S M L

जाहिरात खिल्ली उडवण्यार्‍या कंपनीला भज्जीची नोटीस

19 जुलैइंग्लंड दौर्‍यावर असलेल्या भारतीय टीममध्ये सध्या मैदानाबाहेर एक वाद रंगत आहे. भारताचा स्पीन बॉलर हरभजन सिंगने युबी ग्रुपला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. भारतीय कॅप्टन महेंद्रसिंग धोणीने केलेल्या एका जाहिरातीत हरभजन सिंग आणि त्याच्या कुटुंबीयांची खिल्ली उडवण्यात आली. यावर हरभजन सिंगच्या वकिलांना आक्षेप नोंदवला. संबंधित कंपनीने हरभजन सिंगची माफी मागावी आणि ही जाहिरात रद्द करावी अशी मागणीही या नोटीसीत करण्यात आली आहे. हरभजनची आई अवतार कौर यांनीही अशाप्रकारच्या जाहिरातीमुळे टीममध्ये सलोखा राहणार नाही असं म्हटलं. तर यु बी कंपनीचे मालक विजय माल्या यांनी मात्र या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया देणं टाळलंय. हरभजनची खिल्ली उडवण्याचा आमचा हेतू नव्हता त्यामुळे जाहिरात रद्द करण्याचा प्रश्नच नाही असं कंपनीने स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 19, 2011 11:55 AM IST

जाहिरात खिल्ली उडवण्यार्‍या कंपनीला भज्जीची नोटीस

19 जुलै

इंग्लंड दौर्‍यावर असलेल्या भारतीय टीममध्ये सध्या मैदानाबाहेर एक वाद रंगत आहे. भारताचा स्पीन बॉलर हरभजन सिंगने युबी ग्रुपला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. भारतीय कॅप्टन महेंद्रसिंग धोणीने केलेल्या एका जाहिरातीत हरभजन सिंग आणि त्याच्या कुटुंबीयांची खिल्ली उडवण्यात आली.

यावर हरभजन सिंगच्या वकिलांना आक्षेप नोंदवला. संबंधित कंपनीने हरभजन सिंगची माफी मागावी आणि ही जाहिरात रद्द करावी अशी मागणीही या नोटीसीत करण्यात आली आहे. हरभजनची आई अवतार कौर यांनीही अशाप्रकारच्या जाहिरातीमुळे टीममध्ये सलोखा राहणार नाही असं म्हटलं.

तर यु बी कंपनीचे मालक विजय माल्या यांनी मात्र या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया देणं टाळलंय. हरभजनची खिल्ली उडवण्याचा आमचा हेतू नव्हता त्यामुळे जाहिरात रद्द करण्याचा प्रश्नच नाही असं कंपनीने स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 19, 2011 11:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close