S M L

स्फोटात मानवी बॉम्बचा वापर नाही - मारिया

16 जुलैमुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात मानवी बॉम्ब वापरण्यात आला नाही. स्फोटांचा तपासाबाबत अंडरवर्ल्डशी काही संबंध आहे यांचा ही तपास केला जाणार आहे तसेच हल्लेखोरांचे रेखाचित्र जारी करण्यात येतील आतापर्यंत कोणालाही ताब्यात घेतले नाही मात्र संशयितांची कसून चौकशी सुरू आहे अशी माहिती एटीएसचे प्रमुख राकेश मारिया यांनी एक पत्रकार परिषदेत दिली. मुंबईत झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादर येथे झालेल्या साखळी स्फोटांने मुंबई हादरली. या स्फोटानंतर एटीएस आणि मुंबई गुन्हे शाखा एकत्र तपास करत आहे. एटीएसचे प्रमुख राकेश मारिया यांनी स्फोटानंतर आज दुसरी पत्रकार परिषद घेतली. या प्रकरणाचा फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आला असून या रिपोर्टमध्ये स्फोटसाठी अमोनियम नायट्रेटसोबत डिजिटल टायमरचाही वापर केल्याचं उघड झालंय. स्फोटात आत्मघातकी दहशतवादी पथकांचा सहभाग असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र हाती आलेल्या रिपोर्टनुसार हे बॉम्बस्फोट आत्मघातकी दहशतवाद्यांनी केले नसल्याचे स्पष्ट झालं. या बॉम्बस्फोटाच्या तपासाच्या कामी एटीएसला सगळ्यात जास्त मदत सीसीटीव्ही फुटेजची होत आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एटीएसच्या अधिकार्‍यांनी एका दहशतवाद्याची ओळख पटवली आहे. त्याच रेखाचित्र लवकरच तयार केलं जातं आहे. या तपासकामासाठी देशभरातील तपास यंत्रणांची मदत घेतली जात असल्याचे राकेश मारियांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 16, 2011 01:10 PM IST

स्फोटात मानवी बॉम्बचा वापर नाही - मारिया

16 जुलै

मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात मानवी बॉम्ब वापरण्यात आला नाही. स्फोटांचा तपासाबाबत अंडरवर्ल्डशी काही संबंध आहे यांचा ही तपास केला जाणार आहे तसेच हल्लेखोरांचे रेखाचित्र जारी करण्यात येतील आतापर्यंत कोणालाही ताब्यात घेतले नाही मात्र संशयितांची कसून चौकशी सुरू आहे अशी माहिती एटीएसचे प्रमुख राकेश मारिया यांनी एक पत्रकार परिषदेत दिली.

मुंबईत झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादर येथे झालेल्या साखळी स्फोटांने मुंबई हादरली. या स्फोटानंतर एटीएस आणि मुंबई गुन्हे शाखा एकत्र तपास करत आहे. एटीएसचे प्रमुख राकेश मारिया यांनी स्फोटानंतर आज दुसरी पत्रकार परिषद घेतली. या प्रकरणाचा फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आला असून या रिपोर्टमध्ये स्फोटसाठी अमोनियम नायट्रेटसोबत डिजिटल टायमरचाही वापर केल्याचं उघड झालंय. स्फोटात आत्मघातकी दहशतवादी पथकांचा सहभाग असल्याचं म्हटलं जात होतं.

मात्र हाती आलेल्या रिपोर्टनुसार हे बॉम्बस्फोट आत्मघातकी दहशतवाद्यांनी केले नसल्याचे स्पष्ट झालं. या बॉम्बस्फोटाच्या तपासाच्या कामी एटीएसला सगळ्यात जास्त मदत सीसीटीव्ही फुटेजची होत आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एटीएसच्या अधिकार्‍यांनी एका दहशतवाद्याची ओळख पटवली आहे. त्याच रेखाचित्र लवकरच तयार केलं जातं आहे. या तपासकामासाठी देशभरातील तपास यंत्रणांची मदत घेतली जात असल्याचे राकेश मारियांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 16, 2011 01:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close