S M L

मुंबईत ऑटोकार परफॉर्मन्स शो

13 नोव्हेंबर, मुंबईअमृता दुर्वे वांद्र्याच्या एमएमआरडीए ग्राऊंडवर 'ऑटोकार परफॉर्मन्स शो-2008 ' सुरू झालाय. फॉर्म्युला वन रेसर नरेन कार्तिकेयननं या शोचं उद्घाटन केलं. देशातील आणि विदेशातील काही ऑटोमोबाईल कंपन्यांच्या गाड्या या शोमध्ये पहायला मिळणार आहेत. स्कोडा ऑटो त्यांची नवी गाडी या प्रदर्शनात लाँच करणार आहे. त्याशिवाय बीएमडब्ल्यू , रेंजरोव्हर, व्होल्वो, जनरल मोटर्स, फिएट सारख्या ऑटो कंपन्याही या शोमध्ये सहभागी झाल्यात. विशेष म्हणजे रेसिंग स्पोर्ट्स कारही या शोमध्ये ठेवण्यात आल्यात. गाड्यांसाठी लागणार्‍या इतर अ‍ॅक्सेसरीजदेखील इथं उपलब्ध आहेत. या ऑटो कार परफॉर्मन्समध्ये स्कोडा ऑटोनं त्यांची नवी कार ' स्कोडा सुपर्ब' प्रीव्ह्यूसाठी आणली होती. या कारचं लॉन्चिंग पुढल्या वर्षी मार्चमध्ये होणार आहे. त्याचवेळी कारची किंमतही जाहीर होईल, असं या शोसाठी आलेल्या स्कोडा ऑटोच्या उच्च अधिकार्‍यांनी सांगितलं. तासाला 250 किलोमीटरचा वेग देणार्‍या या कारमध्ये व्ही-टेक हे अत्याधुनिक इंजिन आहे. अवघ्या साडेसहा सेंकदात ही कार शंभरचा वेग गाठू शकते. गडद लाल रंगाची ही नवी ' स्कोडा सुपर्ब ' या शोसाठी आलेल्या अनेक कार शौकिनांचं आकर्षण ठरली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 13, 2008 02:25 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 13, 2008 02:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close