S M L

नव्या विधेयकाच्या मसुद्यात बदल होणं आवश्यक - मेधा पाटकर- मेधा पाटकर

03 ऑगस्टदुसरीकडे भूसंपादनाच्याच मुद्द्यावर सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी दिल्लीत जंतरमंतरजवळ धरणं आंदोलन सुरू केले आहे.तीन दिवस चालणार्‍या या आंदोलनात देशभरातल्या विविध प्रकल्पांमुळे विस्थापित झालेले शेकडो लोक सहभागी झाले आहेत. भूसंपादनाच्या नव्या विधेयकाला मेधा पाटकर यांनी विरोध केला. नव्या विधेयकाच्या मसुद्यात काही बदल होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी सरकारनं आमची मतं विचारात घ्यावीत अशी त्यांची मागणी आहे. कोणतीही जमीन ताब्यात घेण्यापूर्वी गावातली पंचायत आणि शहरातील बस्ती पंचायत यांची परवानगी घेणं आवश्यक असावे अशी मेधा पाटकर यांची मागणी आहे. तसेच खाजगी कंपन्यांसाठी जमीन अधिग्रहित करण्याबद्दलच्या तरतूदींवरही त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 3, 2011 11:25 AM IST

नव्या विधेयकाच्या मसुद्यात बदल होणं आवश्यक - मेधा पाटकर- मेधा पाटकर

03 ऑगस्ट

दुसरीकडे भूसंपादनाच्याच मुद्द्यावर सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी दिल्लीत जंतरमंतरजवळ धरणं आंदोलन सुरू केले आहे.तीन दिवस चालणार्‍या या आंदोलनात देशभरातल्या विविध प्रकल्पांमुळे विस्थापित झालेले शेकडो लोक सहभागी झाले आहेत. भूसंपादनाच्या नव्या विधेयकाला मेधा पाटकर यांनी विरोध केला. नव्या विधेयकाच्या मसुद्यात काही बदल होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी सरकारनं आमची मतं विचारात घ्यावीत अशी त्यांची मागणी आहे. कोणतीही जमीन ताब्यात घेण्यापूर्वी गावातली पंचायत आणि शहरातील बस्ती पंचायत यांची परवानगी घेणं आवश्यक असावे अशी मेधा पाटकर यांची मागणी आहे. तसेच खाजगी कंपन्यांसाठी जमीन अधिग्रहित करण्याबद्दलच्या तरतूदींवरही त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2011 11:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close