S M L

भाक्रा धरणाला दहशतवादी हल्ल्याचा धोका

16 जुलैभारतातील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे धरण हिमाचलप्रदेशमधील भाक्रा धरणाला दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याचे गुप्तचर विभागाने सरकारला कळवल आहे. आयबीएन नेटवर्कला गुप्तचर खात्यांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाक्रा धरणावर लष्कर- ए - तोयबा आणि जमात- उद- दावा हल्ला करण्याची तयारी करत आहेत. पावसाळ्यात पाण्याची पातळी जास्त असल्याने यावेळी हल्ला केल्यास जास्तीत जास्त नुकसान होऊ शकतो त्यामुळे पाकिस्तानी दहशतवादी संघटना पावसाळ्यात हल्ला करण्याची शक्यता आहे. गुप्तचर विभागाने हिमाचलप्रदेश सरकारला दिलेल्या अहवालात धरणाभोवतीची सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचं सांगितले आहेत. धरणावर हल्ला करणार्‍या अतिरेक्यांना धरणाच्या भिंती चढण्याचं आणि प्रचंड साठा असलेल्या पाण्यातून पोहण्याचे प्रशिक्षण दिल्याचही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. धरणावर अतिरेकी हल्ला झाला तर धरणातीलं पाणी हिमाचलप्रदेशबरोबरच पंजाब, हरयाणा आणि दिल्ली या 3 राज्यांपर्यंत पोहचून लाखो हेक्टर जमीन आणि घरांचे नुकसान होईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 16, 2011 09:26 AM IST

भाक्रा धरणाला दहशतवादी हल्ल्याचा धोका

16 जुलैभारतातील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे धरण हिमाचलप्रदेशमधील भाक्रा धरणाला दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याचे गुप्तचर विभागाने सरकारला कळवल आहे. आयबीएन नेटवर्कला गुप्तचर खात्यांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाक्रा धरणावर लष्कर- ए - तोयबा आणि जमात- उद- दावा हल्ला करण्याची तयारी करत आहेत.

पावसाळ्यात पाण्याची पातळी जास्त असल्याने यावेळी हल्ला केल्यास जास्तीत जास्त नुकसान होऊ शकतो त्यामुळे पाकिस्तानी दहशतवादी संघटना पावसाळ्यात हल्ला करण्याची शक्यता आहे. गुप्तचर विभागाने हिमाचलप्रदेश सरकारला दिलेल्या अहवालात धरणाभोवतीची सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचं सांगितले आहेत.

धरणावर हल्ला करणार्‍या अतिरेक्यांना धरणाच्या भिंती चढण्याचं आणि प्रचंड साठा असलेल्या पाण्यातून पोहण्याचे प्रशिक्षण दिल्याचही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. धरणावर अतिरेकी हल्ला झाला तर धरणातीलं पाणी हिमाचलप्रदेशबरोबरच पंजाब, हरयाणा आणि दिल्ली या 3 राज्यांपर्यंत पोहचून लाखो हेक्टर जमीन आणि घरांचे नुकसान होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 16, 2011 09:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close