S M L

गिरणी कामगारांसाठी सहा कामगार संघटनात एकी

10 जुलैगिरणी कामगारांच्या हक्कांच्या घरांचे स्वप्न साकार करण्यासाठी आता गिरणी कामगारांच्या सहाही संघटना एक झाल्या आहेत. गिरणी कामगारांच्या घरासाठी एक दबावगट म्हणून या संघटना सरकार दरबारी प्रयत्न करणार आहेत. त्याचबरोबर सर्वपक्षीय नेत्यांना भेटून आपल्या मागणीसाठी पाठिंबा मिळवण्याचा या संघटनांचा प्रयत्न असणार आहे. उद्या म्हणजेच सोमवारी या संघटनांचे प्रतिनिधी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. आणि त्यानंतर ते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत. तसेच राज्याचे विरोधीपक्षनेते एकनाथ खडसे आणि शेतकरी कामगार पक्षाचे गणपतराव देशमुख यांचीसुद्धा लवकरच भेट घेऊन आपल्या समस्या त्यांच्या कानावर घालणार असल्याचे या संघटनांनी सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 10, 2011 12:58 PM IST

गिरणी कामगारांसाठी सहा कामगार संघटनात एकी

10 जुलै

गिरणी कामगारांच्या हक्कांच्या घरांचे स्वप्न साकार करण्यासाठी आता गिरणी कामगारांच्या सहाही संघटना एक झाल्या आहेत. गिरणी कामगारांच्या घरासाठी एक दबावगट म्हणून या संघटना सरकार दरबारी प्रयत्न करणार आहेत. त्याचबरोबर सर्वपक्षीय नेत्यांना भेटून आपल्या मागणीसाठी पाठिंबा मिळवण्याचा या संघटनांचा प्रयत्न असणार आहे.

उद्या म्हणजेच सोमवारी या संघटनांचे प्रतिनिधी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. आणि त्यानंतर ते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत. तसेच राज्याचे विरोधीपक्षनेते एकनाथ खडसे आणि शेतकरी कामगार पक्षाचे गणपतराव देशमुख यांचीसुद्धा लवकरच भेट घेऊन आपल्या समस्या त्यांच्या कानावर घालणार असल्याचे या संघटनांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 10, 2011 12:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close