S M L

आयबीएन लोकमत इम्पॅक्ट : गरूड स्तंभाभोवतीचे 4 पिलर पाडण्याचे आदेश

29 जुलैआळंदी येथील इंद्रायणी नदीत बांधलेल्या अवैध गरूड स्तंभाभोवती बांधलेले चार पिलर पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी हे आदेश दिले. पिलर उभारताना आक्षेप का घेतला नाही असा जाबही आयुक्तांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारला. 15 दिवसांमध्ये हे बांधकाम पाडण्यात यावे असा आदेशही आयुक्तांनी दिला. आयबीएन लोकमतने याबाबची बातमी दिली होती. आळंदी इथं इंद्रायणीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या भव्य गरुड स्तंभाचे बांधकाम बेकायदेशीर असल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली होती. विशेष म्हणजे 14 मे 2009 मध्ये आपल्या अधिकाराचा वापर करत तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांनी इंद्रायणी नदीपात्रात हा गरुड स्तंभ उभारण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी दिली होती. नदीपात्रातील हे अनधिकृत बांधकाम पाडण्यास पाटबंधारे विभागाकडून टाळाटाळ होत होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 29, 2011 01:47 PM IST

आयबीएन लोकमत इम्पॅक्ट : गरूड स्तंभाभोवतीचे 4 पिलर पाडण्याचे आदेश

29 जुलै

आळंदी येथील इंद्रायणी नदीत बांधलेल्या अवैध गरूड स्तंभाभोवती बांधलेले चार पिलर पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी हे आदेश दिले. पिलर उभारताना आक्षेप का घेतला नाही असा जाबही आयुक्तांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारला.

15 दिवसांमध्ये हे बांधकाम पाडण्यात यावे असा आदेशही आयुक्तांनी दिला. आयबीएन लोकमतने याबाबची बातमी दिली होती. आळंदी इथं इंद्रायणीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या भव्य गरुड स्तंभाचे बांधकाम बेकायदेशीर असल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली होती.

विशेष म्हणजे 14 मे 2009 मध्ये आपल्या अधिकाराचा वापर करत तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांनी इंद्रायणी नदीपात्रात हा गरुड स्तंभ उभारण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी दिली होती. नदीपात्रातील हे अनधिकृत बांधकाम पाडण्यास पाटबंधारे विभागाकडून टाळाटाळ होत होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 29, 2011 01:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close