S M L

जालना गोळीबार प्रकरणी निवृत्त न्यायाधीश करणार चौकशी !

27 जुलैजालन्यात झालेल्या वारकर्‍यांच्या अपघाताचा मुद्दा आज विधानसभा आणि विधानपरिषदेत चांगलच गाजला. अपघातानंतर पोलिसांनी केलेला लाठीमार आणि गोळीबाराच्या प्रकरणावर चर्चा झाली. पोलीस गोळीबाराची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपये मदत वाढवून देण्याचे आश्वासनही दिलं. पण तेवढ्यावर विरोधकांचं समाधान झालं नाही. अखेर मदत वाढवून देण्यासाठी उद्या पुन्हा बैठक होईल असं आर. आर. पाटील यांनी सांगितलं. तरीही विरोधकांचा गोंधळ कमी झाला नाही. गृहखात्याने संबंधित पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी विरोधकांनी केली. पण गृहमंत्र्यांनी, यात पोलिसांचा काहीच दोष नाही अशी भूमिका घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 27, 2011 04:53 PM IST

जालना गोळीबार प्रकरणी निवृत्त न्यायाधीश करणार चौकशी !

27 जुलै

जालन्यात झालेल्या वारकर्‍यांच्या अपघाताचा मुद्दा आज विधानसभा आणि विधानपरिषदेत चांगलच गाजला. अपघातानंतर पोलिसांनी केलेला लाठीमार आणि गोळीबाराच्या प्रकरणावर चर्चा झाली. पोलीस गोळीबाराची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले.

तसेच मृतांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपये मदत वाढवून देण्याचे आश्वासनही दिलं. पण तेवढ्यावर विरोधकांचं समाधान झालं नाही. अखेर मदत वाढवून देण्यासाठी उद्या पुन्हा बैठक होईल असं आर. आर. पाटील यांनी सांगितलं. तरीही विरोधकांचा गोंधळ कमी झाला नाही. गृहखात्याने संबंधित पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी विरोधकांनी केली. पण गृहमंत्र्यांनी, यात पोलिसांचा काहीच दोष नाही अशी भूमिका घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 27, 2011 04:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close