S M L

येडियुरप्पांवर टांगती तलवार

27 जुलैकर्नाटकचे लोकायुक्त संतोष हेगडे यांच्या अहवालात मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर थेठ ठपका ठेवण्यात आला. त्यांच्यावर भ्रष्टाचार विरोधी कायद्याखाली कारवाईची शिफारस केली. बेकायदेशीर मायनिंगमुळे राज्याला 16 हजार 85 कोटींचा तोटा झाला. यात येडियुरप्पा यांचे कुटुंबीय, रेड्डी बंधू, माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि काँग्रेसचे खासदार अनिल लाड यांच्या पत्नीचा समावेश असल्याचे संतोष हेगडे यांनी सांगितलं. अखेरीस सस्पेंस संपला आणि कर्नाटकाचे लोकायुक्त संतोष हेगडे यांनी बेकायदेशीर खाणकामावरचा अहवाल कर्नाटक सरकार आणि राज्यपालांकडे सादर केला. या अहवालात राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर थेट ठपका ठेवण्यात आला. दहा हजार पानांच्या या अहवालात म्हटलंय की, येडियुरप्पा यांच्यावर ठपका !- अवैध खाणकामामुळे राज्याचे 16 हजार कोटी रुपयांचे नुकसान झालं- अवैध काम करणा-या काही कंपन्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाला पैसे पुरवले- मुख्यमंत्री येडियुरप्पांच्या कुटुंबीयांनी एक भूखंड 20 कोटी रुपयांना एका खाण कंपनीला विकला- त्या कंपनीने मुख्यमंत्र्यांच्या ट्रस्टला 10 कोटी रुपयांची देणगी दिली- त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर फौैजदारी कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली- येडियुरप्पा सरकारमध्ये सहभागी असलेल्या रेड्डी बंधूंचा घोटाळ्यात मोठा हात असल्याचे पुरावे आहेत- संयुक्त जनता दलाचे नेते कुमारस्वामी आणि काँग्रेस खासदार अनिल लाड यांच्या पत्नीही घोटाळ्यात सहभागी आहेतहा अहवाल येण्याआधी येडियुरप्पांची भूमिका ताठर होती. आपण पुढचे दोन वर्ष मुख्यमंत्री राहू असं ते ठणकावून सांगत होते. पण संध्याकाळी त्यांनी आपली भूमिका काहीशी मवाळ केली आणि विचार करायला थोडा वेळ हवा असं म्हणाले.सकाळी तिरुपतीचं दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी येडियुरप्पा दिल्लीच्या दिशेने निघाले. दिल्लीत पक्षाध्यक्ष नितिन गडकरी आणि इतर नेत्यांना ते भेटणार आहेत. यापूर्वी येडियुरप्पांनी अनेक वादळी प्रसंग पार केले असले. तरी यंदाची परिस्थिती वेगळी आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाजप काँग्रेसवर हल्ला करण्याआधीच. काँग्रेस येदियुरप्पांचा मुद्दा काढून भाजपला शांत करतं आहे.संयुक्त जनता दलाचे नेते कुमारस्वामी यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला असला, तरी कारवाईची शिफारस करण्यात आली नाही. त्यांनीही मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे म्हणणं ऐकून येडियुरप्पा राजनीनामा देतील का ? ते पायउतार होऊन उत्तराधिकारी नेमतील का ? की विधानसभा विसर्जित करून निवडणुकांचा आग्रह धरतील? या प्रश्नांची उत्तर येत्या 24 तासांत मिळतील. पण राज्यपाल हंसराज भारद्वाज त्याआधीच कारवाई करण्याचीही दाट शक्यता आहे. लोकायुक्तांचे अधिकार - तक्रारी किंवा आरोपांच्या चौकशीचा अहवाल तयार करणे, तो राज्य सरकारकडे देणे - अहवाल मिळाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत सरकारने कारवाईची माहिती लोकायुक्तांना देणं गरजेचं - कारवाईवर लोकायुक्तांचे समाधान झाल्यास ती केस बंद होते - समाधान झालं नाही तर लोकायुक्त विशेष अहवाल तयार करून राज्यपालांकडे देऊ शकतात - लोकप्रतिनिधींनी गुन्हा केलाय अशी खात्री झाली तर लोकायुक्त खटला चालवण्याचे आदेश देऊ शकतात - संबंधित लोकप्रतिनिधीनं ऑफिसमध्ये येऊ नये, असं पत्रक लोकायुक्त जारी करू शकतात कर्नाटक भाजपमध्ये येडियुरप्पांचं स्थान खूप महत्त्वाचं आहे- येडियुरप्पा कर्नाटकातील भाजपचे सर्वात ज्येष्ठ आणि लोकप्रिय नेते - लिंगायत समाजाचे निर्विवाद नेते - कर्नाटकात लिंगायत समाजाच्या लोकसंख्येचा वाटा 20% - गेल्या 38 महिन्यात भाजपने त्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक निवडणूक जिंकली - गेल्या 25 वर्षांत त्यांनी भाजपच्या मतांचा वाटा 2 टक्क्यांवरून 43 टक्क्यांपर्यंत नेला - कर्नाटकात भाजपकडे त्यांच्या तोडीचा दुसरा नेता नाहीमुख्यमंत्री पदाचे दावेदारजगदीश शेट्टार - ग्रामविकास मंत्री सुरेश कुमार - कायदा मंत्री व्ही. एस. आचार्य - उच्च शिक्षण मंत्री अनंत कुमार - ज्येष्ठ भाजप नेते शोभा करंदळजे - ऊर्जी मंत्री आर. अशोक - गृह आणि वाहतूक मंत्री के. एस. ईश्वरप्पा - प्रदेशाध्यक्ष, भाजप

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 27, 2011 10:50 AM IST

येडियुरप्पांवर टांगती तलवार

27 जुलै

कर्नाटकचे लोकायुक्त संतोष हेगडे यांच्या अहवालात मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर थेठ ठपका ठेवण्यात आला. त्यांच्यावर भ्रष्टाचार विरोधी कायद्याखाली कारवाईची शिफारस केली. बेकायदेशीर मायनिंगमुळे राज्याला 16 हजार 85 कोटींचा तोटा झाला. यात येडियुरप्पा यांचे कुटुंबीय, रेड्डी बंधू, माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि काँग्रेसचे खासदार अनिल लाड यांच्या पत्नीचा समावेश असल्याचे संतोष हेगडे यांनी सांगितलं.

अखेरीस सस्पेंस संपला आणि कर्नाटकाचे लोकायुक्त संतोष हेगडे यांनी बेकायदेशीर खाणकामावरचा अहवाल कर्नाटक सरकार आणि राज्यपालांकडे सादर केला. या अहवालात राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर थेट ठपका ठेवण्यात आला. दहा हजार पानांच्या या अहवालात म्हटलंय की,

येडियुरप्पा यांच्यावर ठपका !

- अवैध खाणकामामुळे राज्याचे 16 हजार कोटी रुपयांचे नुकसान झालं- अवैध काम करणा-या काही कंपन्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाला पैसे पुरवले- मुख्यमंत्री येडियुरप्पांच्या कुटुंबीयांनी एक भूखंड 20 कोटी रुपयांना एका खाण कंपनीला विकला- त्या कंपनीने मुख्यमंत्र्यांच्या ट्रस्टला 10 कोटी रुपयांची देणगी दिली- त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर फौैजदारी कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली- येडियुरप्पा सरकारमध्ये सहभागी असलेल्या रेड्डी बंधूंचा घोटाळ्यात मोठा हात असल्याचे पुरावे आहेत- संयुक्त जनता दलाचे नेते कुमारस्वामी आणि काँग्रेस खासदार अनिल लाड यांच्या पत्नीही घोटाळ्यात सहभागी आहेत

हा अहवाल येण्याआधी येडियुरप्पांची भूमिका ताठर होती. आपण पुढचे दोन वर्ष मुख्यमंत्री राहू असं ते ठणकावून सांगत होते. पण संध्याकाळी त्यांनी आपली भूमिका काहीशी मवाळ केली आणि विचार करायला थोडा वेळ हवा असं म्हणाले.

सकाळी तिरुपतीचं दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी येडियुरप्पा दिल्लीच्या दिशेने निघाले. दिल्लीत पक्षाध्यक्ष नितिन गडकरी आणि इतर नेत्यांना ते भेटणार आहेत. यापूर्वी येडियुरप्पांनी अनेक वादळी प्रसंग पार केले असले. तरी यंदाची परिस्थिती वेगळी आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाजप काँग्रेसवर हल्ला करण्याआधीच. काँग्रेस येदियुरप्पांचा मुद्दा काढून भाजपला शांत करतं आहे.

संयुक्त जनता दलाचे नेते कुमारस्वामी यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला असला, तरी कारवाईची शिफारस करण्यात आली नाही. त्यांनीही मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे म्हणणं ऐकून येडियुरप्पा राजनीनामा देतील का ? ते पायउतार होऊन उत्तराधिकारी नेमतील का ? की विधानसभा विसर्जित करून निवडणुकांचा आग्रह धरतील? या प्रश्नांची उत्तर येत्या 24 तासांत मिळतील. पण राज्यपाल हंसराज भारद्वाज त्याआधीच कारवाई करण्याचीही दाट शक्यता आहे. लोकायुक्तांचे अधिकार

- तक्रारी किंवा आरोपांच्या चौकशीचा अहवाल तयार करणे, तो राज्य सरकारकडे देणे - अहवाल मिळाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत सरकारने कारवाईची माहिती लोकायुक्तांना देणं गरजेचं - कारवाईवर लोकायुक्तांचे समाधान झाल्यास ती केस बंद होते - समाधान झालं नाही तर लोकायुक्त विशेष अहवाल तयार करून राज्यपालांकडे देऊ शकतात - लोकप्रतिनिधींनी गुन्हा केलाय अशी खात्री झाली तर लोकायुक्त खटला चालवण्याचे आदेश देऊ शकतात - संबंधित लोकप्रतिनिधीनं ऑफिसमध्ये येऊ नये, असं पत्रक लोकायुक्त जारी करू शकतात

कर्नाटक भाजपमध्ये येडियुरप्पांचं स्थान खूप महत्त्वाचं आहे- येडियुरप्पा कर्नाटकातील भाजपचे सर्वात ज्येष्ठ आणि लोकप्रिय नेते - लिंगायत समाजाचे निर्विवाद नेते - कर्नाटकात लिंगायत समाजाच्या लोकसंख्येचा वाटा 20% - गेल्या 38 महिन्यात भाजपने त्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक निवडणूक जिंकली - गेल्या 25 वर्षांत त्यांनी भाजपच्या मतांचा वाटा 2 टक्क्यांवरून 43 टक्क्यांपर्यंत नेला - कर्नाटकात भाजपकडे त्यांच्या तोडीचा दुसरा नेता नाही

मुख्यमंत्री पदाचे दावेदार

जगदीश शेट्टार - ग्रामविकास मंत्री सुरेश कुमार - कायदा मंत्री व्ही. एस. आचार्य - उच्च शिक्षण मंत्री अनंत कुमार - ज्येष्ठ भाजप नेते शोभा करंदळजे - ऊर्जी मंत्री आर. अशोक - गृह आणि वाहतूक मंत्री के. एस. ईश्वरप्पा - प्रदेशाध्यक्ष, भाजप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 27, 2011 10:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close