S M L

भोपाळचा विषारी कचरा नागपुरात जाळण्याचा आदेश

17 जुलैभोपाळच्या युनियन कार्बाईड कंपनीतला विषारी रासायनिक कचरा नागपूर जवळ असलेल्या बुटी बोरीमधील डिफेंन्सच्या डीआरडीओमध्ये आणून विल्हेवाट करण्याचा निर्णय मध्य प्रदेशच्या जबलपूर हायकोर्टान दिला आहेत. येत्या दहा दिवसात हा सर्व कचरा नागपूरकडे हलवण्याचा या निर्णयात उल्लेख आहे. या टॉक्सिक वेस्टमध्ये मोठ्या प्रमाणात डायऑक्सिन हा विषारी पदार्थ आहे. त्यामुळे निघणारा धूर 30 किलोमीटर पर्यंत पसरू शकतो या धूरा मुळे मेंदू वर परिणाम होवून येणार्‍या पिढीवर याचा परिणाम होऊ शकतो अस तंज्ज्ञांचे मत आहे. 4 डिसेंबर 1984 मध्ये युनियन कार्बाईडच्या कारखान्यात वायुगळतीने हजारो लोक मारले गेले आणि या वायुगळतीचे परिणाम तिसर्‍या पिढीलाही भोगावे लागत आहे. या कारखान्यात एकूण रासायनिक कचरा आहे 346 टन आणि नागपूरच्या डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेट ऑर्गनायजेशन म्हणजेचडीआरडीओच्या कचरा जाळणार्‍या भट्टीची, म्हणजेच इन्सिनरेटरची क्षमता आहे दिवसाला अर्धा टनची म्हणजे हा कचरा जाळायला तब्बल दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यातही हा सगळा कचरा ट्रकमधून , 450 किलोमीटर हून आणला जाईल. त्यामुळे त्यापासून अधिकच धोका निर्माण होऊ शकतो असं पर्यावरणवाद्यांचं म्हणणं आहे. काय आहे या कचर्‍यात ?- भोपाळ वायू दुर्घटनेनंतर निर्माण झालेला विषारी रासायिनक कचरा- डायऑक्सिन या विषारी घटकाचा समावेश - कचरा जाळल्यानंतरचा धूर 30 किमी पर्यंत पसरण्याची भीती- हा धूर मेंदूसाठी घातकदरम्यान जबलपूर हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनीही याची तातडीनं दखल घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं. आयबीएन लोकमतचे सवाल- विषारी कचरा हलवण्याबद्दल महाराष्ट्र सरकारला विचारात का घेतलं नाही ?- गुजरात, मध्य प्रदेश सरकारने याला विरोध केल्यानंतर नागपूरमध्ये हा कचरा का लादण्यात येतोय ?-'डीआरडीओ'ने या प्रस्तावाला हरकत का घेतली नाही ?- प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सरकार याची गांभार्याने दखल घेणार का ?

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 17, 2011 10:49 AM IST

भोपाळचा विषारी कचरा नागपुरात जाळण्याचा आदेश

17 जुलै

भोपाळच्या युनियन कार्बाईड कंपनीतला विषारी रासायनिक कचरा नागपूर जवळ असलेल्या बुटी बोरीमधील डिफेंन्सच्या डीआरडीओमध्ये आणून विल्हेवाट करण्याचा निर्णय मध्य प्रदेशच्या जबलपूर हायकोर्टान दिला आहेत. येत्या दहा दिवसात हा सर्व कचरा नागपूरकडे हलवण्याचा या निर्णयात उल्लेख आहे.

या टॉक्सिक वेस्टमध्ये मोठ्या प्रमाणात डायऑक्सिन हा विषारी पदार्थ आहे. त्यामुळे निघणारा धूर 30 किलोमीटर पर्यंत पसरू शकतो या धूरा मुळे मेंदू वर परिणाम होवून येणार्‍या पिढीवर याचा परिणाम होऊ शकतो अस तंज्ज्ञांचे मत आहे. 4 डिसेंबर 1984 मध्ये युनियन कार्बाईडच्या कारखान्यात वायुगळतीने हजारो लोक मारले गेले आणि या वायुगळतीचे परिणाम तिसर्‍या पिढीलाही भोगावे लागत आहे.

या कारखान्यात एकूण रासायनिक कचरा आहे 346 टन आणि नागपूरच्या डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेट ऑर्गनायजेशन म्हणजेचडीआरडीओच्या कचरा जाळणार्‍या भट्टीची, म्हणजेच इन्सिनरेटरची क्षमता आहे दिवसाला अर्धा टनची म्हणजे हा कचरा जाळायला तब्बल दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यातही हा सगळा कचरा ट्रकमधून , 450 किलोमीटर हून आणला जाईल. त्यामुळे त्यापासून अधिकच धोका निर्माण होऊ शकतो असं पर्यावरणवाद्यांचं म्हणणं आहे.

काय आहे या कचर्‍यात ?

- भोपाळ वायू दुर्घटनेनंतर निर्माण झालेला विषारी रासायिनक कचरा- डायऑक्सिन या विषारी घटकाचा समावेश - कचरा जाळल्यानंतरचा धूर 30 किमी पर्यंत पसरण्याची भीती- हा धूर मेंदूसाठी घातक

दरम्यान जबलपूर हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनीही याची तातडीनं दखल घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

आयबीएन लोकमतचे सवाल

- विषारी कचरा हलवण्याबद्दल महाराष्ट्र सरकारला विचारात का घेतलं नाही ?- गुजरात, मध्य प्रदेश सरकारने याला विरोध केल्यानंतर नागपूरमध्ये हा कचरा का लादण्यात येतोय ?-'डीआरडीओ'ने या प्रस्तावाला हरकत का घेतली नाही ?- प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सरकार याची गांभार्याने दखल घेणार का ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 17, 2011 10:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close