S M L

येडियुरप्पांच्या मर्जीतले सदानंदा गौडा मुख्यमंत्रीपदी

03 ऑगस्टकर्नाटकातल्या मुख्यमंत्रीपदाच्या वादावर अखेर पडदा पडला. कर्नाटकातल्या नाटकाच्या क्लायमॅक्समध्ये दोन हीरो ठरले. 58 वर्षांचे सदानंदा गौडा आणि मावळते मुख्यमत्री बी. एस. येडियुरप्पा.सदानंदा गौडा यांची मुख्यमंत्री पदी निवड सहजासहजी झाली नाही. बेकायदेशीर मायनिंग प्रकरणी लोकायुक्तांच्या रिपोर्टनंतर येडियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला. पण आपण सुचवू तोच मुख्यमंत्री असा हट्ट धरत येडियुरप्पा यांनी रविवारी सदानंदा गौडा यांचं नाव सुचवलं. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला येडियुरप्पा यांची भूमिका मान्य नव्हती. हुबळीचे आमदार जगदीश शेट्टार मुख्यमंत्री बनावेत अशी त्यांची इच्छा होती. या गुंत्यामुळे अखेर मुख्यमंत्री निवडण्यासाठी गुप्त मतदान घेण्यात आलं. त्यात विधानसभा अध्यत्र वगळता 118 आमदारांनी मतदान केलं. त्यात सदानंदा गौडा यांनी जगदीश शेट्टार यांचा 8 मतांनी पराभव करत विजय मिळवला.कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदावर लवकरच परत येऊ असा दावा येडियुरप्पा करत आहे. गौडा यांचा विजय म्हणजे येडियुरप्पा यांनी आपल्या विरोधकांचा केलेला पराभव आहे. पण, हा निसटता पराभव असल्याने गौडा यांचा पुढचा मार्ग सोपा नाही. येडियुरप्पा यांच्या हातातीलं बाहुलं म्हणून ते काम करतात की स्वतःचं अस्तित्व असणारा मुख्यमंत्री बनतात हे पाहणं महत्त्वाचे आहे. त्यावरच कर्नाटकचं पुढचं राजकारण अवलंबून आहे. सदानंदा गौडा यांच्या राजकीय प्रवासवोक्कलिगा समाजाचे नेते - संघाचे कार्यकर्ते - येडियुरप्पा यांचे निष्ठावंत - 2 वेळा आमदार, 2 वेळा खासदार - 2007 ते 2010 - कर्नाटकचे भाजप प्रदेशाध्यक्ष- यापूर्वी कधीही मंत्रिपद मिळालं नव्हतं

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 3, 2011 10:39 AM IST

येडियुरप्पांच्या मर्जीतले सदानंदा गौडा मुख्यमंत्रीपदी

03 ऑगस्ट

कर्नाटकातल्या मुख्यमंत्रीपदाच्या वादावर अखेर पडदा पडला. कर्नाटकातल्या नाटकाच्या क्लायमॅक्समध्ये दोन हीरो ठरले. 58 वर्षांचे सदानंदा गौडा आणि मावळते मुख्यमत्री बी. एस. येडियुरप्पा.

सदानंदा गौडा यांची मुख्यमंत्री पदी निवड सहजासहजी झाली नाही. बेकायदेशीर मायनिंग प्रकरणी लोकायुक्तांच्या रिपोर्टनंतर येडियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला. पण आपण सुचवू तोच मुख्यमंत्री असा हट्ट धरत येडियुरप्पा यांनी रविवारी सदानंदा गौडा यांचं नाव सुचवलं.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला येडियुरप्पा यांची भूमिका मान्य नव्हती. हुबळीचे आमदार जगदीश शेट्टार मुख्यमंत्री बनावेत अशी त्यांची इच्छा होती. या गुंत्यामुळे अखेर मुख्यमंत्री निवडण्यासाठी गुप्त मतदान घेण्यात आलं. त्यात विधानसभा अध्यत्र वगळता 118 आमदारांनी मतदान केलं. त्यात सदानंदा गौडा यांनी जगदीश शेट्टार यांचा 8 मतांनी पराभव करत विजय मिळवला.

कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदावर लवकरच परत येऊ असा दावा येडियुरप्पा करत आहे. गौडा यांचा विजय म्हणजे येडियुरप्पा यांनी आपल्या विरोधकांचा केलेला पराभव आहे. पण, हा निसटता पराभव असल्याने गौडा यांचा पुढचा मार्ग सोपा नाही. येडियुरप्पा यांच्या हातातीलं बाहुलं म्हणून ते काम करतात की स्वतःचं अस्तित्व असणारा मुख्यमंत्री बनतात हे पाहणं महत्त्वाचे आहे. त्यावरच कर्नाटकचं पुढचं राजकारण अवलंबून आहे.

सदानंदा गौडा यांच्या राजकीय प्रवास

वोक्कलिगा समाजाचे नेते - संघाचे कार्यकर्ते - येडियुरप्पा यांचे निष्ठावंत - 2 वेळा आमदार, 2 वेळा खासदार - 2007 ते 2010 - कर्नाटकचे भाजप प्रदेशाध्यक्ष- यापूर्वी कधीही मंत्रिपद मिळालं नव्हतं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2011 10:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close