी दिली. संयुक्त सचिवपदासाठी डॉ. पी. व्ही. शेट्टी आणि नितीन दलाल उभे राहणार आहेत. तर खजिनदारपदासाठी रवी सावंत निवडणूक लढवतील. रवी सावंत बिनविरोध निवडुन येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय महाडदळकर गटाने कार्यकारणीच्या सर्व 11 जांगासाठी उमेदवार उभे केले आहेत.

मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत सध्या खेळाडू विरुध्द राजकारणी असं स्वरुप आलंय. दिलिप वेंगसरकर यांनी अध्यक्षपदासाठी उभं राहतानाच खेळाडू जिंदाबादचा नारा दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. पवार पारसी पायोनियर क्लबचे प्रतिनिधीत्व करतात. पण यंदा ते निवडणूक लढवणार नाहीत. काँग्रेसचे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यंदा अध्यक्षपदाची निवडणुक लढवणार आहेत.

विलासराव माझगाव क्रिकेट क्लबचे सदस्य आहेत पवार महाडदळकर गटातून भाजपचे आशिष शेलारही उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. शेलार राजस्थान क्रिकेट क्लबचे प्रतिनिधीत्व करतात. नारायण राणे निवडणुकीच्या रिंगणात अद्याप उतरलेले नाहीत.

पण ते मतदार मात्र आहेत. इलेव्हन सेव्हंटी सेव्हन स्पोर्ट्स क्लबतर्फे ते मतदान करणार आहेत. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड मांडवी मुस्लिम क्लबचे मेंबर आहेत. शिवसेनेचे उध्दव ठाकरे यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकरही यामध्ये मागे नाहीत. मुंबई क्रिकेट संघटनेत ते डॅशिंग स्पोर्ट्स क्लबचे प्रतिनिधीत्व करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 6, 2011 01:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close