S M L

चारही स्तंभ कमकुवत झाल्यामुळे लोकपाल - उध्दव ठाकरे

06 जुलैलोकपाल विधेयकाच्या मसुद्यावर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यावेळी या बैठकीत शिवसेना सहभागी झाली नव्हती. पण आता मात्र शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी लोकपाल विधेयकावर टीका केली. देशाचे चारही स्तंभ कमकुवत झालेत म्हणूनच लोकपाल आणला जात आहे अशी टीका उध्दव ठाकरे यांनी केली आहे. पंतप्रधानांना लोकपालाच्या कक्षेत आणण्याची चर्चा सुरू आहे. मग राष्ट्रपतींचे काय करणार असा प्रश्न त्यांनी विचारला. लोकपालाला मुबलक अधिकार दिल्यावर तो उन्मत्त होईल. त्याच्यावर कोण अंकुश ठेवणार या सर्व गोष्टींचा विचार होणं गरजेचं असल्याचे उद्धव यांनी म्हटलं आहे. लोकपालाचा मसुदा काय आहे हे पहिल्यांदा पाहावे लागेल असंही त्यांनी स्पष्ट केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 6, 2011 05:39 PM IST

चारही स्तंभ कमकुवत झाल्यामुळे लोकपाल - उध्दव ठाकरे

06 जुलै

लोकपाल विधेयकाच्या मसुद्यावर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यावेळी या बैठकीत शिवसेना सहभागी झाली नव्हती. पण आता मात्र शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी लोकपाल विधेयकावर टीका केली. देशाचे चारही स्तंभ कमकुवत झालेत म्हणूनच लोकपाल आणला जात आहे अशी टीका उध्दव ठाकरे यांनी केली आहे.

पंतप्रधानांना लोकपालाच्या कक्षेत आणण्याची चर्चा सुरू आहे. मग राष्ट्रपतींचे काय करणार असा प्रश्न त्यांनी विचारला. लोकपालाला मुबलक अधिकार दिल्यावर तो उन्मत्त होईल. त्याच्यावर कोण अंकुश ठेवणार या सर्व गोष्टींचा विचार होणं गरजेचं असल्याचे उद्धव यांनी म्हटलं आहे. लोकपालाचा मसुदा काय आहे हे पहिल्यांदा पाहावे लागेल असंही त्यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 6, 2011 05:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close