S M L

अण्णांनी केलं भ्रष्टाचाराचा निषेधार्थ बत्ती बंदच आवाहन

06 जुलैज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात 15 ऑगस्टला एक तास लाईट बंद ठेवून भ्रष्टाचाराचा निषेध करावा असं आवाहन केलं आहे. लोकपाल विधेयकासाठी लढा देण्याचा अण्णांचा निर्धार कायम आहे. त्यांनी राळेगणसिद्धीतून देशभरातल्या नागरिकांना आवाहन केलं आहे. 16 ऑगस्टला अण्णांचे उपोषण सुरू होणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून येत्या 15 ऑगस्टला 63 वर्ष पूर्ण होत आहे. एकीकडे स्वातंत्र्यतेची फळ चाखत असताना आता त्यात भ्रष्टाचाराचे विष पसरलं आहे. या भ्रष्टाचाराच्या विरोधात जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी जन लोकपाल कायदा अंमलात आणण्यासाठी लढा सुरू केला आहेत. आता पर्यंत झालेल्या सरकारशी चर्चेतून कोणताही तोडगा निघू शकला नाही. येत्या 16 ऑगस्टपासून अण्णा हजारे पुन्हा उपोषणावर बसणार आहे. 15 ऑगस्टला राष्ट्र ध्वजाला सलाम करून रात्री आठ वाजता एक तास लाईट बंद ठेवून भ्रष्टाचाराचा निषेध करूया कारण भारताला स्वातंत्र्य मिळून 63 वर्ष पूर्ण होत आहे तरी सुध्दा सर्वत्र अंधार पसरला आहे. कोणत्याही क्षेत्रात उजेड पोहचला नाही.याचा निषेध आपण सर्व मिळून करूया असं आवाहन अण्णा हजारे यांनी लोकांना केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 6, 2011 06:23 PM IST

अण्णांनी केलं भ्रष्टाचाराचा निषेधार्थ बत्ती बंदच आवाहन

06 जुलै

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात 15 ऑगस्टला एक तास लाईट बंद ठेवून भ्रष्टाचाराचा निषेध करावा असं आवाहन केलं आहे. लोकपाल विधेयकासाठी लढा देण्याचा अण्णांचा निर्धार कायम आहे. त्यांनी राळेगणसिद्धीतून देशभरातल्या नागरिकांना आवाहन केलं आहे. 16 ऑगस्टला अण्णांचे उपोषण सुरू होणार आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळून येत्या 15 ऑगस्टला 63 वर्ष पूर्ण होत आहे. एकीकडे स्वातंत्र्यतेची फळ चाखत असताना आता त्यात भ्रष्टाचाराचे विष पसरलं आहे. या भ्रष्टाचाराच्या विरोधात जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी जन लोकपाल कायदा अंमलात आणण्यासाठी लढा सुरू केला आहेत. आता पर्यंत झालेल्या सरकारशी चर्चेतून कोणताही तोडगा निघू शकला नाही.

येत्या 16 ऑगस्टपासून अण्णा हजारे पुन्हा उपोषणावर बसणार आहे. 15 ऑगस्टला राष्ट्र ध्वजाला सलाम करून रात्री आठ वाजता एक तास लाईट बंद ठेवून भ्रष्टाचाराचा निषेध करूया कारण भारताला स्वातंत्र्य मिळून 63 वर्ष पूर्ण होत आहे तरी सुध्दा सर्वत्र अंधार पसरला आहे. कोणत्याही क्षेत्रात उजेड पोहचला नाही.याचा निषेध आपण सर्व मिळून करूया असं आवाहन अण्णा हजारे यांनी लोकांना केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 6, 2011 06:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close