S M L

जुहू किनार्‍यावर जहाज हटावा मोहिम ; 3 जणांवर गुन्हा दाखल

01 ऑगस्ट मुंबईच्या वर्सोवा समुद्रकिनार्‍यावर अडकून पडलेल्या एम व्ही पवित या तेलवाहू जहाजाला वाळूतून बाहेर काढण्याचे काम उद्यावर ढकलण्यात आलं. टगबोटीच्या साहय्याने पवितला समुद्रात खेचण्याचा प्रयत्न सुरु होते. पण,आता भरतीची वेळ संपत आल्याने या काळात सॉलवेज ऑरेशन करणे कठिण असल्याचे कोस्टगार्ड तर्फे सांगण्यात आलं. हे ऑरेशन उद्याच्या भरतीच्या वेळी पुन्हा सुरु करण्यात येईल. मुंबईच्या वर्सोवा समुद्रकिनार्‍यावर अडकून पडलेल्या एम व्ही पवित या तेलवाहू जहाजाला वाळूतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. हेलिकॉप्टरवरून या जहाजावर काही रोपही सोडण्यात आले आहेत. या जहाजाचे वजन 1 हजार टन आहे. कालपासून हे जहाज वर्सोवा आणि जुहू दरम्यान समुद्र किनार्‍यावर वाळूत रूतून बसलंय. हे ऑईल टँकर असलं तरी यातून समुद्रात तेलगळती होण्याची शक्यता नसल्याचे कस्टम अधिकार्‍यांनी सांगितले आहे.मूळचं ओमान देशाचं असलेलं हे जहाज काही दिवसांपूर्वी अमेरिकन सैनिकांनी जहाजावरील कर्मचार्‍यांची सुटका करुन समुद्रात सोडून दिल्याचे समजतं. कोस्ट गार्डने या जहाजाचा ताबा घेतला. दरम्यान या जहाजाचा मालक, कॅप्टन आणि चीफ इंजिनियरवर येलो गेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 1, 2011 01:24 PM IST

जुहू किनार्‍यावर जहाज हटावा मोहिम ; 3 जणांवर गुन्हा दाखल

01 ऑगस्ट

मुंबईच्या वर्सोवा समुद्रकिनार्‍यावर अडकून पडलेल्या एम व्ही पवित या तेलवाहू जहाजाला वाळूतून बाहेर काढण्याचे काम उद्यावर ढकलण्यात आलं. टगबोटीच्या साहय्याने पवितला समुद्रात खेचण्याचा प्रयत्न सुरु होते. पण,आता भरतीची वेळ संपत आल्याने या काळात सॉलवेज ऑरेशन करणे कठिण असल्याचे कोस्टगार्ड तर्फे सांगण्यात आलं. हे ऑरेशन उद्याच्या भरतीच्या वेळी पुन्हा सुरु करण्यात येईल.

मुंबईच्या वर्सोवा समुद्रकिनार्‍यावर अडकून पडलेल्या एम व्ही पवित या तेलवाहू जहाजाला वाळूतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. हेलिकॉप्टरवरून या जहाजावर काही रोपही सोडण्यात आले आहेत. या जहाजाचे वजन 1 हजार टन आहे. कालपासून हे जहाज वर्सोवा आणि जुहू दरम्यान समुद्र किनार्‍यावर वाळूत रूतून बसलंय. हे ऑईल टँकर असलं तरी यातून समुद्रात तेलगळती होण्याची शक्यता नसल्याचे कस्टम अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

मूळचं ओमान देशाचं असलेलं हे जहाज काही दिवसांपूर्वी अमेरिकन सैनिकांनी जहाजावरील कर्मचार्‍यांची सुटका करुन समुद्रात सोडून दिल्याचे समजतं. कोस्ट गार्डने या जहाजाचा ताबा घेतला. दरम्यान या जहाजाचा मालक, कॅप्टन आणि चीफ इंजिनियरवर येलो गेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 1, 2011 01:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close