S M L

लेखिका म्हणून प्रियंका गांधी यांची 'छबी' कैद

31 जुलैप्रियंका गांधी या राजकारणी आहेत हे सर्वांना माहित आहेत. पण प्रियंका गांधी या लेखिका आणि फोटोग्राफर आहेत हे मात्र तुम्ही कधीही ऐकलं नसेल. प्रियांका गांधींनी वाईल्ड लाईफ आणि वाघांवर लिहिलेलं पुस्तक आलं आहे. "मी 13 वर्षांची असताना माझ्या कुटुंबीयांसोबत जंगल सफारीवर आले होते. आज अगदी तसेच माझी मुलंही माझ्यासोबत येतात. मला वाटतं माझ्या वडिलांचं निसर्गावर असलेलं प्रेम माझ्यातही उतरलं."हे शब्द आहेत प्रियंका गांधीचे. वन्यजीवांबद्दलचे त्यांचे प्रेम नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या टायगर रिलम या कॉफी टेबल बुक मधून दिसून येतं. लेखिका आणि फोटोग्राफर म्हणून प्रियंका गांधी वढेरा यांचं हे पहिलंच पुस्तक आहे. वाघांच्या प्रदेशातून प्रवास करताना प्रियंका गांधी, अंजली आणि जैसल सिंग यांनी हे फोटो काढलेत. वाघांबद्दलचे हे प्रेम आपल्याला वारशाने मिळालेलं आहे असं त्या स्पष्ट करतात. वडिल राजीव गांधी आणि आजी इंदिरा गांधी यांनी देशातील वाघांच्या संवर्धनासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविले होते. त्यामुळे त्यांच वन्यजीवासंदर्भात मोठं योगदान आहे. जैसल सिंग हे या पुस्तकाचे सहलेखक आहेत. जंगलात फोटो काढताना आलेल्या अनुभवाबद्दल सांगताना ते म्हणतात. खरं तर आम्ही खूप नशिबवान आहोत की आम्हाला एवढ्या कमी वेळात जंगलाची विविधता टिपता आली. तसं पाहिलं तर आमच्या पैकी कोणीही प्रोफेशनल फोटोग्राफर नव्हता तरीही जंगलाचे विविधांगी रुप आम्हाला कॅमेरात बंदिस्त करता आलं. या पुस्तकाच्या माध्यमातून प्रियंका गांधी या इंदिरा गांधी यांच्याच मार्गावरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. जंगलातील प्राण्यांसोबत असल्यानंतरचा आनंद काही वेगळाच असतो असं त्या म्हणतात. प्रियंका गांधींचे टायगर रिलम हे पुस्तक केवळ पर्सनल जर्नीचं असेल तरी ते भारतातील वन्य जीवांच्या विविधतेचं दर्शन घडविणारंही आहे हे नक्की.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 31, 2011 04:30 PM IST

लेखिका म्हणून प्रियंका गांधी यांची 'छबी' कैद

31 जुलै

प्रियंका गांधी या राजकारणी आहेत हे सर्वांना माहित आहेत. पण प्रियंका गांधी या लेखिका आणि फोटोग्राफर आहेत हे मात्र तुम्ही कधीही ऐकलं नसेल. प्रियांका गांधींनी वाईल्ड लाईफ आणि वाघांवर लिहिलेलं पुस्तक आलं आहे.

"मी 13 वर्षांची असताना माझ्या कुटुंबीयांसोबत जंगल सफारीवर आले होते. आज अगदी तसेच माझी मुलंही माझ्यासोबत येतात. मला वाटतं माझ्या वडिलांचं निसर्गावर असलेलं प्रेम माझ्यातही उतरलं."

हे शब्द आहेत प्रियंका गांधीचे. वन्यजीवांबद्दलचे त्यांचे प्रेम नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या टायगर रिलम या कॉफी टेबल बुक मधून दिसून येतं. लेखिका आणि फोटोग्राफर म्हणून प्रियंका गांधी वढेरा यांचं हे पहिलंच पुस्तक आहे.

वाघांच्या प्रदेशातून प्रवास करताना प्रियंका गांधी, अंजली आणि जैसल सिंग यांनी हे फोटो काढलेत. वाघांबद्दलचे हे प्रेम आपल्याला वारशाने मिळालेलं आहे असं त्या स्पष्ट करतात. वडिल राजीव गांधी आणि आजी इंदिरा गांधी यांनी देशातील वाघांच्या संवर्धनासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविले होते. त्यामुळे त्यांच वन्यजीवासंदर्भात मोठं योगदान आहे.

जैसल सिंग हे या पुस्तकाचे सहलेखक आहेत. जंगलात फोटो काढताना आलेल्या अनुभवाबद्दल सांगताना ते म्हणतात. खरं तर आम्ही खूप नशिबवान आहोत की आम्हाला एवढ्या कमी वेळात जंगलाची विविधता टिपता आली. तसं पाहिलं तर आमच्या पैकी कोणीही प्रोफेशनल फोटोग्राफर नव्हता तरीही जंगलाचे विविधांगी रुप आम्हाला कॅमेरात बंदिस्त करता आलं.

या पुस्तकाच्या माध्यमातून प्रियंका गांधी या इंदिरा गांधी यांच्याच मार्गावरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. जंगलातील प्राण्यांसोबत असल्यानंतरचा आनंद काही वेगळाच असतो असं त्या म्हणतात. प्रियंका गांधींचे टायगर रिलम हे पुस्तक केवळ पर्सनल जर्नीचं असेल तरी ते भारतातील वन्य जीवांच्या विविधतेचं दर्शन घडविणारंही आहे हे नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 31, 2011 04:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close