S M L

संरक्षक भिंत कोसळून 11 जण ठार

8 जुलैमीरा रोड इथल्या काशिमीरामध्ये एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. काशिमीरा पोलीस स्टेशनच्या मागे ही घटना घडली. या इमारतीची संरक्षक भिंत झोपड्यांवर कोसळली. इथल्या ढिगा-याखालून फायर ब्रिगेडनं आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढले आहेत. ढिगा-या उपसण्याचं काम पूर्ण झालंय. याप्रकरणी तन्वी ग्रुप ऑफ कंपनीजच्या भूपत लुखी, बायाभाई सुखरीया आणि संगीता विजय कुमार या तीन संचालकांविरूद्ध कलम 304 प्रमाणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल मीरा रोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.मीरारोडमध्ये झालेल्या अपघाताला डेव्हलपर जय कुमारच जबाबदार असल्याचं राष्ट्रवादीचे स्थानिक खासदार संजीव नाईक यांनी म्हटलंय. दोषींवर ताबडतोब कारवाईचे आदेशही त्यांनी पोलीस आयुक्तांना दिलेत. शिवसेनेचे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी मात्र या अपघातासाठी महानगरपालिका आणि राज्य सरकारला दोषी ठरवलंय. हा संपूर्ण भाग दलदलीचा आहे. आणि तिथेच भराव टाकून मोठमोठ्या इमारती बांधणं सुरू आहे. त्यासाठी सीआरझेड कायद्याचं सर्रास उल्लंघन होत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 8, 2011 02:31 PM IST

संरक्षक भिंत कोसळून 11 जण ठार

8 जुलै

मीरा रोड इथल्या काशिमीरामध्ये एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. काशिमीरा पोलीस स्टेशनच्या मागे ही घटना घडली. या इमारतीची संरक्षक भिंत झोपड्यांवर कोसळली. इथल्या ढिगा-याखालून फायर ब्रिगेडनं आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढले आहेत. ढिगा-या उपसण्याचं काम पूर्ण झालंय. याप्रकरणी तन्वी ग्रुप ऑफ कंपनीजच्या भूपत लुखी, बायाभाई सुखरीया आणि संगीता विजय कुमार या तीन संचालकांविरूद्ध कलम 304 प्रमाणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल मीरा रोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

मीरारोडमध्ये झालेल्या अपघाताला डेव्हलपर जय कुमारच जबाबदार असल्याचं राष्ट्रवादीचे स्थानिक खासदार संजीव नाईक यांनी म्हटलंय. दोषींवर ताबडतोब कारवाईचे आदेशही त्यांनी पोलीस आयुक्तांना दिलेत.

शिवसेनेचे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी मात्र या अपघातासाठी महानगरपालिका आणि राज्य सरकारला दोषी ठरवलंय. हा संपूर्ण भाग दलदलीचा आहे. आणि तिथेच भराव टाकून मोठमोठ्या इमारती बांधणं सुरू आहे. त्यासाठी सीआरझेड कायद्याचं सर्रास उल्लंघन होत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 8, 2011 02:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close