S M L

स्फोटाचे धागेदोरे 8 राज्यात ?

शोएब अहमद, मुंबई18 जुलैमुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी इंडियन मुजाहिद्दीनच्या एका महत्त्वाच्या दहशवाद्याच्या चौकशीवर पोलिसांचे लक्ष आहे. दानिश रियाज असं त्याचं नाव आहे. त्याने दिलेल्या माहितीवरून स्फोटाचा नेमका घटनाक्रम शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे. मुंबईतील या सीरियल स्फोटाचे धागेदोरे महाराष्ट्राबाहेर किमान आठ राज्यांमध्ये पसरले असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने एनआयए, एटीएस आणि मुंबई पोलिसांचा तपास सुरू झाला.मुंबईतल्या स्फोटाच्या तपासात दररोज वेगवेगळी माहिती समोर येते आहे. 2008 मधील अहमदाबाद स्फोटातला मुख्य आरोपी दानिश रियाज याच्या चौकशीतून माहितीचा पसारा वाढला आहे. पण पोलिसांच्या हाती अजूनही ठोस काही हाती लागलं नाही. दानिश हा इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित दहशतवादी आहे. मुंबई स्फोटाच्या कटातही त्याचा सहभाग असल्याचा पोलिसांचा संशय आहे. दानिशच्या आतापर्यंतच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीमुळे मुंबई स्फोटाचा तपास अनेक राज्यांपर्यंत पोचला आहेत.- दानिश हा अब्दुस तौकीरला ओळखतो - तौकीर हा देशभरातल्या अनेक स्फोटांमध्ये संशयित आरोपी आहे--डिसेंबर 2008 मध्ये दानिशने तौकीरला नेपाळच्या सीमेपर्यंत पोचवलं होतं- तौकीरला मुंबई स्फोटांबद्दल अधिक माहिती असण्याची शक्यता आहे- तौकीरने मंझरसोबत काम केलंय मंझरचाही मुंबई स्फोटात सहभाग असल्याचा एटीएसचा संशय आहे झारखंडचा रहिवासी असलेल्या दानिशला मुंबईतल्या इंडियन मुजाहिद्दीनच्या नेटवर्कची खोलवर माहिती असल्याचा पोलिसांचा संशय आहे.दानिशने हसीब रझा, राझिक, अबुल फैसल आणि मुजीब शेख या आणखी चार दहशतवाद्यांची नावं घेतली आहेत. फैसल आणि शेख हे मध्यप्रदेश पोलिसांच्या कस्टडीत आहेत. दानिशने संपर्कासाठी वापरलेल्या 10 ई-मेल आयडीचा एनआयए आणि एटीएस आता पुन्हा तपास करत आहेत.- sheikh@gmail.com या आयडीवर तो मुजीबशी सतत संपर्कात होता - त्यांच्या ई-मेलमध्ये मंझरचा अनेकदा उल्लेख आहे- मुंबई स्फोटांप्रकरणी मंझर एटीएसला हवा आहेमुंबई स्फोटात दानिशची नेमकी भूमिका काय, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण, इंडियन मुजाहिद्दीनमधल्या बदलत्या स्वरुपाचे अनेक तपशील त्यानं उघड केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. 2008 नंतर इंडियन मुजाहिद्दीनकडे पैशांचा तुटवडा आहे. त्यामुळे इंडियन मुजाहिद्दीनचे अनेक सदस्य दरोडे, खंडणी, अपहरण अशा गुन्ह्यांकडे वळलेत. पण, एक गोष्ट स्पष्ट होतेय ते म्हणजे मुंबई स्फोटाचे धागेदोरे महाराष्ट्राबाहेर किमान 8 राज्यांमध्ये पसरलेले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 18, 2011 05:16 PM IST

स्फोटाचे धागेदोरे 8 राज्यात ?

शोएब अहमद, मुंबई

18 जुलै

मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी इंडियन मुजाहिद्दीनच्या एका महत्त्वाच्या दहशवाद्याच्या चौकशीवर पोलिसांचे लक्ष आहे. दानिश रियाज असं त्याचं नाव आहे. त्याने दिलेल्या माहितीवरून स्फोटाचा नेमका घटनाक्रम शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे. मुंबईतील या सीरियल स्फोटाचे धागेदोरे महाराष्ट्राबाहेर किमान आठ राज्यांमध्ये पसरले असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने एनआयए, एटीएस आणि मुंबई पोलिसांचा तपास सुरू झाला.

मुंबईतल्या स्फोटाच्या तपासात दररोज वेगवेगळी माहिती समोर येते आहे. 2008 मधील अहमदाबाद स्फोटातला मुख्य आरोपी दानिश रियाज याच्या चौकशीतून माहितीचा पसारा वाढला आहे. पण पोलिसांच्या हाती अजूनही ठोस काही हाती लागलं नाही.

दानिश हा इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित दहशतवादी आहे. मुंबई स्फोटाच्या कटातही त्याचा सहभाग असल्याचा पोलिसांचा संशय आहे. दानिशच्या आतापर्यंतच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीमुळे मुंबई स्फोटाचा तपास अनेक राज्यांपर्यंत पोचला आहेत.

- दानिश हा अब्दुस तौकीरला ओळखतो - तौकीर हा देशभरातल्या अनेक स्फोटांमध्ये संशयित आरोपी आहे--डिसेंबर 2008 मध्ये दानिशने तौकीरला नेपाळच्या सीमेपर्यंत पोचवलं होतं- तौकीरला मुंबई स्फोटांबद्दल अधिक माहिती असण्याची शक्यता आहे- तौकीरने मंझरसोबत काम केलंय मंझरचाही मुंबई स्फोटात सहभाग असल्याचा एटीएसचा संशय आहे

झारखंडचा रहिवासी असलेल्या दानिशला मुंबईतल्या इंडियन मुजाहिद्दीनच्या नेटवर्कची खोलवर माहिती असल्याचा पोलिसांचा संशय आहे.दानिशने हसीब रझा, राझिक, अबुल फैसल आणि मुजीब शेख या आणखी चार दहशतवाद्यांची नावं घेतली आहेत. फैसल आणि शेख हे मध्यप्रदेश पोलिसांच्या कस्टडीत आहेत. दानिशने संपर्कासाठी वापरलेल्या 10 ई-मेल आयडीचा एनआयए आणि एटीएस आता पुन्हा तपास करत आहेत.

- sheikh@gmail.com या आयडीवर तो मुजीबशी सतत संपर्कात होता - त्यांच्या ई-मेलमध्ये मंझरचा अनेकदा उल्लेख आहे- मुंबई स्फोटांप्रकरणी मंझर एटीएसला हवा आहे

मुंबई स्फोटात दानिशची नेमकी भूमिका काय, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण, इंडियन मुजाहिद्दीनमधल्या बदलत्या स्वरुपाचे अनेक तपशील त्यानं उघड केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. 2008 नंतर इंडियन मुजाहिद्दीनकडे पैशांचा तुटवडा आहे. त्यामुळे इंडियन मुजाहिद्दीनचे अनेक सदस्य दरोडे, खंडणी, अपहरण अशा गुन्ह्यांकडे वळलेत. पण, एक गोष्ट स्पष्ट होतेय ते म्हणजे मुंबई स्फोटाचे धागेदोरे महाराष्ट्राबाहेर किमान 8 राज्यांमध्ये पसरलेले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 18, 2011 05:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close