S M L

प्रथेला धुडकावत महिलांचा मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश

13 जुलैसातारा शहरापासून काही अंतरावर असलेल्या घाटाई मंदिरात कित्येक वर्षांपासून महिलांना मंदिर प्रवेश नाकारण्यात येत होता. या प्रथेला धुडकावत दलित विकास महिला मंडळाच्या कार्यकर्तांनी घाटाई देवाच्या मंदिरातील गाभार्‍यात प्रवेश केला. सातार्‍यापासून कास धरणाकडील भागात हे खूप जुने घाटाई देवीचे मंदिर आहे. या मंदिरातील गाभार्‍यात अनेक वर्षांपासून महिलांना प्रवेश बंदी होती. असा फलक ही गाभार्‍याच्या प्रवेश द्वारावर लावण्यात आला होता. याविरोधात स्त्रीशक्तीचे दर्शन घडवत ऍड.वर्षा देशपांडे यांच्यासह 50 महिलांनी या मंदिरांच्या प्रवेश द्वारावर असणारा फलक काढला आणि गाभार्‍यात प्रवेश केला. त्यावेळी घाटाई देवीची ओटीही भरण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 13, 2011 09:51 AM IST

प्रथेला धुडकावत महिलांचा मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश

13 जुलै

सातारा शहरापासून काही अंतरावर असलेल्या घाटाई मंदिरात कित्येक वर्षांपासून महिलांना मंदिर प्रवेश नाकारण्यात येत होता. या प्रथेला धुडकावत दलित विकास महिला मंडळाच्या कार्यकर्तांनी घाटाई देवाच्या मंदिरातील गाभार्‍यात प्रवेश केला. सातार्‍यापासून कास धरणाकडील भागात हे खूप जुने घाटाई देवीचे मंदिर आहे.

या मंदिरातील गाभार्‍यात अनेक वर्षांपासून महिलांना प्रवेश बंदी होती. असा फलक ही गाभार्‍याच्या प्रवेश द्वारावर लावण्यात आला होता. याविरोधात स्त्रीशक्तीचे दर्शन घडवत ऍड.वर्षा देशपांडे यांच्यासह 50 महिलांनी या मंदिरांच्या प्रवेश द्वारावर असणारा फलक काढला आणि गाभार्‍यात प्रवेश केला. त्यावेळी घाटाई देवीची ओटीही भरण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 13, 2011 09:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close