S M L

इंडियन मुजाहिद्दीन संघटनेचा हात असल्याचा संशय

सुधाकर कांबळे, मुंबई20 जुलैमुंबईतल्या स्फोटामागे इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय आहे. ही संघटना निर्माण झाली कशी, त्याचे म्होरके कोण आहेत, आणि या संघटनेची कार्यपद्धती कशी आहे याचा स्पेशल रिपोर्ट..भारतातील सर्व तपास यंत्रणांसाठी डोकेदुखी ठरणारी संघटना म्हणजे, इंडियन मुजाहिद्दीन या संघटनेचे म्हारेके आहेत आहेत.आमीर रझा, रियाज भटकल, ईक्बाल भटकल आणि अबु रशिद शेख. आमीर रजा, त्याचा पोलीस चकमकित मारला गेलेला भाऊ आसिफ रजा, रियाज भटकल आणि इक्बाल भटकल यांनी पद्धशीरपणे ही संघटना सुरु केली. हे सगळे आधी होते सिमी या संघटनेत. सिमी वर बंदी आल्यानंतर हे सगळेजण विखुरले गेले. पण आमिर रझाने ने नवा मार्ग शोधला तो होता रझा कमांडो फोर्सचा. या संघटनेच्या माध्यामातून त्यांनी काही घटना केल्या. पुढे आमीर रझाच्या संपर्कात आले रियाझ भटकल आणि त्याचे साथीदार आणि मग रझा कमांडो फोर्सचं नामकरण झालं इंडियन मुजाहिद्दीन.मग भारतातील तरुणांना नोकरी लावायच्या नावाखाली दुबईला बोलवायला सुरुवात झाली आणि त्यांना पाकिस्तानात दहशतवादाचे ट्रेनिंग घेण्यासाठी पाठवलं जायचं. रिजायने आधी सादिक शेख याला बोलावलं. त्याला पाक मध्ये बॉम्ब बनवण्याचं ट्रेनिंग देण्यात आलं. सादिक आहे आजमगढचा. तो भारतात परतल्यानंतर त्याने आणखी तरुणांची जुळवा जुळव करुन उत्तर प्रदेश तसंच दिल्लीत बॉम्बस्फोट घडवण्यात महत्वाची भूमिका बजावली. 2002 सालात संघटनेची बांधनी सुरु होती. यानंतर 2005 पासून संघटनेने आपलं अस्तीत्व दाखवण्यास सुरुवात केली. आयएमला पद्धतशीरपणे आर्थिक मदत मिळत असते. ती कधी हवाला मार्फत, तरी कधी चेकच्या स्वरुपात मिळते.आयएमला मिळणारी ही आर्थिक मदत त्यांच्या कामावर अवलंबून असते. मोठ काम मोठी मदत अशी त्यांच्या आर्थिक मदतीची पद्धत आहे. ही मदत अर्थातचं त्यांना परदेशातून मिळत असते. त्यांच्या प्रत्येक मॉड्यूल मध्ये दहा ते पंधरा लोक आहेत. प्रत्येक मॉड्यूल मधली सदस्यांची कामाची वाटणी झालेली असते.प्रत्येक मॉड्यूल मध्ये बॉम्ब बनवणारा, बॉम्ब ठेवणारे, मेल पाठवण्याची जबाबदारी असणारे असतात.आणि गेली अनेक वर्ष ते पद्धतशीरपणे आपली कामं करुन भारतातील यंत्रणेला वेठीस धरत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 20, 2011 06:25 PM IST

इंडियन मुजाहिद्दीन संघटनेचा हात असल्याचा संशय

सुधाकर कांबळे, मुंबई

20 जुलै

मुंबईतल्या स्फोटामागे इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय आहे. ही संघटना निर्माण झाली कशी, त्याचे म्होरके कोण आहेत, आणि या संघटनेची कार्यपद्धती कशी आहे याचा स्पेशल रिपोर्ट..

भारतातील सर्व तपास यंत्रणांसाठी डोकेदुखी ठरणारी संघटना म्हणजे, इंडियन मुजाहिद्दीन या संघटनेचे म्हारेके आहेत आहेत.आमीर रझा, रियाज भटकल, ईक्बाल भटकल आणि अबु रशिद शेख. आमीर रजा, त्याचा पोलीस चकमकित मारला गेलेला भाऊ आसिफ रजा, रियाज भटकल आणि इक्बाल भटकल यांनी पद्धशीरपणे ही संघटना सुरु केली.

हे सगळे आधी होते सिमी या संघटनेत. सिमी वर बंदी आल्यानंतर हे सगळेजण विखुरले गेले. पण आमिर रझाने ने नवा मार्ग शोधला तो होता रझा कमांडो फोर्सचा. या संघटनेच्या माध्यामातून त्यांनी काही घटना केल्या. पुढे आमीर रझाच्या संपर्कात आले रियाझ भटकल आणि त्याचे साथीदार आणि मग रझा कमांडो फोर्सचं नामकरण झालं इंडियन मुजाहिद्दीन.

मग भारतातील तरुणांना नोकरी लावायच्या नावाखाली दुबईला बोलवायला सुरुवात झाली आणि त्यांना पाकिस्तानात दहशतवादाचे ट्रेनिंग घेण्यासाठी पाठवलं जायचं. रिजायने आधी सादिक शेख याला बोलावलं. त्याला पाक मध्ये बॉम्ब बनवण्याचं ट्रेनिंग देण्यात आलं. सादिक आहे आजमगढचा. तो भारतात परतल्यानंतर त्याने आणखी तरुणांची जुळवा जुळव करुन उत्तर प्रदेश तसंच दिल्लीत बॉम्बस्फोट घडवण्यात महत्वाची भूमिका बजावली.

2002 सालात संघटनेची बांधनी सुरु होती. यानंतर 2005 पासून संघटनेने आपलं अस्तीत्व दाखवण्यास सुरुवात केली. आयएमला पद्धतशीरपणे आर्थिक मदत मिळत असते. ती कधी हवाला मार्फत, तरी कधी चेकच्या स्वरुपात मिळते.आयएमला मिळणारी ही आर्थिक मदत त्यांच्या कामावर अवलंबून असते. मोठ काम मोठी मदत अशी त्यांच्या आर्थिक मदतीची पद्धत आहे. ही मदत अर्थातचं त्यांना परदेशातून मिळत असते.

त्यांच्या प्रत्येक मॉड्यूल मध्ये दहा ते पंधरा लोक आहेत. प्रत्येक मॉड्यूल मधली सदस्यांची कामाची वाटणी झालेली असते.प्रत्येक मॉड्यूल मध्ये बॉम्ब बनवणारा, बॉम्ब ठेवणारे, मेल पाठवण्याची जबाबदारी असणारे असतात.आणि गेली अनेक वर्ष ते पद्धतशीरपणे आपली कामं करुन भारतातील यंत्रणेला वेठीस धरत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 20, 2011 06:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close