S M L

'एमसीए'च्या निवडणुकीत 42 उमेदवार रिंगणात

12 जुलैमुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झालं आहे. अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. आता एमसीएच्या 17 पदांसाठी एकुण 42 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अध्यक्षपदासाठी विलासराव देशमुख आणि दिलीप वेंगसरकर यांच्यात थेट लढत रंगणार आहे. प्रवीण बर्वे यांनी अध्यक्षपदापदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. प्रवीण बर्वे यांनी अध्यक्षपदाबरोबरच उपाध्यक्ष, खजिनदार आणि संयुक्त सचिव अशा चार पदांसाठी अर्ज केला होता. पण एका व्यक्तिला केवळ एका पदासाठीच अर्ज करता येणार असल्याने प्रवीण बर्वे हे आता खजिनदार पदासाठी निवडणूक लढवतील. याबरोबरच वेंगसरकर पॅनेलमधील चंद्रकांत पंडित कार्यकारिणी सदस्यासाठी निवडणूक लढतील. चंद्रकांत पंडित यांनी तीन पदांसाठी अर्ज केला होता. आता अध्यक्षपदासाठी 2, उपाध्यक्षपदासाठी 5, खजिनदारपदासाठी 3, संयुक्त सचिव पदासाठी 3 तर कार्यकारिणीसाठी 29 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 12, 2011 10:36 AM IST

'एमसीए'च्या निवडणुकीत 42 उमेदवार रिंगणात

12 जुलै

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झालं आहे. अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. आता एमसीएच्या 17 पदांसाठी एकुण 42 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अध्यक्षपदासाठी विलासराव देशमुख आणि दिलीप वेंगसरकर यांच्यात थेट लढत रंगणार आहे.

प्रवीण बर्वे यांनी अध्यक्षपदापदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. प्रवीण बर्वे यांनी अध्यक्षपदाबरोबरच उपाध्यक्ष, खजिनदार आणि संयुक्त सचिव अशा चार पदांसाठी अर्ज केला होता. पण एका व्यक्तिला केवळ एका पदासाठीच अर्ज करता येणार असल्याने प्रवीण बर्वे हे आता खजिनदार पदासाठी निवडणूक लढवतील.

याबरोबरच वेंगसरकर पॅनेलमधील चंद्रकांत पंडित कार्यकारिणी सदस्यासाठी निवडणूक लढतील. चंद्रकांत पंडित यांनी तीन पदांसाठी अर्ज केला होता. आता अध्यक्षपदासाठी 2, उपाध्यक्षपदासाठी 5, खजिनदारपदासाठी 3, संयुक्त सचिव पदासाठी 3 तर कार्यकारिणीसाठी 29 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 12, 2011 10:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close