S M L

साहित्यिकांच्या भूखंडावर भूमाफियांनी मारला डल्ला

02 ऑगस्टदेशभरात सध्या भूखंड घोटाळ्याचं पेव फुटलंय. एकामागोमाग एक भूखंड घोटाळे सध्या उघडकीला येत आहेत. औरंगाबादेत तर भूखंड माफियांनी चक्क साहित्यिकांच्याच भूखंडावर डल्ला मारल्याचे प्रकरण उघडकीस आलं आहे. जेष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ. गंगाधर पानतावणे आणि दिवगंत कवी वामन निंबाळकर यांनी सामाजिक उपक्रमासाठी पस्तीस वर्षांपूर्वी विकत घेतलेल्या जागेवर भूखंड पाडून त्याची विक्री करण्यात आली. विशेष म्हणजे हे अतिक्रमण होताना जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिसात रीतसर तक्रार करूनही माफियांना मज्जाव झाला नाही. त्यामुळे या जागेवर आता घरंही उभी राहिली. निंबाळकर यांच्या पत्नी हिराबाई यांनी पोलीस ठाण्यात आणि जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दिली. त्यांनी उपोषणही केलं. पण त्यांना कुणी दाद दिली नाही. या जागेची मोजणी करण्यासाठी हिराबाई निंबाळकर यांनी 22 जून 2009 रोजी भूमि अभिलेख कार्यालयात अर्ज केला. पण मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकार्‍यांना गुंडांनी पिटाळून लावले. आता हे सगळे प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासन या संदर्भात दोषी असलेल्यांवर काय कारवाई होतेय ते पाहणे महत्वाचे आहे. पडेगाव येथील रावरसपुर्‍यातील गट क्रमांक तेहतीस मधील दोन एकर जागा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे आणि कवि वामन निंबाळकर यांनी सामाजिक उपक्रमसाठी विकत घेतली होती. पसतीस वर्षापूर्वी विकत घेतलेल्या या जागेवर कामाच्या व्यापामुळे प्रकल्प उभारता आला नाही. ही जमीन पूर्वी महापालिकेच्या हद्दीत नव्हती. मात्र महापालिका हद्दीत येताच जमिनीची किंमत कोट्यवधी रूपयात झाली आणि भूखंड माफियांनी त्यावर भूखंड पाडून विक्रीस सुरूवात केली. ही माहिती कळताच निंबाळकर यांच्या पत्नी हिराबाई यांनी पोलीस ठाण्यात आणि जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दिली. त्यांनी उपोषणही केले. पण त्यांना कुणी दाद दिली नाही. या जागेची मोजणी करण्यासाठी हिराबाई निंबाळकर यांनी बावीस जून दोन हजार नऊ रोजी भूमि अभिलेख कार्यालयात अर्ज केला. पण मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकार्‍यांना गुंडांनी पिटाळून लावलं. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी भूमि अभिलेख कार्यालय आणि पोलिसांना पत्र देऊन या प्रकरणी लेखी अहवालही मागितले. पण तसा अहवाल अद्यापही देण्यात आला नाही. त्यामुळे डॉ. गंगाधर पानतावणे यांनीही खंत व्यक्त केली आहे.ही जागा बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकावणार्‍या सतीश जयकर विरूध्द सरकार काय कारवाई करते का हाच प्रश्न डॉ. गंगाधर पानतावणे आणि वामन निंबाळकरांच्या कुटंुबीयांना भेडसावत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 2, 2011 06:12 PM IST

साहित्यिकांच्या भूखंडावर भूमाफियांनी मारला डल्ला

02 ऑगस्ट

देशभरात सध्या भूखंड घोटाळ्याचं पेव फुटलंय. एकामागोमाग एक भूखंड घोटाळे सध्या उघडकीला येत आहेत. औरंगाबादेत तर भूखंड माफियांनी चक्क साहित्यिकांच्याच भूखंडावर डल्ला मारल्याचे प्रकरण उघडकीस आलं आहे.

जेष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ. गंगाधर पानतावणे आणि दिवगंत कवी वामन निंबाळकर यांनी सामाजिक उपक्रमासाठी पस्तीस वर्षांपूर्वी विकत घेतलेल्या जागेवर भूखंड पाडून त्याची विक्री करण्यात आली. विशेष म्हणजे हे अतिक्रमण होताना जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिसात रीतसर तक्रार करूनही माफियांना मज्जाव झाला नाही.

त्यामुळे या जागेवर आता घरंही उभी राहिली. निंबाळकर यांच्या पत्नी हिराबाई यांनी पोलीस ठाण्यात आणि जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दिली. त्यांनी उपोषणही केलं. पण त्यांना कुणी दाद दिली नाही. या जागेची मोजणी करण्यासाठी हिराबाई निंबाळकर यांनी 22 जून 2009 रोजी भूमि अभिलेख कार्यालयात अर्ज केला. पण मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकार्‍यांना गुंडांनी पिटाळून लावले. आता हे सगळे प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासन या संदर्भात दोषी असलेल्यांवर काय कारवाई होतेय ते पाहणे महत्वाचे आहे.

पडेगाव येथील रावरसपुर्‍यातील गट क्रमांक तेहतीस मधील दोन एकर जागा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे आणि कवि वामन निंबाळकर यांनी सामाजिक उपक्रमसाठी विकत घेतली होती. पसतीस वर्षापूर्वी विकत घेतलेल्या या जागेवर कामाच्या व्यापामुळे प्रकल्प उभारता आला नाही. ही जमीन पूर्वी महापालिकेच्या हद्दीत नव्हती.

मात्र महापालिका हद्दीत येताच जमिनीची किंमत कोट्यवधी रूपयात झाली आणि भूखंड माफियांनी त्यावर भूखंड पाडून विक्रीस सुरूवात केली. ही माहिती कळताच निंबाळकर यांच्या पत्नी हिराबाई यांनी पोलीस ठाण्यात आणि जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दिली. त्यांनी उपोषणही केले. पण त्यांना कुणी दाद दिली नाही.

या जागेची मोजणी करण्यासाठी हिराबाई निंबाळकर यांनी बावीस जून दोन हजार नऊ रोजी भूमि अभिलेख कार्यालयात अर्ज केला. पण मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकार्‍यांना गुंडांनी पिटाळून लावलं.

याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी भूमि अभिलेख कार्यालय आणि पोलिसांना पत्र देऊन या प्रकरणी लेखी अहवालही मागितले. पण तसा अहवाल अद्यापही देण्यात आला नाही. त्यामुळे डॉ. गंगाधर पानतावणे यांनीही खंत व्यक्त केली आहे.

ही जागा बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकावणार्‍या सतीश जयकर विरूध्द सरकार काय कारवाई करते का हाच प्रश्न डॉ. गंगाधर पानतावणे आणि वामन निंबाळकरांच्या कुटंुबीयांना भेडसावत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 2, 2011 06:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close