S M L

कालका एक्सप्रेस घसरली 35 ठार

10 जुलैउत्तरप्रदेशात हावडा-दिल्ली कालका एक्सप्रेसचे 13 डबे रुळावरुन घसरली. या अपघातात मृतांचा आकडा वाढत चालला आहे. आत्तापर्यंत 35 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 140 प्रवासी जखमी आहेत. रेल्वे प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख तर गंभीर जखमी झालेल्यांना 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली. किरकोळ जखमींना 25 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात केली. फत्तेपूर-मालवाजवळ हा अपघात झाला. या अपघातामुळे हावडा-दिल्ली रेल्वे मार्ग ठप्प झाला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत 15 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहे. 23 गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला. गाडी ताशी 108 किलोमीटरच्या वेगाने धावत असताना ड्रायव्हरने अचानक ब्रेक दाबल्यामुळे हा अपघात झाला. यात एसी 3 टीयर, पॅन्ट्री कार, 5 स्लीपर कोच आणि जनरल कम्पार्टमेंटचे 2 डबे रुळावरून घसरले. ड्रायवर आणि असिस्टंट ड्रायवर दोघंही गंभीर जखमी झाले आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बलाच्या तीन तुकड्या आणि आर्मीचे जवान बचावकार्य करत आहे. रेल्वे प्रशासनाने अपघातच्या चौकशीसाठी चौकशी आयोग नेमला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 10, 2011 10:41 AM IST

कालका एक्सप्रेस घसरली 35 ठार

10 जुलै

उत्तरप्रदेशात हावडा-दिल्ली कालका एक्सप्रेसचे 13 डबे रुळावरुन घसरली. या अपघातात मृतांचा आकडा वाढत चालला आहे. आत्तापर्यंत 35 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 140 प्रवासी जखमी आहेत. रेल्वे प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख तर गंभीर जखमी झालेल्यांना 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली. किरकोळ जखमींना 25 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात केली.

फत्तेपूर-मालवाजवळ हा अपघात झाला. या अपघातामुळे हावडा-दिल्ली रेल्वे मार्ग ठप्प झाला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत 15 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहे. 23 गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला. गाडी ताशी 108 किलोमीटरच्या वेगाने धावत असताना ड्रायव्हरने अचानक ब्रेक दाबल्यामुळे हा अपघात झाला.

यात एसी 3 टीयर, पॅन्ट्री कार, 5 स्लीपर कोच आणि जनरल कम्पार्टमेंटचे 2 डबे रुळावरून घसरले. ड्रायवर आणि असिस्टंट ड्रायवर दोघंही गंभीर जखमी झाले आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बलाच्या तीन तुकड्या आणि आर्मीचे जवान बचावकार्य करत आहे. रेल्वे प्रशासनाने अपघातच्या चौकशीसाठी चौकशी आयोग नेमला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 10, 2011 10:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close