S M L

'आयपीएल'कडून 5 कोटी येणं बाकी !

29 जुलैआयपीएल आयोजकांनी अजून 5 कोटी रुपयाची थकबाकी दिली नाही अशी माहिती आर.आर. पाटील यांनी आज विधानसभेत दिली. आयपीएल आयोजकांनी 5 कोटी 16 लाख रुपयांचा भरणा केला नाही. मॅचेस दरम्यान पोलीस बंदोबस्त पुरवण्याचा खर्च त्यांनी दिलेला नाही. आयपीएलच्या आयोजकांनी आतापर्यंत 47 लाख 53 हजार रुपयेचं भरल्याचं आर.आर. पाटील यांनी सांगितले.आयपीएलच्या आयोजकांनी गेल्यावर्षी सात मॅचेससाठी पुरवण्यात आलेल्या सुरक्षेचे पाच कोटी रुपये थकवले आहे. तर यावर्षी सात मॅचेससाठी साडेपाच कोटीच्या जवळपास थकबाकी आहे. एकूण दहा कोटीहुन अधिक थकबाकी पैकी फक्त 45 लाख रुपयांचाच भरणा आयपीएलच्या आयोजकांनी दिले आहे. मागच्या वर्षीची थकबाकी असून देखिल यावेळीच्या सात मॅचेसना सुरक्षा पुरवण्यात आली. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री आर आर पाटील यांनी सुरक्षेचे पैसे न भरणार्‍यांना सुरक्षा न देण्याचे आदेश दिले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 29, 2011 12:52 PM IST

'आयपीएल'कडून 5 कोटी येणं बाकी !

29 जुलै

आयपीएल आयोजकांनी अजून 5 कोटी रुपयाची थकबाकी दिली नाही अशी माहिती आर.आर. पाटील यांनी आज विधानसभेत दिली. आयपीएल आयोजकांनी 5 कोटी 16 लाख रुपयांचा भरणा केला नाही. मॅचेस दरम्यान पोलीस बंदोबस्त पुरवण्याचा खर्च त्यांनी दिलेला नाही. आयपीएलच्या आयोजकांनी आतापर्यंत 47 लाख 53 हजार रुपयेचं भरल्याचं आर.आर. पाटील यांनी सांगितले.

आयपीएलच्या आयोजकांनी गेल्यावर्षी सात मॅचेससाठी पुरवण्यात आलेल्या सुरक्षेचे पाच कोटी रुपये थकवले आहे. तर यावर्षी सात मॅचेससाठी साडेपाच कोटीच्या जवळपास थकबाकी आहे. एकूण दहा कोटीहुन अधिक थकबाकी पैकी फक्त 45 लाख रुपयांचाच भरणा आयपीएलच्या आयोजकांनी दिले आहे. मागच्या वर्षीची थकबाकी असून देखिल यावेळीच्या सात मॅचेसना सुरक्षा पुरवण्यात आली. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री आर आर पाटील यांनी सुरक्षेचे पैसे न भरणार्‍यांना सुरक्षा न देण्याचे आदेश दिले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 29, 2011 12:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close