S M L

चंद्रावर स्वारी

14 नोव्हेंबरसंपूर्ण भारतीय बनावटीची पहिली मानवरहीत चंद्रमोहीम यशस्वी ठरली आहे. चांद्रयान वन हे भारताचं यान चंद्राच्या कक्षेत स्थिरावलं आहे. चंद्रापासून फक्त 100 किलोमीटर अंतरावरुन आज चांद्रयानाचा इम्पॅक्टर प्रोब चंद्रावर आदळणार आहे. चंद्रावर जाऊन भारत काय साध्य करणार आहे ? चांद्रयान सोडण्याचा उद्देश नेमका काय आहे ? पुढच्या दोन वर्षात चंद्रावरुन ते कोणकोणती माहिती पाठवणार आहे ? या प्रश्नांची उत्तरं शोधणारा हा स्पेशल रिपोर्ट.भारत स्वत:ची चंद्रमोहीम हाती घेणार असल्याची घोषणा 11 मे 1999 ला पहिल्यांदा करण्यात आली. त्यानंतर सुरु झाले इस्त्रो आणि भारतीय शास्त्रज्ञांचे अथक प्रयत्न. यातूनचम 386 कोटी रुपयांचं बजेट असलेलं चांद्रयान तयार करण्यात आलं. नासा, बल्गेरिया, युरोपियन अंतराळ संशोधन संस्थांचेही पाच प्रोजेक्ट यामध्ये घेण्यात आले. 49 तासांच्या काउंटडाउनमध्ये चांद्रयानाची परिपूर्ण पाहणी करण्यात आली. त्यानंतर 22 ऑक्टोबरला श्रीहरिकोटा येथून चांद्रयानाने चंद्रावर यशस्वी उड्डाण केलं आणि इतिहास रचला.पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचे 3 लाख 84 हजार किलोमीटर्स एवढं अंतर चांद्रयानाने 21 दिवसात पूर्ण केलंय. आता चांद्रयान चंद्राच्या कक्षेपासून 100 किलोमीटरच्या अंतरावर भ्रमण करत आहे. पुढची दोन वर्ष चांद्रयान याच कक्षेत राहील. चांद्रयानाचा इम्पॅक्टर प्रोब चंद्रावर आदळल्यानंतर चंद्राचे अतिशय जवळून काढलेले फोटो इस्त्रोला मिळायला सुरुवात होईल. 21 इंचाच्या टीव्हीच्या आकाराच्या या चौरसाकृती इम्पॅक्टरवर भारताच्या तिरंग्याचं चित्र रंगवलेलं आहे.आतापर्यंत अमेरिका, रशिया, चीन आणि जपान यांनी मिळून 69 वेळा चंद्रावर स्वारी केलेली असतानाही भारताला स्वतंत्रपणे चंद्रमोहीम घेण्याची आवश्यकता आहे का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. पण या प्रश्नाचं उत्तर देताना खगोलशास्त्रज्ञ अनिकेत सुळे म्हणाले ' पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र नेहमीच पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो. त्यावेळी पृथ्वीचीही स्वत:भोवती प्रदक्षिणा सुरु असते. त्यामुळे चंद्राची एक बाजू पृथ्वीला कधी दिसत नाही. आतापर्यंत चंद्राच्या या न दिसलेल्या भागाचा कधीच न झालेला अभ्यासही या मोहीमेत केला जाणार आहे. 'या मोहिमेतून चंद्राचं अगदी जवळून काढलेले फोटो इस्त्रोला मिळणार आहेत. हे फोटो अतिशय चांगल्या दर्जाचे सूक्ष्म असतील. चंद्रावर हेलियमसारखी कोणकोणती खनिज आहेत का, पाणी आहे का, याचा शोध या फोटोंमधून घेण्यात येईल. एकूणच चंद्राच्या सूक्ष्म अभ्यासाच्या दृष्टीने ही मोहिम महत्त्वाची आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 14, 2008 09:58 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2008 09:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close