S M L

पिंपरी- चिंचवडमधील अतिक्रमणाची कारवाई पुढे ढकलली

15 जुलैपुण्यात पिंपरी चिंचवडमधील लष्कराच्या जमिनीवरच्या अतिक्रमणाची कारवाई पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही कारवाई 17 तारखेला होणार आहे. महापौर योगेश बाल यांनी ही माहिती दिली. पिंपरी-चिंचवड परिसरातल्या लष्कराच्या जागेवर नागरिकांनी घरं उभारली. महापालिकेने या नागरिकांना घरं तोडणार असल्याची नोटीस दिली होती. नागरिकांनी स्वत: घर खाली नाही केलं तर बळाचा वापर करुन घरं तोडण्याची नोटीस महापालिकेनं दिली होती.पिंपरी-चिंचवड परीसरातील लष्काराच्या जागेवर राहणार्‍या शेकडो नागरिकांच्या घरावर बुलडोजर फिरणार आहे. आपलं स्वप्नातील घर जमीन दोस्त होणार या भीतीनं नागरिकांचा मात्र थरकाप उडाला आहे. या परिसरातल्या सगळ्या नागरिकांनी आप-आपली घरे रिकामी करावी अशी अंतिम नोटीस महापालिकेकडून देण्यात आली होती. तस केलं नाही तर बळाचा वापर करुन घरं रिकामी केली जातील अश्या सुचनाही नागरिकांना देण्यात आल्या आहे. कोणतेही अतिक्रमण एैन पावसाळ्यात पाडु नयेत असा न्यायालयाचा आदेश असतांनाही महापालिका केवळे राजकारणासाठी ही कारवाई करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर महापालिकेचा टॅक्स भरत असुनही आपल्यावर ही कारवाई का केली जाते असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 15, 2011 11:54 AM IST

पिंपरी- चिंचवडमधील अतिक्रमणाची कारवाई पुढे ढकलली

15 जुलै

पुण्यात पिंपरी चिंचवडमधील लष्कराच्या जमिनीवरच्या अतिक्रमणाची कारवाई पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही कारवाई 17 तारखेला होणार आहे. महापौर योगेश बाल यांनी ही माहिती दिली. पिंपरी-चिंचवड परिसरातल्या लष्कराच्या जागेवर नागरिकांनी घरं उभारली. महापालिकेने या नागरिकांना घरं तोडणार असल्याची नोटीस दिली होती. नागरिकांनी स्वत: घर खाली नाही केलं तर बळाचा वापर करुन घरं तोडण्याची नोटीस महापालिकेनं दिली होती.

पिंपरी-चिंचवड परीसरातील लष्काराच्या जागेवर राहणार्‍या शेकडो नागरिकांच्या घरावर बुलडोजर फिरणार आहे. आपलं स्वप्नातील घर जमीन दोस्त होणार या भीतीनं नागरिकांचा मात्र थरकाप उडाला आहे. या परिसरातल्या सगळ्या नागरिकांनी आप-आपली घरे रिकामी करावी अशी अंतिम नोटीस महापालिकेकडून देण्यात आली होती.

तस केलं नाही तर बळाचा वापर करुन घरं रिकामी केली जातील अश्या सुचनाही नागरिकांना देण्यात आल्या आहे. कोणतेही अतिक्रमण एैन पावसाळ्यात पाडु नयेत असा न्यायालयाचा आदेश असतांनाही महापालिका केवळे राजकारणासाठी ही कारवाई करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर महापालिकेचा टॅक्स भरत असुनही आपल्यावर ही कारवाई का केली जाते असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 15, 2011 11:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close