S M L

राज ठाकरेंच्या दौरा राजकीय स्टंट - माणिकराव ठाकरे

03 ऑगस्टमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा गुजरात दौरा म्हणजे राजकीय स्टंट असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणूक बघता हा दौरा काढल्याचा आरोप त्यांनी केला. राज ठाकरे यांचा गुजरात दौरा आजपासून सुरु झाला आहे. या दौर्‍यात राज ठाकरे अनेक विकास प्रकल्पांना भेटी देणार आहेत. त्याचबरोबर गुजरात सरकारची धोरणं यावरसुद्धा इथल्या तज्ज्ञांची चर्चा करणार आहेत. पुढचे 8 दिवस राज ठाकरे गुजरात सरकारचे सन्माननीय अतिथी आहेत. राज यांच्या दौर्‍याचा माणिकराव ठाकरे यांनी समाचार घेतला. गुजरातमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे भाजप पक्षाचे आहे. आणि राज हे राजकीय हेतून तेथे गेले आहे. जर मोदी उत्तरप्रदेशमध्येही असते तर राज ठाकरे तिथे गेले असते अशी टीका माणिकराव ठाकरे यांनी केली. तर काँग्रेसते नेते कृपाशंकर सिंग यांनी ही राज ठाकरेंना टोला लगावला.राज ठाकरे हिंदीतून बोलल्यामुळे बरं वाटल्याचा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 3, 2011 04:26 PM IST

राज ठाकरेंच्या दौरा राजकीय स्टंट - माणिकराव ठाकरे

03 ऑगस्ट

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा गुजरात दौरा म्हणजे राजकीय स्टंट असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणूक बघता हा दौरा काढल्याचा आरोप त्यांनी केला.

राज ठाकरे यांचा गुजरात दौरा आजपासून सुरु झाला आहे. या दौर्‍यात राज ठाकरे अनेक विकास प्रकल्पांना भेटी देणार आहेत. त्याचबरोबर गुजरात सरकारची धोरणं यावरसुद्धा इथल्या तज्ज्ञांची चर्चा करणार आहेत. पुढचे 8 दिवस राज ठाकरे गुजरात सरकारचे सन्माननीय अतिथी आहेत. राज यांच्या दौर्‍याचा माणिकराव ठाकरे यांनी समाचार घेतला. गुजरातमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे भाजप पक्षाचे आहे. आणि राज हे राजकीय हेतून तेथे गेले आहे. जर मोदी उत्तरप्रदेशमध्येही असते तर राज ठाकरे तिथे गेले असते अशी टीका माणिकराव ठाकरे यांनी केली. तर काँग्रेसते नेते कृपाशंकर सिंग यांनी ही राज ठाकरेंना टोला लगावला.राज ठाकरे हिंदीतून बोलल्यामुळे बरं वाटल्याचा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2011 04:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close