S M L

रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी कंत्राटदारावर लक्ष ठेवा - मुख्यमंत्री

06 ऑगस्टमुंबईतल्या खड्डयांसंदर्भात आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आढावा बैठक घेतली. मुंबई महापालिकेचे आयुक्त, आणि एमएमआरडीएचे आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव या बैठकीला उपस्थित होते. मंुबईतील रस्त्यांची परिस्थिती गंभीर आहे, रस्ते सुधारण्यासाठी तातडीन उपाययोजना करा असे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पालिका आयुक्त आणि एमएमआरडीएच्या आयुक्तांना दिले. रस्त्यांची गुणवत्ता जपण्यासाठी कंत्राटदारावर लक्ष ठेवा अशी सूचनाही त्यांनी केली. गेल्या काही दिवसात राज्यातील खड्‌ड्यांबाबत जी चर्चा सुरु आहे. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यानी ही बैठक बोलावली होती. मुंबईतील रस्त्यांवरच्या खड्‌ड्यांचा प्रश्न काल विधानपरिषदेत गाजला. मुंबईतल्या रस्त्यांवरचे खड्डे गणेश उत्सवापूर्वी बुजवण्यात यावेत असे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी मुंबई महापालिकेला दिले आहेत. सरकारने गुरुवारी दोन दिवसात खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते. पण ते शक्य नसल्याचे महापालिकेनं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर सरकारने मुदत वाढवून दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 6, 2011 04:26 PM IST

रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी कंत्राटदारावर लक्ष ठेवा - मुख्यमंत्री

06 ऑगस्ट

मुंबईतल्या खड्डयांसंदर्भात आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आढावा बैठक घेतली. मुंबई महापालिकेचे आयुक्त, आणि एमएमआरडीएचे आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव या बैठकीला उपस्थित होते. मंुबईतील रस्त्यांची परिस्थिती गंभीर आहे, रस्ते सुधारण्यासाठी तातडीन उपाययोजना करा असे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पालिका आयुक्त आणि एमएमआरडीएच्या आयुक्तांना दिले.

रस्त्यांची गुणवत्ता जपण्यासाठी कंत्राटदारावर लक्ष ठेवा अशी सूचनाही त्यांनी केली. गेल्या काही दिवसात राज्यातील खड्‌ड्यांबाबत जी चर्चा सुरु आहे. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यानी ही बैठक बोलावली होती. मुंबईतील रस्त्यांवरच्या खड्‌ड्यांचा प्रश्न काल विधानपरिषदेत गाजला.

मुंबईतल्या रस्त्यांवरचे खड्डे गणेश उत्सवापूर्वी बुजवण्यात यावेत असे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी मुंबई महापालिकेला दिले आहेत. सरकारने गुरुवारी दोन दिवसात खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते. पण ते शक्य नसल्याचे महापालिकेनं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर सरकारने मुदत वाढवून दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 6, 2011 04:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close