S M L

पावसाळी अधिवेशनाला विरोधकांची मोर्चेबांधणी

अमेय तिरोडकर, मुंबई24 जुलैमहाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होतं आहे. बॉम्बस्फोट, गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न आणि राज्यातील सुक्या तसंच ओल्या दुष्काळाची परिस्थिती या मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडायचे काम विरोधक करतील असंच दिसतंय. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरच मुंबईत स्फोट झाले आणि या अधिवेशनाचा अजेंडाच ठरला. मुंबईकरांमध्ये सरकारबद्दल प्रचंड चीड आहे. हाच संताप विरोधी पक्षांकडून अधिवेशनाच्या सुरूवातीलाच विधीमंडळात व्यक्त केला जाईल. यातूनच, गृहमंत्री आर.आर. पाटील यांची कोंडी होईल, असं स्पष्ट दिसत आहे. शिवाय, राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे इतरही अनेक मुद्दे विरोधकांकडे आहेत. पावसाळी अधिवेशनातील मुद्दे- पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येचा तपास- अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले इथे पडलेला दरोडा आणि महिलांवर झालेले बलात्कार- राज्यभर घरफोड्याचे वाढलेले प्रमाण- नाशिक इथं झालेला स्फोट आणि जखमींना मदत मिळायला झालेला उशीरयाशिवाय, गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे म्हणून 28 जुलैला विधीमंडळावर मोर्चा नेण्यात येणार आहे. या मोर्चात राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधू हजर राहणार आहेत. या मुद्द्याची तापलेली हवा बघून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीने बैठका घेण्याचा प्रयत्न केला. पण, सरकारचा काही ठोस निर्णय तोपर्यंत आला नाही तर विरोधक या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल करतील. राज्यात पावसाने फार विचित्र परिस्थिती निर्माण करून ठेवलीय. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली. तर, खान्देशात पाऊस नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. ह्या दोन्ही भागातल्या शेतकर्‍यांच्या पेरण्यांचे नुकसान झालं. त्यामुळे त्यांना ठोस मदत जाहीर करणे सरकारला भाग आहे. या महत्त्वाच्या प्रश्नाशिवाय, सरकारमधील काही महत्त्वाचे नेते अडचणीत येतील अशी काही प्रकरणं विरोधकांनी तयार ठेवली. यामुळेच, हे अधिवेशन आरोप - प्रत्यारोपामुळे गाजेल अशीच चिन्ह आहेत. सर्वपक्षीय विरोधकांची बैठकअधिवेशनात सरकारला कोणकोणत्या मुद्द्यांवर घेरायचं याची तयारी सर्व विरोधी पक्ष करत आहे. आणि याचीच रणनिती ठरवण्यासाठी विरोधी नेते एकनाथ खडसे यांच्या घरी बैठक घेणार आहेत. शिवसेना -भाजप या प्रमुख विरोधी पक्षांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्षही या बैठकीत सामील होणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 24, 2011 05:47 PM IST

पावसाळी अधिवेशनाला विरोधकांची मोर्चेबांधणी

अमेय तिरोडकर, मुंबई

24 जुलै

महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होतं आहे. बॉम्बस्फोट, गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न आणि राज्यातील सुक्या तसंच ओल्या दुष्काळाची परिस्थिती या मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडायचे काम विरोधक करतील असंच दिसतंय.

पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरच मुंबईत स्फोट झाले आणि या अधिवेशनाचा अजेंडाच ठरला. मुंबईकरांमध्ये सरकारबद्दल प्रचंड चीड आहे. हाच संताप विरोधी पक्षांकडून अधिवेशनाच्या सुरूवातीलाच विधीमंडळात व्यक्त केला जाईल. यातूनच, गृहमंत्री आर.आर. पाटील यांची कोंडी होईल, असं स्पष्ट दिसत आहे. शिवाय, राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे इतरही अनेक मुद्दे विरोधकांकडे आहेत.

पावसाळी अधिवेशनातील मुद्दे

- पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येचा तपास- अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले इथे पडलेला दरोडा आणि महिलांवर झालेले बलात्कार- राज्यभर घरफोड्याचे वाढलेले प्रमाण- नाशिक इथं झालेला स्फोट आणि जखमींना मदत मिळायला झालेला उशीरयाशिवाय, गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे म्हणून 28 जुलैला विधीमंडळावर मोर्चा नेण्यात येणार आहे. या मोर्चात राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधू हजर राहणार आहेत. या मुद्द्याची तापलेली हवा बघून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीने बैठका घेण्याचा प्रयत्न केला. पण, सरकारचा काही ठोस निर्णय तोपर्यंत आला नाही तर विरोधक या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल करतील.

राज्यात पावसाने फार विचित्र परिस्थिती निर्माण करून ठेवलीय. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली. तर, खान्देशात पाऊस नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. ह्या दोन्ही भागातल्या शेतकर्‍यांच्या पेरण्यांचे नुकसान झालं. त्यामुळे त्यांना ठोस मदत जाहीर करणे सरकारला भाग आहे. या महत्त्वाच्या प्रश्नाशिवाय, सरकारमधील काही महत्त्वाचे नेते अडचणीत येतील अशी काही प्रकरणं विरोधकांनी तयार ठेवली. यामुळेच, हे अधिवेशन आरोप - प्रत्यारोपामुळे गाजेल अशीच चिन्ह आहेत. सर्वपक्षीय विरोधकांची बैठक

अधिवेशनात सरकारला कोणकोणत्या मुद्द्यांवर घेरायचं याची तयारी सर्व विरोधी पक्ष करत आहे. आणि याचीच रणनिती ठरवण्यासाठी विरोधी नेते एकनाथ खडसे यांच्या घरी बैठक घेणार आहेत. शिवसेना -भाजप या प्रमुख विरोधी पक्षांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्षही या बैठकीत सामील होणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 24, 2011 05:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close