S M L

ए.राजांनी दाखवले पंतप्रधानांकडे बोट

25 जुलै2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी माजी दूरसंचार मंत्री ए राजा यांनी आता थेट पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरच निशाणा साधला. पंतप्रधान आणि तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना स्पेक्ट्रम व्यवहाराची माहिती होती असं सांगत राजा यांनी हे प्रकरण अधिकच तापवलं. स्पेक्ट्रमचा लिलाव करायचा नाही या एनडीएच्याच धोरणाचे आपण पालन केलं. कायद्याचे काटेकोर पालन केल्याबद्दल आपल्याला शिक्षा नाही तर बक्षीस मिळायला हवे असं ए. राजा यांनी आज कोर्टात सांगितले.2 जी घोटाळ्याप्रकरणी अटकेनंतर ए. राजा यांनी स्पेशल सीबीआय कोर्टात पहिल्यांदाच बाजू मांडली आणि पंतप्रधान ंमनमोहन सिंग, पी. चिदंबरम तसंच एनडीएला या वादात ओढलं. राजा म्हणाले, स्वान आणि युनिटेकचे शेअर्स परदेशी कंपन्यांना विकण्याच्या व्यवहाराबद्दल पंतप्रधानांना पूर्ण माहिती होती. तसेच परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी अशी विक्री बेकायदेशीर नसल्याचे पंतप्रधानांच्या उपस्थितीतच तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटलं होतं.राजा यांनी सीबीआयच्या चार्जशीटलाच आव्हान दिलं. 2 जी वाटपामुळे कोणतेच नुकसान झालं नाही असं सध्याचे दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केल्याचे राजा म्हणाले. तर स्पेक्ट्रमचा लिलाव करायचा नाही ही एनडीए सरकारची परंपराच आपण पुढे चालवली. मी अमलात आणलेलं धोरण जर चुकीचं असेल तर 1993 पासूनचे सर्व दूरसंचार मंत्री माझ्यासोबतच तुरुंगात असायला हवेत. यानंतर अरुण शौरी आणि दयानिधी मारन यांच्या बद्दल ही राजा यांनी पोलखोल केली. माजी दूरसंचार मंत्री म्हणून अरुण शौरी यांनी 26 तर दयानिधी मारन यांनी 25 लायसन्सचं वाटप केलं. मी 122 लायसन्सचे वाटप केलं. किती लायसन्स वाटले यामुळे काही फरक पडत नाही. यापैकी कुणीच स्पेक्ट्रमचा लिलाव केला नाही हे महत्त्वाचे आहे. त्यांनी जर काही चुकीचं केलं नसेल. तर मग माझी चौकशी कशी होऊ शकते? 2 जी चा लिलाव करायचा नाही या 2003 मध्ये कॅबिनेटने घेतलेल्या निर्णयाचे मी फक्त पालन केलं. मी जर कायद्याचंच पालन केलं असेल तर माझ्यावर खटला चालायला नको, उलट मला बक्षीस मिळायला हवं. टाटांनी 27 टक्के इक्विटी डोकोमोला विकून फायदा करून घेतला. पण सीबीआयनं त्यांना मात्र आरोपी केलं नाहीय असा आरोप ही राजा यांनी केला.राजा यांनी दूरसंचार मंत्री म्हणून आपण राबवलेल्या धोरणाचंही समर्थन केलं. ते म्हणाले, रस्त्यावरच्या प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल फोन असावा, या सामाजिक न्यायाचे आश्वासन मी पाळले. मी जनतेचा सेवक आहे. आणि मी मोबाईल फोनचे कॉल रेट्स स्वस्त केले. इतके स्वस्त की रिक्षावाला किंवा घरकाम करणार्‍याच्या हातातही फोन आला. राजा यांच्यावर फसवणूक, अफरातफर आणि गुन्हेगारी कटाचे आरोप आहेत. तब्बल पावणे दोन लाखाच्या या 2 जी घोटाळ्याप्रकरणी द्रमुकचे तीन नेते अडचणीत आलेत. आता केवळ राजा यांनी पंतप्रधान आणि एनडीएलाही या घोटाळ्याची व्याप्ती वाढवली. या मुद्द्यावरून येतं पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हं आहेत.दरम्यान, राजा यांच्या आरोपानंतर आता पंतप्रधान मनमोहन सिंग आणि केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली. तसेच कोणत्याही चौकशीसाठी एनडीएची तयारी असल्याचे ते म्हणाले.नितीन गडकरी यांच्या मागणीवर कपिल सिब्बल यांनी समाचार घेतला. राजा यांच्या सारख्या एका आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर वक्तव्य करतात हे चुकीचं आहे अशी टीका कपिल सिब्बल यांनी केली.तर राजा आणि गडकरी यांच्या आरोपांवर पी. चिदंबरम यांनी काय उत्तर दिलं चिदंबरम म्हणतात, नवे शेअर्स उपलब्ध करून परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करता येतील असं पंतप्रधानांच्या उपस्थितीत चर्चा झाली. पण युनिटेक किंवा स्वान टेलिकॉमच्या स्पेक्ट्रम विक्रीवर काहीच बोलणं झालं नाही. भाजप काही विशिष्ट मंत्र्यांना लक्ष्य करतंय कारण उजव्या विचारसरणीच्या दहशतवादी कृत्यांमध्ये आणि अयोध्या प्रकरणामध्ये यूपीए सरकारने वेगात चौकशी सुरू केली. भारतातल्याच उजव्या विचारसरणीच्या कट्टरवादी संघटनांनी बॉम्ब तयार केले. आणि बॉम्बस्फोट घडवून लोकांचा बळी घेतला.2 जी घोटाळ्याची खरोखरच 1993 पूर्वीपासून चौकशी करायची झाली तर कोणते दूरसंचार मंत्री अडचणीत येऊ शकतात ते पाहूया.कोणते दूरसंचार मंत्री टार्गेट ?1991-1996 - सुखराम ( काँग्रेस)1999-2001 - रामविलास पासवान ( लोकजनशक्ती पक्ष)2001-2003 - प्रमोद महाजन (भाजप)2004-2006 - दयानिधी मारन ( द्रमुक)2007-2009 - ए. राजा (द्रमुक)

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 25, 2011 08:56 AM IST

ए.राजांनी दाखवले पंतप्रधानांकडे बोट

25 जुलै

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी माजी दूरसंचार मंत्री ए राजा यांनी आता थेट पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरच निशाणा साधला. पंतप्रधान आणि तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना स्पेक्ट्रम व्यवहाराची माहिती होती असं सांगत राजा यांनी हे प्रकरण अधिकच तापवलं. स्पेक्ट्रमचा लिलाव करायचा नाही या एनडीएच्याच धोरणाचे आपण पालन केलं. कायद्याचे काटेकोर पालन केल्याबद्दल आपल्याला शिक्षा नाही तर बक्षीस मिळायला हवे असं ए. राजा यांनी आज कोर्टात सांगितले.

2 जी घोटाळ्याप्रकरणी अटकेनंतर ए. राजा यांनी स्पेशल सीबीआय कोर्टात पहिल्यांदाच बाजू मांडली आणि पंतप्रधान ंमनमोहन सिंग, पी. चिदंबरम तसंच एनडीएला या वादात ओढलं. राजा म्हणाले, स्वान आणि युनिटेकचे शेअर्स परदेशी कंपन्यांना विकण्याच्या व्यवहाराबद्दल पंतप्रधानांना पूर्ण माहिती होती. तसेच परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी अशी विक्री बेकायदेशीर नसल्याचे पंतप्रधानांच्या उपस्थितीतच तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटलं होतं.

राजा यांनी सीबीआयच्या चार्जशीटलाच आव्हान दिलं. 2 जी वाटपामुळे कोणतेच नुकसान झालं नाही असं सध्याचे दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केल्याचे राजा म्हणाले. तर स्पेक्ट्रमचा लिलाव करायचा नाही ही एनडीए सरकारची परंपराच आपण पुढे चालवली. मी अमलात आणलेलं धोरण जर चुकीचं असेल तर 1993 पासूनचे सर्व दूरसंचार मंत्री माझ्यासोबतच तुरुंगात असायला हवेत.

यानंतर अरुण शौरी आणि दयानिधी मारन यांच्या बद्दल ही राजा यांनी पोलखोल केली. माजी दूरसंचार मंत्री म्हणून अरुण शौरी यांनी 26 तर दयानिधी मारन यांनी 25 लायसन्सचं वाटप केलं. मी 122 लायसन्सचे वाटप केलं. किती लायसन्स वाटले यामुळे काही फरक पडत नाही. यापैकी कुणीच स्पेक्ट्रमचा लिलाव केला नाही हे महत्त्वाचे आहे. त्यांनी जर काही चुकीचं केलं नसेल.

तर मग माझी चौकशी कशी होऊ शकते? 2 जी चा लिलाव करायचा नाही या 2003 मध्ये कॅबिनेटने घेतलेल्या निर्णयाचे मी फक्त पालन केलं. मी जर कायद्याचंच पालन केलं असेल तर माझ्यावर खटला चालायला नको, उलट मला बक्षीस मिळायला हवं. टाटांनी 27 टक्के इक्विटी डोकोमोला विकून फायदा करून घेतला. पण सीबीआयनं त्यांना मात्र आरोपी केलं नाहीय असा आरोप ही राजा यांनी केला.

राजा यांनी दूरसंचार मंत्री म्हणून आपण राबवलेल्या धोरणाचंही समर्थन केलं. ते म्हणाले, रस्त्यावरच्या प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल फोन असावा, या सामाजिक न्यायाचे आश्वासन मी पाळले. मी जनतेचा सेवक आहे. आणि मी मोबाईल फोनचे कॉल रेट्स स्वस्त केले. इतके स्वस्त की रिक्षावाला किंवा घरकाम करणार्‍याच्या हातातही फोन आला.

राजा यांच्यावर फसवणूक, अफरातफर आणि गुन्हेगारी कटाचे आरोप आहेत. तब्बल पावणे दोन लाखाच्या या 2 जी घोटाळ्याप्रकरणी द्रमुकचे तीन नेते अडचणीत आलेत. आता केवळ राजा यांनी पंतप्रधान आणि एनडीएलाही या घोटाळ्याची व्याप्ती वाढवली. या मुद्द्यावरून येतं पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हं आहेत.

दरम्यान, राजा यांच्या आरोपानंतर आता पंतप्रधान मनमोहन सिंग आणि केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली. तसेच कोणत्याही चौकशीसाठी एनडीएची तयारी असल्याचे ते म्हणाले.

नितीन गडकरी यांच्या मागणीवर कपिल सिब्बल यांनी समाचार घेतला. राजा यांच्या सारख्या एका आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर वक्तव्य करतात हे चुकीचं आहे अशी टीका कपिल सिब्बल यांनी केली.

तर राजा आणि गडकरी यांच्या आरोपांवर पी. चिदंबरम यांनी काय उत्तर दिलं चिदंबरम म्हणतात, नवे शेअर्स उपलब्ध करून परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करता येतील असं पंतप्रधानांच्या उपस्थितीत चर्चा झाली. पण युनिटेक किंवा स्वान टेलिकॉमच्या स्पेक्ट्रम विक्रीवर काहीच बोलणं झालं नाही.

भाजप काही विशिष्ट मंत्र्यांना लक्ष्य करतंय कारण उजव्या विचारसरणीच्या दहशतवादी कृत्यांमध्ये आणि अयोध्या प्रकरणामध्ये यूपीए सरकारने वेगात चौकशी सुरू केली. भारतातल्याच उजव्या विचारसरणीच्या कट्टरवादी संघटनांनी बॉम्ब तयार केले. आणि बॉम्बस्फोट घडवून लोकांचा बळी घेतला.

2 जी घोटाळ्याची खरोखरच 1993 पूर्वीपासून चौकशी करायची झाली तर कोणते दूरसंचार मंत्री अडचणीत येऊ शकतात ते पाहूया.

कोणते दूरसंचार मंत्री टार्गेट ?

1991-1996 - सुखराम ( काँग्रेस)1999-2001 - रामविलास पासवान ( लोकजनशक्ती पक्ष)2001-2003 - प्रमोद महाजन (भाजप)2004-2006 - दयानिधी मारन ( द्रमुक)2007-2009 - ए. राजा (द्रमुक)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2011 08:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close