S M L

जळगावमध्ये हतनूर धरणाचे दरवाजे उघडले

14 जुलैजळगाव जिल्ह्यात पावसाने लावलेल्या दमदार हजेरीनं हतनूर धरणाचं पाणलोट क्षेत्र पूर्ण भरलं आहे. आणि मध्यप्रदेशातल्या तापी नदीच्या उगम स्थानाच्या आसपास झालेल्या पावसाचा फायदाही हतनूर धरणाला झाला. उमगस्थानाजवळच्या पावसाचे पाणीही धरणात वाहून आल्यानं हतनूर धरण भरलं आहे.त्यामुळे आता धरणाचे 24 दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणाचे 20 दरवाजे अर्ध्या मिटरने तर 4 दरवाजे दीड मिटरने उघडण्यात आले आहे. प्रति सेकंद जवळपास 34 हजार 896 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग या धरणातून आता सुरु आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत धरणाचे 36 दरवाजे उघडण्यात आले होते. प्रति सेकंद जवळपास एक लाख 23 हजार 620 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग या धरणातून सुरु होता. मध्यप्रदेशातील तापी नदीच्या उगमस्थानी झालेल्या जोरदार पावसाने हे पाणी वाहून आलं आहे. पाणी प्रकाशामार्गे सुरतच्या उकई डॅम पर्यंत जातं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 14, 2011 11:59 AM IST

जळगावमध्ये हतनूर धरणाचे दरवाजे उघडले

14 जुलै

जळगाव जिल्ह्यात पावसाने लावलेल्या दमदार हजेरीनं हतनूर धरणाचं पाणलोट क्षेत्र पूर्ण भरलं आहे. आणि मध्यप्रदेशातल्या तापी नदीच्या उगम स्थानाच्या आसपास झालेल्या पावसाचा फायदाही हतनूर धरणाला झाला. उमगस्थानाजवळच्या पावसाचे पाणीही धरणात वाहून आल्यानं हतनूर धरण भरलं आहे.

त्यामुळे आता धरणाचे 24 दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणाचे 20 दरवाजे अर्ध्या मिटरने तर 4 दरवाजे दीड मिटरने उघडण्यात आले आहे. प्रति सेकंद जवळपास 34 हजार 896 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग या धरणातून आता सुरु आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत धरणाचे 36 दरवाजे उघडण्यात आले होते. प्रति सेकंद जवळपास एक लाख 23 हजार 620 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग या धरणातून सुरु होता. मध्यप्रदेशातील तापी नदीच्या उगमस्थानी झालेल्या जोरदार पावसाने हे पाणी वाहून आलं आहे. पाणी प्रकाशामार्गे सुरतच्या उकई डॅम पर्यंत जातं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 14, 2011 11:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close