S M L

'द वॉल' ची दमदार शतकी खेळी

24 जुलैलॉर्ड्स टेस्टच्या तिसर्‍या दिवसाचा हीरो ठरलाय तो मिस्टर कुल राहुल द्रविड. भारतीय बॅट्समन फ्लॉप होत असताना राहुल द्रविड मात्र मैदानावर खंबीरपणे उभा राहिला. द्रविडने शानदार सेंच्युरी ठोकत आपल्याला द वॉल का म्हणतात हे पुन्हा एकदा दाखवून दिलं. कौतुक परिश्रमाचं, आणि अफाट गुणवत्तेचं. "मिस्टर कुल" राहूल द्रविडची आणखीन एक सुपर कुल इनिंग. इंग्लंडविरुध्दच्या पहिल्या टेस्टमध्ये राहुल द्रविडने शानदार सेंच्युरी ठोकली. भारताची 77 रन्सवर 2 विकेट अशी अवस्था असताना द्रविड मैदानात उतरला. द वॉल नावाला जागत त्याने इंग्लंडच्या भेदक बॉलिंगसमोर तो भक्कमपणे उभा राहिला. लॉर्ड्स मैदानावरची ही त्याची पहिलीच सेंच्युरी ठरली. तर क्रिकेट करियरमधली ही होती त्याची 33वी सेंच्युरी.भारताची टॉप ऑर्डर फ्लॉप होत असताना द्रविडन मात्र रन्स करत होता. अशा वेळी खेळपट्टीवर टीच्चून उभं राहण्याचा मंत्र त्याला उपयोगी पडला. टीम अडचणीत असताना राहुल द्रविड नेहमीच टीमच्या मदतीला धावून येतो. विशेषत: परदेशात त्याची कामगिरी अजूनच बहरते. लॉर्ड्सवरची सेंच्युरी हे त्याचच उदाहरण म्हणता येईल.राहुल द्रविडच्या याच खेळीमुळे भारतानं पहिल्या इनिंगमध्ये फॉलऑनची नामुष्की टाळली. इंग्लंडमध्ये अजून तीन टेस्ट मॅच आहेत. आणि राहुल द्रविडकडून टीमला अशाच कामगिरीची गरज आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 24, 2011 11:26 AM IST

'द वॉल' ची दमदार शतकी खेळी

24 जुलै

लॉर्ड्स टेस्टच्या तिसर्‍या दिवसाचा हीरो ठरलाय तो मिस्टर कुल राहुल द्रविड. भारतीय बॅट्समन फ्लॉप होत असताना राहुल द्रविड मात्र मैदानावर खंबीरपणे उभा राहिला. द्रविडने शानदार सेंच्युरी ठोकत आपल्याला द वॉल का म्हणतात हे पुन्हा एकदा दाखवून दिलं.

कौतुक परिश्रमाचं, आणि अफाट गुणवत्तेचं. "मिस्टर कुल" राहूल द्रविडची आणखीन एक सुपर कुल इनिंग. इंग्लंडविरुध्दच्या पहिल्या टेस्टमध्ये राहुल द्रविडने शानदार सेंच्युरी ठोकली. भारताची 77 रन्सवर 2 विकेट अशी अवस्था असताना द्रविड मैदानात उतरला. द वॉल नावाला जागत त्याने इंग्लंडच्या भेदक बॉलिंगसमोर तो भक्कमपणे उभा राहिला. लॉर्ड्स मैदानावरची ही त्याची पहिलीच सेंच्युरी ठरली. तर क्रिकेट करियरमधली ही होती त्याची 33वी सेंच्युरी.

भारताची टॉप ऑर्डर फ्लॉप होत असताना द्रविडन मात्र रन्स करत होता. अशा वेळी खेळपट्टीवर टीच्चून उभं राहण्याचा मंत्र त्याला उपयोगी पडला. टीम अडचणीत असताना राहुल द्रविड नेहमीच टीमच्या मदतीला धावून येतो. विशेषत: परदेशात त्याची कामगिरी अजूनच बहरते. लॉर्ड्सवरची सेंच्युरी हे त्याचच उदाहरण म्हणता येईल.

राहुल द्रविडच्या याच खेळीमुळे भारतानं पहिल्या इनिंगमध्ये फॉलऑनची नामुष्की टाळली. इंग्लंडमध्ये अजून तीन टेस्ट मॅच आहेत. आणि राहुल द्रविडकडून टीमला अशाच कामगिरीची गरज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 24, 2011 11:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close