S M L

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात हिमायत बेगवर आरोप निश्चित

16 जुलैपुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले आहे. आरोपी हिमायत बेग याच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहे. शिवाजी नगर कोर्टात त्याच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहे. देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, बॉम्ब स्फोटामध्ये सक्रिय सहभाग तसेच देशद्राहाचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी हिमायत बेग याने लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील ग्लोबल इंटरनेट कॅफेमध्येच बॉम्बस्फोटाचा कट रचल्याची माहितीतपासातून पुढे आली. या स्फोटात वापरण्यात आलेले बॉम्ब उदगीर याच ठिकाणी तयार करण्यात आले होते. हिमायत बेग हा डी. एड.चा प्रथम वर्षातील नापास विद्यार्थी आहे. तो बीड जिल्ह्यातील मूळ निवासी आहे. गेल्या वर्षी हिमायत उदगीर इथे आला आणि व्यवसाय सुरु केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 16, 2011 09:47 AM IST

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात हिमायत बेगवर आरोप निश्चित

16 जुलै

पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले आहे. आरोपी हिमायत बेग याच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहे. शिवाजी नगर कोर्टात त्याच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहे. देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, बॉम्ब स्फोटामध्ये सक्रिय सहभाग तसेच देशद्राहाचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे.

पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी हिमायत बेग याने लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील ग्लोबल इंटरनेट कॅफेमध्येच बॉम्बस्फोटाचा कट रचल्याची माहितीतपासातून पुढे आली. या स्फोटात वापरण्यात आलेले बॉम्ब उदगीर याच ठिकाणी तयार करण्यात आले होते. हिमायत बेग हा डी. एड.चा प्रथम वर्षातील नापास विद्यार्थी आहे. तो बीड जिल्ह्यातील मूळ निवासी आहे. गेल्या वर्षी हिमायत उदगीर इथे आला आणि व्यवसाय सुरु केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 16, 2011 09:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close