S M L

गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवा !

05 ऑगस्टमुंबईच्या रस्त्यांवरील खड्‌ड्यांचा प्रश्न काल गुरूवारी अधिवेशनवात चांगलाच गाजला. आज विधान परिषदेतही हा मुद्दा चर्चेला आला. मुंबईतल्या रस्त्यांवरच्या खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजवण्याचे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी मुंबई महापालिकेला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनीही या खड्‌ड्यांची आता गंभीर दखल घेतली. यासंदर्भात शनिवारी मुख्यमंत्री आढावा बैठक घेणार आहेत. पण दोन दिवसात खड्डे बुजवणे अशक्य असल्याचे महापौर श्रद्धा जाधव यांनी स्पष्ट केले. कंत्राटदारांवर राजकीय 'कृपा'मुंबई महापालिकेत रस्त्याची कामं घेणार्‍या कंत्राटदारांचे राजकीय लागेबांधे कसे आहेत याची काही उदाहरणं आता समोर आली आहेत. यामुळे खड्‌ड्यांची कितीही निकृष्ट काम झाली तरी या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई व्यतिरिक्त काही विशेष कारवाई होताना दिसत नाही. काही प्रमुख ठेकेदारांचे कोणकोणच्या नेत्यांशी कसे लागेबांधे आहेत. यावर्षी मुंबई महापालिकेनं सिमेंट आणि अस्फाल्टचे रस्ते बनवण्यासाठी साडेपाचशे कोटी रुपयांचे कंत्राट देण्याचे निश्चित केले. यापैकी दोन ठेकेदारांची ग्रेड कमी करण्यात आली होती. तर एका कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात आलं होतं. असं असुनही पुन्हा याच कंत्राटदारांना काम देण्यात आले.1 ) आरपीएस लिमिटेड आरपीएस लिमिटेड - या कंपनीची सुरुवात आर. पी. शहा यांनी केली. आर. पी. शहा हे तीस वर्षांपूर्वी बांधकाम विभागात क्लार्क म्हणून काम पाहत होते.सध्या त्यांची मुलं नितीन आणि केतन शहा हा कारभार पाहतात. कंपनीचा टर्नओव्हर 200 कोटींच्या घरात आहे. यांचा काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंग यांच्याशी जवळचा संबंध आहे असा आरोप होत आहे.2) रेलकॉन या कंपनीचे मालक पी सी शहा आहेत. सध्या त्यांची चार मुलं तेजस, राकेश, जयेश आणि दिपक शहा हा कारभार पाहतात. कंपनीचा टर्नओव्हर 300 कोटींचा आहे.यांचाही कृपाशंकर सिंग यांच्याशी जवळचा संबंध आहे असा आरोप होतोय. मात्र आपण त्यांना ओळखतच नसल्याचं त्यांनी सांगितले. 3) प्रकाश इंजिनिअरिंगया कंपनीचे मालक नंद बिजलानी आहेत. सध्या त्यांचा मुलगा प्रकाश बिजलानी हा व्यवसाय सांभाळतो. कंपनीचा टर्नओव्हर 70 ते 100 कोटींचा आहे. सगळ्याच महत्वाच्या राजकीय नेत्यांशी यांचे संबंध आहेत.4) महावीर आणि कंपनी मालक जितेंद्र काकावत सध्या त्यांचे बंधू पंकज आणि अमित हा व्यवसाय पाहतात. कंपनीचा टर्नओव्हर 250 कोटींचा आहे. यांचे राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांच्याशी जवळचे संबंध आहेत असा आरोप होतोय. 5) शांतीनाथ रोडवेस शांतीभाई शहा यांनी कंपनीची सुरुवात केली. सध्या त्यांची मुलं अश्वीन आणि हर्षद कारभार पाहतात. टन ओव्हर 100 कोटींच्या घरात आहे. शहा यांचे शिवसेनेचे नगरसेवक आणि नुकतेच आमदार झालेल्या रविंद्र वायकर यांच्याशीशी जवळचे संबंध आहेत असा आरोप होतोय. महापालिकेत राजकारणी आणि बिल्डर यांचं साटलोट असल्याचा थेट आरोप मनसेनं केला. अशा प्रकारे खास मर्जीतल्या कंत्राटदारांना कंत्राट मिळाल्याने काम निकृष्ट दर्जाचं झाल तरी त्यांच्यावर विशेष अशी कारवाई होत नाही. त्यामुळे जनतेच्या कररुपी गोळा होणार्‍या पैशांची एकप्रकारे क्रुर चेष्टाचं होतेय.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 5, 2011 09:51 AM IST

गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवा !

05 ऑगस्ट

मुंबईच्या रस्त्यांवरील खड्‌ड्यांचा प्रश्न काल गुरूवारी अधिवेशनवात चांगलाच गाजला. आज विधान परिषदेतही हा मुद्दा चर्चेला आला. मुंबईतल्या रस्त्यांवरच्या खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजवण्याचे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी मुंबई महापालिकेला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनीही या खड्‌ड्यांची आता गंभीर दखल घेतली. यासंदर्भात शनिवारी मुख्यमंत्री आढावा बैठक घेणार आहेत. पण दोन दिवसात खड्डे बुजवणे अशक्य असल्याचे महापौर श्रद्धा जाधव यांनी स्पष्ट केले. कंत्राटदारांवर राजकीय 'कृपा'मुंबई महापालिकेत रस्त्याची कामं घेणार्‍या कंत्राटदारांचे राजकीय लागेबांधे कसे आहेत याची काही उदाहरणं आता समोर आली आहेत. यामुळे खड्‌ड्यांची कितीही निकृष्ट काम झाली तरी या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई व्यतिरिक्त काही विशेष कारवाई होताना दिसत नाही. काही प्रमुख ठेकेदारांचे कोणकोणच्या नेत्यांशी कसे लागेबांधे आहेत.

यावर्षी मुंबई महापालिकेनं सिमेंट आणि अस्फाल्टचे रस्ते बनवण्यासाठी साडेपाचशे कोटी रुपयांचे कंत्राट देण्याचे निश्चित केले. यापैकी दोन ठेकेदारांची ग्रेड कमी करण्यात आली होती. तर एका कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात आलं होतं. असं असुनही पुन्हा याच कंत्राटदारांना काम देण्यात आले.

1 ) आरपीएस लिमिटेड

आरपीएस लिमिटेड - या कंपनीची सुरुवात आर. पी. शहा यांनी केली. आर. पी. शहा हे तीस वर्षांपूर्वी बांधकाम विभागात क्लार्क म्हणून काम पाहत होते.सध्या त्यांची मुलं नितीन आणि केतन शहा हा कारभार पाहतात. कंपनीचा टर्नओव्हर 200 कोटींच्या घरात आहे. यांचा काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंग यांच्याशी जवळचा संबंध आहे असा आरोप होत आहे.

2) रेलकॉन

या कंपनीचे मालक पी सी शहा आहेत. सध्या त्यांची चार मुलं तेजस, राकेश, जयेश आणि दिपक शहा हा कारभार पाहतात. कंपनीचा टर्नओव्हर 300 कोटींचा आहे.यांचाही कृपाशंकर सिंग यांच्याशी जवळचा संबंध आहे असा आरोप होतोय. मात्र आपण त्यांना ओळखतच नसल्याचं त्यांनी सांगितले.

3) प्रकाश इंजिनिअरिंग

या कंपनीचे मालक नंद बिजलानी आहेत. सध्या त्यांचा मुलगा प्रकाश बिजलानी हा व्यवसाय सांभाळतो. कंपनीचा टर्नओव्हर 70 ते 100 कोटींचा आहे. सगळ्याच महत्वाच्या राजकीय नेत्यांशी यांचे संबंध आहेत.

4) महावीर आणि कंपनी

मालक जितेंद्र काकावत सध्या त्यांचे बंधू पंकज आणि अमित हा व्यवसाय पाहतात. कंपनीचा टर्नओव्हर 250 कोटींचा आहे. यांचे राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांच्याशी जवळचे संबंध आहेत असा आरोप होतोय.

5) शांतीनाथ रोडवेस

शांतीभाई शहा यांनी कंपनीची सुरुवात केली. सध्या त्यांची मुलं अश्वीन आणि हर्षद कारभार पाहतात. टन ओव्हर 100 कोटींच्या घरात आहे. शहा यांचे शिवसेनेचे नगरसेवक आणि नुकतेच आमदार झालेल्या रविंद्र वायकर यांच्याशीशी जवळचे संबंध आहेत असा आरोप होतोय.

महापालिकेत राजकारणी आणि बिल्डर यांचं साटलोट असल्याचा थेट आरोप मनसेनं केला. अशा प्रकारे खास मर्जीतल्या कंत्राटदारांना कंत्राट मिळाल्याने काम निकृष्ट दर्जाचं झाल तरी त्यांच्यावर विशेष अशी कारवाई होत नाही. त्यामुळे जनतेच्या कररुपी गोळा होणार्‍या पैशांची एकप्रकारे क्रुर चेष्टाचं होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2011 09:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close