S M L

गिरणी कामगारांच्या वारसांनाही घर मिळणार !

21 जुलैअनेक वर्षांपासून हक्काच्या घरांसाठी लढणार्‍या गिरणी कामगारांना घरं देण्याचे सरकारने मान्य केलं मात्र घरांची संख्या कमी केली. मृत गिरणी कामगारांच्या वारसांना घरं द्यायला सरकार तयार झालं. आज मुख्यमंत्री आणि कामगार संघटनांमध्ये झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय झाला. 1 जानेवरी 1982 ला हजेरीपटावर असलेल्या कामगारांना घरं देण्यात येणार आहे. मात्र घरं देण्याचे आश्वासन देतानाच सरकारने घरांची संख्या मात्री कमी केली. त्यामुळे कामगारांची नाराजी कायम आहे. 1 लाख 10 हजार कामगारांनी घरांसाठी अर्ज केले होते. आधी 68 हजार घरं देण्याचे आश्वासन सरकारनं दिलं होतं. पण आता मात्र फक्त 22 हजार घरंच देणार असल्याचे सरकारने सांगितले. त्यामुळे 28 तारखेचा मोर्चा काढण्यावर कामगार संघटना ठाम आहे.गिरणी कामगारांनी आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. पण या चर्चेनंतर सर्व कामगार नाराज झाल्याची प्रतिक्रिया गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांनी दिली. गिरणी कामगारांना 65 हजार घरं देण्याचे आश्वासन तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिलं होतं. पण आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फक्त 22 हजार घरं देणार असल्याचं म्हटलं. त्यामुळे फक्त याच मुद्द्यावर चर्चा झाली. शिवाय गिरणी कामगारांच्या वारसांना घरं यासारख्या इतर मुद्दयांवर चर्चा झाली. पण ती निर्णायक नव्हती असंही इस्वलकर यांनी सांगितलं. गेल्या अनेक वर्षांपासून गिरणी कामगार आपल्या हक्काच्या घरासाठी एक हाती लढा देत होता. मोर्चा, आंदोलन, उपोषण आदी सत्याग्रहाचा मार्ग अंवलबून ही सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नव्हती. अखेर गिरणी कामगाराच्या सहा संघटना अलीकडेच एकत्र आल्या आणि आपल्या हक्कांच्या घरांसाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्णय घेतला.संघटनेची पाऊल वळली ती पहिली विरोधी पक्षांकडे. शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या लढ्याची माहिती दिली. यावर उध्दव ठाकरे यांनीही 'आपण फक्त आवाज द्या, आम्ही आपलल्या सोबत आहोत' असं सांगत उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेचा पाठिंबा दिला. यापाठोपाठ मनसेचे कार्याध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतीयांना इथं घर दिली जाता पण कित्येक वर्षापासून लढणार्‍या कामगारांना घर दिली जात नाही अशी सरकारवर टीका करत गिरणी कामगारांना आपला पाठिंबा दिला. आणि आज मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत मृत गिरणी कामगारांच्या वारसांना घरं देण्यात येईल. मात्र 1 जानेवारी 1982 पासून त्यांची नोंद असणार्‍या गिरणी कामगारांना घरं दिली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 21, 2011 01:57 PM IST

गिरणी कामगारांच्या वारसांनाही घर मिळणार !

21 जुलै

अनेक वर्षांपासून हक्काच्या घरांसाठी लढणार्‍या गिरणी कामगारांना घरं देण्याचे सरकारने मान्य केलं मात्र घरांची संख्या कमी केली. मृत गिरणी कामगारांच्या वारसांना घरं द्यायला सरकार तयार झालं. आज मुख्यमंत्री आणि कामगार संघटनांमध्ये झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय झाला. 1 जानेवरी 1982 ला हजेरीपटावर असलेल्या कामगारांना घरं देण्यात येणार आहे.

मात्र घरं देण्याचे आश्वासन देतानाच सरकारने घरांची संख्या मात्री कमी केली. त्यामुळे कामगारांची नाराजी कायम आहे. 1 लाख 10 हजार कामगारांनी घरांसाठी अर्ज केले होते. आधी 68 हजार घरं देण्याचे आश्वासन सरकारनं दिलं होतं. पण आता मात्र फक्त 22 हजार घरंच देणार असल्याचे सरकारने सांगितले. त्यामुळे 28 तारखेचा मोर्चा काढण्यावर कामगार संघटना ठाम आहे.

गिरणी कामगारांनी आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. पण या चर्चेनंतर सर्व कामगार नाराज झाल्याची प्रतिक्रिया गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांनी दिली. गिरणी कामगारांना 65 हजार घरं देण्याचे आश्वासन तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिलं होतं.

पण आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फक्त 22 हजार घरं देणार असल्याचं म्हटलं. त्यामुळे फक्त याच मुद्द्यावर चर्चा झाली. शिवाय गिरणी कामगारांच्या वारसांना घरं यासारख्या इतर मुद्दयांवर चर्चा झाली. पण ती निर्णायक नव्हती असंही इस्वलकर यांनी सांगितलं.

गेल्या अनेक वर्षांपासून गिरणी कामगार आपल्या हक्काच्या घरासाठी एक हाती लढा देत होता. मोर्चा, आंदोलन, उपोषण आदी सत्याग्रहाचा मार्ग अंवलबून ही सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नव्हती. अखेर गिरणी कामगाराच्या सहा संघटना अलीकडेच एकत्र आल्या आणि आपल्या हक्कांच्या घरांसाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्णय घेतला.

संघटनेची पाऊल वळली ती पहिली विरोधी पक्षांकडे. शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या लढ्याची माहिती दिली. यावर उध्दव ठाकरे यांनीही 'आपण फक्त आवाज द्या, आम्ही आपलल्या सोबत आहोत' असं सांगत उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेचा पाठिंबा दिला. यापाठोपाठ मनसेचे कार्याध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतीयांना इथं घर दिली जाता पण कित्येक वर्षापासून लढणार्‍या कामगारांना घर दिली जात नाही अशी सरकारवर टीका करत गिरणी कामगारांना आपला पाठिंबा दिला.

आणि आज मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत मृत गिरणी कामगारांच्या वारसांना घरं देण्यात येईल. मात्र 1 जानेवारी 1982 पासून त्यांची नोंद असणार्‍या गिरणी कामगारांना घरं दिली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 21, 2011 01:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close